< गन्ती 16 >

1 लेवीका पनाति, कहातका नाति, यिसहारका छोरा कोरहसाथै रूबेनका कुलका एलीआबका छोराहरू दातान र अबीराम अनि पेलेथका छोराले केही मानिसहरू भेला गरे ।
कोरह इसहारचा मुलगा, इसहार कहाथचा मुलगा आणि कहाथ लेवीचा मुलगा, दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती. ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते. यांनी काही माणसे जमवली.
2 तिनीहरू, इस्राएलका मानिसहरूका अन्य मानिसहरूसँगै दुई सय पचास समुदायका अगुवाहरू जो नाम चलेका सदस्यहरू थिए, मोशाको विरुद्धा खडा भए ।
या चार मनुष्यांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांस माहीत होते.
3 तिनीहरू मोशा र हारूनको सामना गर्न आफै भेला भए । तिनीहरूले उनीहरूलाई भने, “तपाईंहरूले अति गर्नुभयो! सबै समुदाय, तिनीहरूमध्ये हरेकलाई नै अलग गरिएको छ र परमप्रभु तिनीहरूसँग छन् । किन आफैलाई परमप्रभुको समुदायभन्दा माथि उठाउनुहुन्छ?”
ते मोशेविरूद्ध व अहरोनाविरूद्ध एकत्र समुहाने आले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलाचे इतर लोकसुद्धा पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत: ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
4 जब मोशाले त्यो सुने, तिनी घोप्टो परे ।
जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला.
5 तिनले कोरह र उनका साथमा भएकाहरूलाई भने, “को उहाँका हुन् र कसलाई उहाँको निम्ति अलग गरिएको छ भनी परमप्रभुले बिहान देखाउनुहुने छ । त्यस व्‍यक्‍तिलाई उहाँले उहाँको नजिक ल्याउनुहुने छ । उहाँले चुन्‍नुभएकोलाई आफैले आफ्नो नजिक ल्याउनुहुने छ ।
मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा मनुष्य आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या मनुष्यास त्याच्याजवळ आणिल. परमेश्वर त्या मनुष्याची निवड करील आणि त्यास स्वत: जवळ आणिल.
6 कोरह र तिम्रा सबै समूहले यो गर । धुपौराहरू लेओ ।
म्हणून कोरह तू आणि तुझ्या गटाने धुपाटणे आणा.
7 भोलि त्यसमा परमप्रभुको सामु धूप र आगो राख । परमप्रभुले चुन्‍नुहुने मानिसलाई उहाँको निम्ति अलग गरिनेछ । तिमी लेवीका सन्तानहरू अति धेरै भएका छौ ।”
उद्या अग्नी आणि धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
8 फेरि मोशाले कोरहलाई भने, “सुन, तिमी लेवीका सन्तानहरूः
मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
9 के परमप्रभुको पवित्र वासस्थानमा काम गर्न र समुदायको सेवा गर्न तिनीहरूको सामु खडा हुन इस्राएलको समुदायबाट तिमीहरूलाई छुट्ट्याएको तिमीहरूको निम्ति सानो कुरा हो?
तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?
10 उहाँले तिमीहरू र तिमीहरूका सबै दाजुभाइ, लेवीका सन्तानहरूलाई तिमीहरूसँगै नजिक ल्याउनुभएको छ, अझै तिमीहरूले पुजारी पद पनि खोजिरहेका छौ!
१०परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात.
11 यसैले तिमी र तिमीहरूका सबै समूह सँगसँगै भेला भएका छौ । त्यसैले तिमीहरूले किन हारूनको बारेमा गनगन गरिरहेका छौ, जसले परमप्रभुको आज्ञा पालन गर्छन्?
११तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
12 त्यसपछि मोशाले दातान र अबीराम, एलीआबका छोराहरूलाई बोलाए । तर तिनीहरूले भने, “हामी आउँदैनौँ ।
१२नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही.
