< गन्ती 20 >
1 यसैले इस्राएलका सारा समुदाय पहिलो महिनामा जीनको मरुभूमिमा गए; तिनीहरू कादेशमा बसे ।
१इस्राएलाचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.
2 त्यहाँ मिरियम मरिन् र तिनलाई त्यहीँ गाडियो । समुदायको निम्ति त्यहाँ पानी थिएन, त्यसैले तिनीहरू मोशा र हारूनको विरुद्ध भेला भए ।
२त्याठिकाणी लोकांस पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.
3 मानिसहरूले मोशा विरुद्ध गनगन गरे । तिनीहरूले भने, “हाम्रा सङ्गी इस्राएलीहरू परमप्रभुको सामु मर्दा हामी पनि मरेका भए राम्रो हुन्थ्यो ।
३लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते.
4 परमप्रभुको समुदाय, हामी र हाम्रा पशुहरू मर्नलाई किन यहाँ ल्याउनुभएको?
४“तू परमेश्वराच्या लोकांस या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का?
5 यो डरलाग्दो ठाउँमा ल्याउन हामीलाई किन मिश्रबाट आउन लगाउनुभयो? यहाँ बिउ, नेभारा, दाख वा अनार केही पनि छैन र पिउने पानी पनि छैन ।”
५तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”
6 यसैले मोशा र हारून समुदायको सामु गए । तिनीहरू भेट हुने पालको प्रवेश-द्वारमा गए र घोप्टो परे । त्यहाँ परमप्रभुको उज्ज्वल महिमा देखा पर्यो ।
६म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
7 परमप्रभुले मोशालाई भन्नुभयो,
७परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
8 “लहुरो ले र समुदाय, तँ र तेरा दाजु हारूनलाई भेला गर् । तिनीहरूको नजरकै सामुन्ने चट्टानलाई भन् र पानी निकाल्न यसलाई आज्ञा दे । तैँले त्यो चट्टानबाट तिनीहरूका निम्ति पानी निकाल्ने छस् र तैँले यो तिनीहरूलाई र तिनीहरूका गाईवस्तुहरूलाई दिनू ।”
८तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.
9 परमप्रभुले मोशालाई आज्ञा गर्नुभएजस्तै मोशाले परमप्रभुको सामुबाट लहुरो लिए ।
९मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली.
10 अनि मोशा र हारूनले चट्टानको सामु मानिसहरू भेला पारे । मोशाले तिनीहरूलाई भने, “अब हे बागीहरू हो, सुन । के हामीले तिमीहरूलाई यो चट्टानबाट पानी निकाल्नपर्छ?
१०मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय?
11 अनि मोशाले आफ्नो हात उठाएर चट्टानलाई दुई पटक हिर्काए, र पानी निस्क्यो । समुदाय र तिनीहरूका गाईवस्तुहरूले पानी पिए ।
११मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
12 परमप्रभुले मोशा र हारूनलाई भन्नुभयो, “तिमीहरूले इस्राएलका मानिसहरूको नजरमा मलाई पवित्र जनको रूपमा आदर नगरेकाले वा मलाई भरोसा नगरेकाले तिमीहरूले यो समुदायलाई मैले तिनीहरूलाई दिन्छु भनेको भूमिमा ल्याउनेछैनौ ।”
१२पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही.
13 यो ठाउँलाई मेरीबाको पानी भनियो, किनभने इस्राएलका मानिसहरूले त्यहाँ परमप्रभुसँग झगडा गरेका थिए, र उहाँले आफैलाई पवित्र जनको रूपमा प्रकट गर्नुभएको थियो ।
१३त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
14 मोशाले कादेशबाट एदोमको राजाकहाँ समाचारवाहकहरू पठाएः तपाईंको भाइ इस्राएलले भन्छ, “हामीमाथि आइपरेका सबै कठिनाइ तपाईं जान्नुहुन्छ ।
१४मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
15 हाम्रा पुर्खाहरू मिश्रमा गए र मिश्रमा नै लामो समयसम्म बसेको तपाईंलाई थाहा छ । मिश्रीहरूले हामी र हाम्रा पुर्खाहरूलाई रुखो व्यवहार गरे ।
१५खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.
