< 2 Krønikebok 18 >

1 Josafat vant stor rikdom og ære. Han inngikk svogerskap med Akab;
यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला.
2 og nogen år efter drog han ned til Akab i Samaria, og Akab lot slakte småfe og storfe i mengde for ham og de folk han hadde med sig, og han tilskyndte ham til å dra op imot Ramot i Gilead.
त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.
3 Akab, Israels konge, sa til Josafat, Judas konge: Vil du dra med mig til Ramot i Gilead? Han svarte: Som du, så jeg, og som ditt folk, så mitt folk - vi vil være med dig i krigen.
अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.”
4 Og Josafat sa fremdeles til Israels konge: Søk dog først å få vite hvad Herren sier!
यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.”
5 Da kalte Israels konge profetene sammen; det var fire hundre mann; og han spurte dem: Skal vi dra i strid mot Ramot i Gilead, eller skal jeg la det være? De svarte: Dra op! Gud vil gi det i kongens hånd.
तेव्हा इस्राएलाचा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, “जरुर जा. कारण देव राजाला जय देईल.”
6 Men Josafat sa: Er her ikke nogen annen Herrens profet, så vi kunde spørre Herren til råds gjennem ham?
पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.”
7 Israels konge svarte Josafat: Der er ennu en mann gjennem hvem vi kan spørre Herren til råds; men jeg hater ham fordi han ikke spår godt om mig, men bare ondt alle sine dager, det er Mika, Jimlas sønn. Josafat sa: Kongen skulde ikke si så!
तेव्हा इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वरास विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र.” पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.”
8 Da kalte Israels konge på en av hoffolkene og sa: Skynd dig og hent Mika, Jimlas sønn!
तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”
9 Imens satt Israels konge og Josafat, Judas konge, i kongelig skrud, hver på sin trone, på en treskeplass ved inngangen til Samarias port; og alle profetene stod foran dem og fremsa sine spådommer.
इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते.
10 Og Sedekias, Kena'anas sønn, gjorde sig horn av jern og sa: Så sier Herren: Med disse skal du stange syrerne til du får gjort ende på dem.
१०कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’”
11 Og alle profetene spådde likedan og sa: Dra op til Ramot i Gilead! Så skal du ha lykke med dig, og Herren skal gi det i kongens hånd.
११इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.”
12 Og budet som var gått for å tilkalle Mika, sa til ham: Profetene spår med en munn godt for kongen; la nu også dine ord stemme overens med deres og spå godt!
१२मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”
13 Mika svarte: Så sant Herren lever: Hvad min Gud sier, det vil jeg tale.
१३पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”
14 Da han nu kom til kongen, sa kongen til ham: Mika! Skal vi dra i krig til Ramot i Gilead, eller skal jeg la det være? Han svarte: Dra op! Så skal I ha lykke med eder, og de skal gis i eders hånd.
१४मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्यास म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.”
15 Men kongen sa til ham: Hvor mange ganger skal jeg besverge dig at du ikke skal tale annet til mig enn sannhet i Herrens navn?
१५राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!”
16 Da sa han: Jeg så hele Israel spredt utover fjellene likesom en fårehjord som ikke har hyrde; og Herren sa: Disse har ingen herre; la dem vende tilbake i fred, hver til sitt hus!
१६यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांस डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.”
17 Da sa Israels konge til Josafat: Var det ikke det jeg sa til dig: Han spår ikke godt om mig, men bare ondt?
१७इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”
18 Men Mika sa: Så hør da Herrens ord! Jeg så Herren sitte på sin trone og hele himmelens hær stå på hans høire og venstre side.
१८मीखाया म्हणाला, “तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती.”
19 Og Herren sa: Hvem vil overtale Akab, Israels konge, til å dra op til Ramot i Gilead, så han faller der? og den ene sa så og den annen så.
१९परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,
20 Da gikk ånden frem og stilte sig for Herrens åsyn og sa: Jeg skal overtale ham. Og Herren spurte ham: Hvorledes?
२०“मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”
21 Han svarte: Jeg vil gå avsted og være en løgnens ånd i alle hans profeters munn. Da sa Herren: Ja, du skal overtale ham, og det skal også lykkes dig; gå avsted og gjør så!
२१तेव्हा तो म्हणाला, “अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील, चल जा आपल्या कामगिरीवर.”
22 Se, nu har Herren lagt en løgnens ånd i disse dine profeters munn, men Herren har varslet ulykke for dig.
२२“अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
23 Da trådte Sedekias, Kena'anas sønn, frem og slo Mika på kinnet og sa: På hvilken vei er Herrens Ånd gått over fra mig for å tale med dig?
२३तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”
24 Mika svarte: Det skal du få se den dag du flykter fra kammer til kammer for å skjule dig.
२४मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”
25 Da sa Israels konge: Ta Mika og før ham tilbake til byens høvedsmann Amon og til kongesønnen Joas
२५इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा
26 og si: Så sier kongen: Sett ham i fangehuset og la ham leve på fangekost til jeg kommer uskadd hjem igjen!
२६आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्यास कैदयांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.”
27 Mika sa: Kommer du uskadd hjem igjen, så har Herren ikke talt gjennem mig. Og han sa: Hør dette, I folk alle sammen!
२७मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.”
28 Så drog Israels konge og Judas konge Josafat op til Ramot i Gilead.
२८इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ-गिलादावर हल्ला चढवला.
29 Og Israels konge sa til Josafat: Jeg vil forklæ mig og så gå i striden; men ta du dine vanlige klær på! Så forklædde Israels konge sig, og de gikk i striden.
२९इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले.
30 Men kongen i Syria hadde befalt sine vogn-høvedsmenn: I skal ikke stride mot nogen, hverken liten eller stor, bare mot Israels konge.
३०अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”
31 Da nu vogn-høvedsmennene så Josafat, sa de: Dette er Israels konge. Og de omringet ham for å stride. Da satte Josafat i et høit rop, og Herren hjalp ham; Gud vendte dem bort fra ham.
३१त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
32 For da vogn-høvedsmennene så at det ikke var Israels konge, vendte de sig fra ham igjen.
३२हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.
33 Men en mann spente sin bue på lykke og fromme og traff Israels konge mellem brynjeskjørtet og brynjen. Da sa han til vognstyreren: Vend om og før mig ut av hæren! Jeg er såret.
३३पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्राएलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”
34 Men striden blev stadig hårdere den dag, og Israels konge holdt sig opreist i vognen mot syrerne like til om aftenen; men på den tid solen gikk ned, døde han.
३४त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.

< 2 Krønikebok 18 >