13 के हामीलाई दूध र मह बग्‍ने मुलुकबाट यो मरुभूमिमा मार्नलाई ल्याउनु मामुलि कुरा हो? अब तपाईं आफै हाम्रो शासक हुन चाहन्छ!
१३तू आम्हास रानात जिवे मारावे म्हणून दूध व मध वाहण्याच्या देशातून काढून वर आणले आहेस हे काय थोडे आहे. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
14 यसको अतिरिक्‍त, तपाईंले हामीलाई दूध र मह बग्‍ने मुलुकमा ल्याउनुभएको छैन अथवा हामीलाई खेत र दाखबारीहरू उत्तराधिकारको रूपमा दिनुभएको छैन । के अब हामीलाई खोक्रो प्रतिज्ञाले अन्धा बनाउन चाहनुहुन्छ? हामी तपाईंकहाँ आउँदैनौँ ।”
१४आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.
15 मोशा साह्रै रिसाए र परमप्रभुलाई भने, “तिनीहरूको भेटीको कदर नगर्नुहोस् । मैले तिनीहरूबाट एउटा गधा पनि लिएको छैनँ, र मैले तिनीहरू कसैलाई पनि हानि पुर्‍याएको छैनँ ।
१५म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वरास म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्याकडून एक गाढव देखील घेतले नाही! आणि मी कोणाचेही वाईट केले नाही.
16 मोशाले कोरहलाई भने, “भोलि तिमी र तिम्रा सबै दल अर्थात् तिमी, तिनीहरू र हारून परमप्रभुको सामु जानुपर्छ । तिमीहरू हरेकले आ-आफ्ना धुपौरा लिनुपर्छ र यसमा धूप राख्‍नुपर्छ ।
१६नंतर मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील.
17 अनि हरेकले आ-आफ्ना दुई सय पचासवटा धुपौरा परमप्रभुको सामु ल्याउनुपर्छ । तिमी र हारूनले पनि आ-आफ्ना धुपौरा ल्याउनुपर्छ ।”
१७तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यामध्ये धूप टाकावा आणि ते परमेश्वरास द्यावे. नेत्यांसाठी अडीचशे भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
18 यसैले हरेकले आ-आफ्ना धुपौरा लिए, यसमा आगो राखे, यसमा धूप राखे र मोशा र हारूनसँगै भेट हुने पालको प्रवेश-द्वारमा खडा भए ।
१८म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
19 कोरहले सारा समुदायलाई मोशा र हारूनको विरुद्धमा भेट हुने पालको प्रवेश-द्वारमा भेला पारे र परमप्रभुको महिमा सारा समुदायकहाँ देखा पर्‍यो ।
१९कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले.
20 परमप्रभु मोशा र हारूनसँग बोल्नुभयो,
२०परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
21 “यस समुदायबाट अलग होओ, ताकि म तिनीहरूलाई तत्कालै विनाश गर्न सकौँ ।”
२१या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.
22 मोशा र हारून घोप्‍टो परे र भने, “हे परमेश्‍वर, सारा मानव-जातिको आत्माका परमेश्‍वर, एक जनाले पाप गर्दा, के तपाईं सबै समुदायसँग रिसाउनुहुन्छ?”
२२पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.
23 परमप्रभुले मोशालाई जवाफ दिनुभयो,
२३नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
24 “समुदायलाई भन् । 'कोरह, दातान र अबीरामका पालहरूबाट पर जाओ' भन् ।”
२४सर्व लोकांस कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.
25 अनि मोशा खडा भए र दातान र अबीरामको पालमा गए; इस्राएलका धर्म-गुरुहरू तिनको पछि-पछि गए ।
२५मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्यांच्यामागे गेले.
