< 2 Krønikebok 14 >
1 Og Abia la sig til hvile hos sine fedre og blev begravet i Davids stad, og hans sønn Asa blev konge i hans sted. I hans dager hadde landet ro i ti år.
१अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीद नगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा पुत्र आसा हा त्यानंतर राज्य करु लागला आसाच्या कारकिर्दीत लोकांस दहा वर्षे शांतता लाभली.
2 Asa gjorde hvad godt og rett var i Herrens, hans Guds øine.
२आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला.
3 Han fikk bort de fremmede guders altere og offerhaugene og sønderbrøt støttene og hugg Astartebilledene i stykker.
३त्याने मूर्तीपूजेसाठी वापरात येणाऱ्या परक्या वेद्या काढून टाकल्या. उच्चस्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले.
4 Og han bød Juda å søke Herren, deres fedres Gud, og holde loven og budene.
४त्याने यहूदी लोकांस परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजांचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले.
5 I alle Judas byer fikk han bort offerhaugene og solstøttene, og riket hadde ro under ham.
५यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्चस्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती.
6 Han bygget festninger i Juda; for landet hadde ro, og ingen førte krig mot ham i de år, fordi Herren gav ham ro.
६या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.
7 Han sa til Juda: La oss bygge disse byer og reise murer og tårner, porter og bommer omkring dem! Ennu råder vi fritt over landet, fordi vi har søkt Herren vår Gud; vi har søkt ham, og han har gitt oss ro på alle kanter. Så tok de til å bygge, og det lyktes for dem.
७आसा यहूदातील लोकांस म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहत आहोत, तो आपलाच आहे. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
8 Asas hær var tre hundre tusen mann av Juda, som var væbnet med spyd og store skjold, og to hundre og åtti tusen av Benjamin, som bar små skjold og skjøt med bue; de var alle djerve stridsmenn.
८आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील तीन लाख जण आणि बन्यामीन वंशातील दोन लाख ऐंशी हजार पुरुष होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्यबाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.
9 Men etioperen Serah drog ut imot dem med en hær på tusen ganger tusen mann og tre hundre stridsvogner, og han kom til Maresa.
९पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्याकडे दहा लाख सैनिक आणि तीनशे रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला.
10 Og Asa drog ut imot ham, og de stilte sig i fylking i Sefata-dalen ved Maresa.
१०आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली.
11 Da ropte Asa til Herren sin Gud og sa: Herre, for dig gjør det ingen forskjell, enten du hjelper den mektige eller den maktesløse. Hjelp oss, Herre vår Gud! Til dig setter vi vår lit, og i ditt navn er vi gått mot denne store mengde. Herre, du er vår Gud; la ikke et menneske stå sig imot dig!
११आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी वर्चस्व मिळवू नये.”
12 Da lot Herren etioperne bli slått av Asa og Juda, og etioperne flyktet.
१२मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला.
13 Asa og hans folk forfulgte dem like til Gerar, og av etioperne falt det så mange at ingen av dem blev i live; de blev knust av Herren og hans hær. Og de førte et umåtelig stort hærfang bort med sig.
१३आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यामध्ये कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या.
14 Og de inntok alle byene rundt omkring Gerar, for frykt for Herren var kommet over dem, og de plyndret alle byene, for det var meget å plyndre i dem.
१४गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले.
15 Endog teltene for buskapen tok de, og de førte bort en mengde med småfe og kameler, og så vendte de tilbake til Jerusalem.
१५मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरूशलेमेला परतले.