< 1 Tessalonikerne 1 >
1 Paulus og Silvanus og Timoteus - til tessalonikernes menighet i Gud Fader og den Herre Jesus Kristus: Nåde være med eder og fred!
१देवपिता व प्रभू येशू ख्रिस्ता याच्यात असलेली थेस्सलनीका शहरातील मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
2 Vi takker alltid Gud for eder alle når vi kommer eder i hu i våre bønner,
२आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.
3 idet vi uavlatelig minnes eders virksomhet i troen og arbeid i kjærligheten og tålmod i håpet på vår Herre Jesus Kristus for vår Guds og Faders åsyn,
३आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
4 da vi er visse på at I er utvalgt, brødre, I som er elsket av Gud.
४बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच;
5 For vårt evangelium kom ikke til eder bare i ord, men og i kraft og i den Hellige Ånd og i stor fullvisshet, likesom I jo vet hvorledes vi var iblandt eder for eders skyld,
५कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळविण्यात आली तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे.
6 og I blev efterfølgere av oss og av Herren, idet I tok imot ordet under megen trengsel med glede i den Hellige Ånd,
६तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;
7 så I er blitt et forbillede for alle de troende i Makedonia og Akaia.
७अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात.
8 For fra eder har Herrens ord lydt ut; ikke bare i Makedonia og Akaia, men allesteds er eders tro på Gud kommet ut, så vi ikke trenger til å tale noget om det;
८मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही.
9 for selv forteller de om oss hvad inngang vi fikk hos eder, og hvorledes I vendte eder til Gud fra avgudene, for å tjene den levende og sanne Gud
९कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास,
10 og vente på hans Sønn fra himlene som han opvakte fra de døde, Jesus, han som frir oss fra den kommende vrede.
१०आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.