26 तिनले समुदायलाई यसो भने, “यी दुष्‍टहरूका पालहरूबाट हट र तिनीहरूको कुनै पनि कुरा नछोओ नत्रता तिनीहरूका सबै पापद्वारा नष्‍ट हुनेछौ ।”
२६मोशेने सर्व लोकांस बजावले, या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तुला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.
27 यसैले कोरह, दातान र अबीरामका पाल वरिपरिका समुदायले तिनीहरूलाई छोडे । दातान र अबीराम तिनीहरूका पत्‍नीहरू, छोराहरू र स-साना बालबालिकाहरूसहित तिनीहरूका पालको प्रवेश-द्वारमा खडा भए ।
२७म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या स्त्रिया, मुले आणि लहाण्या मुलांबरोबर उभे राहिले.
28 मोशाले भने, “यसैद्वारा यी सबै थोक गर्न मलाई परमप्रभुले पठाउनुभएको छ भन्‍ने तिमीहरूले जान्‍नेछौ, किनभने मैले तिनीहरू मेरो आफ्नै इच्छामा गरेको छैन ।
२८नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हास सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हास दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हास दाखवीन.
29 यदि यी मानिसहरू सामान्य रूपमा हुने स्वाभाविक मृत्युद्वारा मर्छन् भने, मलाई परमप्रभुले पठाउनुभएको होइन ।
२९हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही.
30 तर यदि परमप्रभुले कुनै नयाँ कुरा सृजना गर्नुहुन्छ, धर्तीले आफ्नो मुख उघार्छ र तिनीहरूसाथै तिनीहरूका सबै थोकलाई निल्छ, र तिनीहरू जिउँदै चिहानभित्र जान्छन् भने, यी मानिसहरूले परमप्रभुलाई तिरस्कार गरेका छन् भनी तिमीहरूले बुझ्नुपर्छ ।” (Sheol h7585)
३०पण जर परमेश्वराने या लोकांस वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हास कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांस आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.” (Sheol h7585)
31 मोशाले यी कुराहरू भनी सिद्ध्याउने बित्तिकै ती मानिसहरूमुनिको जमिन फाट्यो ।
३१जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.
32 धर्तीले यसको मुख उघार्‍यो अनि तिनीहरूका परिवारहरू र कोरहसँग भएका सबै मानिसहरूसाथै तिनीहरूका सबै थोकलाई निल्यो ।
३२धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
33 यसैले तिनीहरू र तिनीहरूसँग भएका सबै थोक जिउँदै चिहानभित्र लगिए । धर्ती तिनीहरूमाथि बन्द भयो, र तिनीहरू समुदायबाट नष्‍ट भए । (Sheol h7585)
३३ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले. (Sheol h7585)
34 तिनीहरूका वरिपरि भएका इस्राएलीहरू चिच्‍च्याउँदै भागे । तिनीहरू, “धर्तीले हामीलाई पनि निल्ने भो!” भन्‍दै चिच्‍च्याए ।
३४इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील.
35 अनि परमप्रभुबाट आगोको ज्वाला निस्क्यो र धूप बालेका २५० जना मानिसलाई नष्‍ट गर्‍यो ।
३५नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने धूप जाळणाऱ्या अडीचशे लोकांचा नाश केला.
36 फेरि परमप्रभु मोशासँग बोल्नुभयो,
३६परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला व म्हणाला
37 “पुजारी हारूनका छोरा एलाजारलाई भन् र त्यसले धुपौराहरूलाई आगोबाट निकालोस्, किनभने धुपौराहरू मेरा निम्ति अलग गरिएका छन् । त्यसले बलिरहेका आगोका फिलुङ्गाहरूलाई छरोस् ।
३७याजक अहरोन याचा मुलगा एलाजार याला धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत आणि तो अग्नी पसरावयाला सांग.
