< 1 Krønikebok 16 >
1 Så førte de Guds ark inn og satte den midt i det telt som David hadde reist for den, og de bar frem brennoffer og takkoffer for Guds åsyn.
१त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली.
2 Og da David var ferdig med å ofre brennofferet og takkofferne, velsignet han folket i Herrens navn.
२मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला.
3 Og han utdelte til hver enkelt i Israel, både mann og kvinne, et brød og et stykke kjøtt og en rosinkake.
३मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली.
4 Og han satte nogen av levittene til å gjøre tjeneste foran Herrens ark og til å prise og takke og love Herren, Israels Gud:
४मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले.
5 Asaf var den øverste, næst efter ham kom Sakarja og så Je'iel og Semiramot og Jehiel og Mattitja og Eliab og Benaja og Obed-Edom og Je'iel med harper og citarer; Asaf skulde slå på cymblene
५आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत.
6 og prestene Benaja og Jahasiel stadig blåse i trompetene foran Guds pakts-ark.
६बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत.
7 Den dag satte David første gang Asaf og hans brødre til å synge Herrens pris:
७तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.
8 Pris Herren, påkall hans navn, kunngjør blandt folkene hans store gjerninger!
८परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा.
9 Syng for ham, lovsyng ham, grund på alle hans undergjerninger!
९त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा. त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.
10 Ros eder av hans hellige navn! Deres hjerte glede sig som søker Herren!
१०त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो.
11 Spør efter Herren og hans makt, søk hans åsyn all tid!
११परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा. निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.
12 Kom i hu hans undergjerninger som han har gjort, hans under og hans munns dommer,
१२त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
13 I, hans tjener Israels avkom, Jakobs barn, hans utvalgte!
१३त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो,
14 Han er Herren vår Gud; hans dommer er over all jorden.
१४तो परमेश्वर, आमचा देव आहे. त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
15 Kom evindelig hans pakt i hu, det ord han fastsatte for tusen slekter,
१५त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा.
16 den pakt han gjorde med Abraham, og hans ed til Isak!
१६त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.
17 Han stadfestet den som en rett for Jakob, som en evig pakt for Israel,
१७याकोबासाठी त्याने तोच नियम केला. आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला.
18 idet han sa: Dig vil jeg gi Kana'ans land til arvelodd,
१८तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.”
19 da I var en liten flokk, få og fremmede der.
१९मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता.
20 Og de vandret fra folk til folk og fra et rike til et annet folk.
२०तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्यात जात होता.
21 Han tillot ikke nogen å gjøre vold imot dem, og han straffet konger for deres skyld:
२१पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु: ख होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली.
22 Rør ikke ved mine salvede, og gjør ikke mine profeter noget ondt!
२२तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका. माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
23 Syng for Herren, all jorden! Forkynn fra dag til dag hans frelse!
२३पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा.
24 Fortell blandt hedningene hans ære, blandt alle folkene hans undergjerninger!
२४त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा.
25 For stor er Herren og høilovet, og forferdelig er han over alle guder.
२५परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.
26 For alle folkenes guder er intet; men Herren har gjort himmelen.
२६कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत. पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
27 Høihet og herlighet er for hans åsyn, styrke og glede er på hans sted.
२७महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत.
28 Gi Herren, I folkeslekter, gi Herren ære og makt!
२८अहो लोकांच्या कुळांनो परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
29 Gi Herren hans navns ære, bær frem gaver og kom for hans åsyn, tilbed Herren i hellig prydelse!
२९परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
30 Bev for hans åsyn, all jorden! Jorderike står fast, det rokkes ikke.
३०त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही.
31 Himmelen glede sig, og jorden fryde Sig, og de skal si iblandt hedningene: Herren er blitt konge.
३१पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो; राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”
32 Havet bruse og alt som fyller det! Marken fryde sig og alt som er på den!
३२समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत.
33 Da jubler trærne i skogen for Herrens åsyn; for han kommer for å dømme jorden.
३३अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.
34 Lov Herren! For han er god, hans miskunnhet varer evindelig.
३४परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
35 Og si: Frels oss, du vår frelses Gud, og samle oss og utfri oss fra hedningene til å love ditt hellige navn, rose oss av å kunne prise dig!
३५आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार. आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव. आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”
36 Lovet være Herren, Israels Gud, fra evighet og til evighet! Og alt folket sa amen og lovet Herren.
३६इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
37 Så lot han Asaf og hans brødre bli der foran Herrens pakts-ark for stadig å gjøre tjeneste foran arken, hver dag det som skulde gjøres på den dag,
३७मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले.
38 og Obed-Edom og deres brødre, åtte og seksti, Obed-Edom, sønn av Jeditun, og Hosa som dørvoktere.
३८त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.
39 Men presten Sadok og hans brødre prestene lot han bli foran Herrens tabernakel på haugen i Gibeon.
३९सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले.
40 forat de stadig skulde ofre Herren brennoffer på brennofferalteret morgen og aften og gjøre alt det som skrevet står i den lov som Herren hadde gitt Israel,
४०ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.
41 og sammen med dem Heman og Jedutun og de andre utvalgte, som var nevnt ved navn, forat de skulde love Herren, fordi hans miskunnhet varer evindelig,
४१आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
42 og hos dem - Heman og Jedutun - var der trompeter og cymbler til bruk for dem som skulde spille, og likeledes andre instrumenter til sangen ved gudstjenesten. Og Jedutuns sønner var dørvoktere.
४२हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.
43 Derefter drog alt folket hver til sitt, og David vendte hjem for å velsigne sitt hus.
४३नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.