< हितोपदेश 28 >
1 कसैले नलखेट्दा पनि दुष्ट मानिसहरू भाग्छन्, तर धर्मी मानिसहरू जवान सिंहझैँ निर्भीक हुन्छन् ।
१जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
2 देशको अधर्मको कारण त्यहाँ धेरै शासकहरू हुन्छन्, तर समझशक्ति र ज्ञान भएको मानिसले अमनचैन कायम राख्ने छ ।
२देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते.
3 एउटा गरिब मानिसमाथि थिचोमिचो गर्ने अर्को गरिब मानिस अन्न सखाप पार्ने मुसलधारे वर्षाजस्तो हो ।
३जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे.
4 व्यवस्था त्याग्नेहरूले दुष्ट मानिसहरूको प्रशंसा गर्छन्, तर व्यवस्था पालन गर्नेहरू तिनीहरूको विरुद्धमा लड्छन् ।
४जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात, पण जे नियम पाळतात ते त्यांच्याविरुद्ध लढतात.
5 खराब मानिसले न्यायलाई बुझ्दैन, तर परमप्रभुको खोजी गर्नेहरूले हरेक कुरो बुझ्दछ ।
५दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही, पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते.
6 आफ्ना मार्गहरूमा टेडो हुने धनी मानिसभन्दा आफ्नो निष्ठामा हिँड्ने गरिब मानिस उत्तम हुन्छ ।
६श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा, गरीब पुरुष असून जो त्याच्या प्रामाणिकपणात चालतो तो उत्तम आहे.
7 व्यवस्था पालन गर्ने छोरो समझदार हुन्छ, तर घिचावाको सङ्गत गर्नेले चाहिँ आफ्नो बुबालाई लज्जित तुल्याउँछ ।
७जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो, पण जो खादाडाचा सोबती आहे तो आपल्या वडिलांना लाज आणतो.
8 धेरै ब्याज लगाएर आफ्नो सम्पत्ति बढाउने मानिसको धनलाई अर्कैले कुम्ल्याउँछ र त्यसले गरिबहरूमाथि दया देखाउँछ ।
८जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो त्याची संपत्ती जो कोणी गरिबांवर दया करतो त्या दुसऱ्यासाठी साठवतो.
9 कसैले व्यवस्था सुन्नबाट आफ्नो कान तर्कायो भने त्यसको प्रार्थना पनि घृणित हुन्छ ।
९जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल.
10 सोझाहरूलाई खराब मार्गमा लैजाने जो कोही पनि आफूले खनेको खाल्डोमा जाकिने छ, तर खोटरहित मानिसले असल पैतृक-सम्पत्ति पाउने छ ।
१०जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल, तो आपल्या स्वतःच्या खड्ड्यात पडेल, पण जे निर्दोष आहेत त्यांना चांगले वतन मिळेल.
11 धनी मानिस आफ्नै दृष्टिमा बुद्धिमान् होला, तर समझशक्ति भएको गरिब मानिसले त्यसलाई पत्ता लगाउने छ ।
११श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो, पण गरीब मनुष्य ज्याला समंजसपणा आहे त्यास शोधून काढतो.
12 धर्मीहरू विजय हुँदा ठुलो महिमा हुन्छ, तर दुष्टहरूको उदय हुँदा मानिसहरू लुक्न थाल्छन् ।
१२नीतिमानांचा विजय होतो तेव्हा तेथे मोठा नावलौकिक होतो, पण जेव्हा दुर्जन उठला, म्हणजे लोक स्वतः लपून बसतात.
13 आफ्ना पापहरू लुकाउनेको उन्नति हुने छैन, तर तिनलाई स्वीकार गरी त्याग्नेलाई कृपा देखाइने छ ।
१३एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
14 सधैँ आदरसाथ जिउने आशिषित् हुने छ, तर आफ्नो हृदयलाई कठोर बनाउनेचाहिँ कष्टमा पर्ने छ ।
१४जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो.
15 गर्जने सिंह वा झम्टने भालुझैँ मानिसहरूमाथि शासन गर्ने दुष्ट शासक हुन्छ ।
१५गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे.
16 समझशक्ति कमी भएको शासक क्रुर हुन्छ, तर बेइमानीलाई घृणा गर्नेचाहिँको आयु लामो हुन्छ ।
१६जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो.
17 कसैको रगत बगाएकोले मानिस दोषी छ भने त्यसको मृत्यु नभएसम्म त्यो भगुवा हुने छ र कसैले त्यसलाई सहायता गर्ने छैन ।
१७जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.
18 निष्ठासहित हिँड्ने सुरक्षित हुने छ, तर टेडो चाल भएको मानिस अकस्मात् पतन हुने छ ।
१८जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो.
19 आफ्नो खेतबारी खनजोत गर्नेको प्रशस्त अन्न हुने छ, तर बेकम्मा कोसिसको पछि लाग्नेचाहिँ दरिद्रताले भरिने छ ।
१९जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते.
20 विश्वासयोग्य मानिसले धेरै आशिष्हरू पाउने छ, तर झट्टै धनी हुनेचाहिँ दण्डविना उम्कने छैन ।
२०विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
21 पक्षपात गर्नु राम्रो होइन, तरै पनि एक टुक्रा रोटीको लागि मानिसले गलत काम गर्छ ।
२१पक्षपात दाखवणे हे चांगले नाही, तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील.
22 कन्जुस मानिस धनको पछि लाग्छ, तर दरिद्रता त्यसमाथि आइपर्ने छ भनी त्यसलाई थाहै हुँदैन ।
२२कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही.
23 फुर्क्याउने जिब्रो भएकोले भन्दा अनुशासनमा राख्नेले नै पछि बढी निगाह पाउँछ ।
२३जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.
24 आफ्ना बुबा र आमालाई लुटेर “त्यो पाप होइन” भनी बताउने मानिस बर्बादी ल्याउनेको मित्र हुन्छ ।
२४जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.
25 लोभी मानिसले द्वन्द्व निम्त्याउँछ, तर परमप्रभुमा भरोसा गर्नेको उन्नति हुने छ ।
२५लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो, पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याची भरभराट होते.
26 आफ्नै हृदयमा भरोसा गर्ने मानिस मूर्ख हो, तर बुद्धिमा चल्नेचाहिँ खतराबाट टाढै बस्छ ।
२६जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो.
27 गरिबलाई दिनेलाई कुनै कुराको अभाव हुँदैन, तर तिनीहरूप्रति आँखा चिम्लनेले धेरै श्राप पाउने छ ।
२७जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील.
28 दुष्टहरूको उदय हुँदा मानिसहरू लुक्छन्, तर तिनीहरू नष्ट हुँदा धर्मीहरूको वृद्धि हुन्छ ।
२८जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात, पण जेव्हा दुष्ट नष्ट होतात तेव्हा नीतिमान वाढतात.