16 जब हामीले परमप्रभुलाई पुकार्यौँ, उहाँले हाम्रो आवाज सुन्नुभयो, र एउटा स्वर्गदूत पठाउनुभयो अनि हामीलाई मिश्रबाट ल्याउनुभयो । हे्र्नुहोस्, हामी तपाईंको देशको सिमानामा पर्ने सहर कादेशमा छौँ ।
१६पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत.
17 हामीलाई तपाईंको भूमिको बाटो भएर जान दिनुहोस् भनी म बिन्ती गर्दछु । हामी खेत वा दाखबारीतिर पस्दैनौँ, न त हामी तपाईंका ईनारहरूको पानी पिउँछौँ । हामीले तपाईंको देशको सिमाना नकाटेसम्म दायाँ वा बायाँ लाग्ने छैनौँ ।”
१७कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.
18 तर एदोमको राजाले तिनलाई जवाफ दिए, “तिमीहरू यो मुलुक भएर जान सक्दैनौ । तिमीहरू आयौ भने, म तरवार लिएर आक्रमण गर्न आउने छु ।”
१८परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
19 अनि इस्राएलका मानिसहरूले तिनलाई भने, “हामी राजमर्ग भएर मात्र जाने छौँ । यदि हामी र हाम्रा गाईवस्तुहरूले पानी पिए भने हामी यसको मूल्य तिर्ने छौँ । कुनै कुरा नगरी हामीलाई पैदल जान मात्र दिनुहोस् ।”
१९इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
20 तर एदोमका राजाले जवाफ दिए, “तिमीहरू जान सक्दैनौँ ।” यसैले एदोमको राजा ठुलो फौजसहित इस्राएलको विरुद्ध लड्न आए ।
२०पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला.
21 एदोमका राजाले इस्राएललाई आफ्नो सिमाना भएर जान दिन इन्कार गरे । यसैले इस्राएल एदोमको भूमिबाट तर्किएर गए ।
२१अदोमाच्या राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
22 मानिसहरू कादेशबाट हिँडे । इस्राएलका मानिसहरू अर्थात् सारा समुदाय होर पर्वतमा आए ।
२२इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले.
23 एदोमको सिमानामा पर्ने होर पर्वतमा परमप्रभुले मोशा र हारूनलाई भन्नुभयो,
२३होर पर्वत अदोमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
24 “हारून आफ्ना मानिसहरूकहाँ जानुपर्छ, किनभने मैले इस्राएललाई दिएको भूमिमा त्यो प्रवेश गर्ने छैन । यो तिमीहरू दुवैले मेरीबाको पानीमा मेरो विरुद्ध विद्रोह गरेकाले गर्दा हो ।
२४अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्राएल लोकांस ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले.
25 हारून र त्यसका छोरा एलाजारलाई होर पर्वतमाथि ले ।
२५आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
26 हारूनको पुजारीको पोशाक फुकाल् र त्यो एलाजारलाई लगाइदे । हारून मर्नुपर्छ र आफ्ना मानिसहरूसँग मिल्नुपर्छ ।”
२६अहरोनाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल.
27 मोशाले परमप्रभुले आज्ञा गर्नुभएबमोजिम गरे । तिनीहरू सारा समुदायको सामुबाट होर पर्वतमाथि गए ।
२७मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले.
28 मोशाले हारूनको पुजारीको पोशाक फुकाले र त्यो तिनका छोरा एलाजारलाई लगाइदिए । पर्वतको चुचुरोमाथि हारून मरे । अनि मोशा र एलाजार तल ओर्ले ।
२८मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले.
29 जब हारून मरेका सारा समुदायले देखे, तब सारा जाति हारूनको निम्ति तिस दिनसम्म रोए ।
२९इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.