38 आफ्नो पापको कारण जीवन गुमाउनेहरूको धुपौराहरू ले । तिनीहरूलाई पिटेर वेदीलाई मोहर्ने पाताहरू बनाइयोस् । ती मानिसहरूले तिनीहरूलाई मेरो निम्ति अर्पण गरे । यसैले तिनीहरूलाई मेरो निम्ति अलग गर । तिनीहरू इस्राएलका मानिसहरूका निम्ति मेरो उपस्थितिको चिन्ह हुने छन् ।
३८लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वरास अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांस हा ताकीद दिल्याचा इशारा असेल.
39 पुजारी एलाजारले आगोले नष्‍ट भएका मानिसहरूले प्रयोग गरेका काँसाका धुपौराहरू लिए र
३९म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही मनुष्यांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठोकला व वेदी मढवली.
40 इस्राएलका मानिसहरूलाई याद दिलाउने कुरा हुनलाई तिनीहरूलाई पिटेर वेदी मोहर्ने बनाइयो, परमप्रभुको सामु धूप बाल्न ताकि हारूनका सन्तान बाहिर कोही पनि नआओस् र परमप्रभुले मोशालाई आज्ञा गर्नुभएझैँ तिनीहरू कोरह र तिनका समूहजस्ता नहोऊन् ।
४०परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
41 तर अर्को बिहान इस्राएलका सबै मानिसको समुदायले मोशा र हारून विरुद्ध गनगन गरे । तिनीहरूले भने, “तिमीहरूले परमप्रभुका मानिसहरूलाई मारेका छौ ।”
४१दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.
42 समुदाय मोशा र हारूनको विरुद्ध भेला हुँदा तिनीहरूले भेट हुने पालतिर हेरे अनि हेर! यसलाई बादलले ढाकिरहेको थियो । परमप्रभुका महिमा देखा पर्‍यो,
४२मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरूद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शनमंडपाकडे पाहिले तेव्हा ढगांनी त्यास झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
43 र मोशा र हारून भेट हुने पालको अघि आए ।
४३हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या पुढच्या भागात आले.
44 अनि परमप्रभुले मोशालाई भन्‍नुभयो,
४४मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
45 “यो समुदायबाट गइहाल् ताकि मैले तिनीहरूलाई अहिलै नष्‍ट पार्न सकौँ ।” अनि मोशा र हारून जमिनमा घोप्टो परे ।
४५त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.
46 मोशाले हारूनलाई भने, “धुपौरा लिनुहोस्, वेदीबाट यसमा आगो हाल्नुहोस्, यसमा धूप हाल्नुहोस्, यसलाई समुदायकहाँ छिटो लानुहोस् र तिनीहरूका निम्ति प्रायश्‍चित्त गर्नुहोस्, किनभने परमप्रभुको क्रोध आइरहेको छ । विपत्ति सुरु भएको छ ।
४६नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.
47 यसैले हारूले मोशाले अह्राएबमोजिम गरे । तिनी समुदायको बिचमा दौडेर गए । विपत्ति मानिसहरूबिच फैलिन थालेको थियो, यसैले तिनले धूप राखे र मानिसहरूका निम्ति प्रायश्‍चित्त गरे ।
४७म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी व धूप घेतला आणि मग तो मंडळीमध्ये धावत गेला. परंतु लोकात मरीची लागण झाली होती आणि त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित केले.
48 हारून जीवित र मृतकहरूका बिचमा खडा भए । यसरी विपत्ति रोकियो ।
४८अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला, अहरोनाने लोकांस पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले आणि मरी तिथेच थांबली.
49 कोरहको विषयमा पनि मरेका अतिरिक्‍त विपत्तिमा मर्नेहरूको सङ्ख्या १४,७०० थियो ।
४९पण त्या मरीमुळे चौदा हजार सातशे लोक मरण पावले. यामध्ये कोरहामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा समावेश नाही.
50 हारून भेट हुने पालको प्रवेश-द्वारमा मोशाकहाँ फर्केर आए र विपत्ति रोकियो ।
५०भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.

< गन्ती 16 >