< नहेम्याह 8 >

1 सारा जनता एउटै मानिसजस्तो गरी पानी ढोकाको सामुन्‍ने खुला क्षेत्रमा भेला भए । तिनीहरूले परमप्रभुले इस्राएललाई आज्ञा दिनुभएको मोशाको व्यवस्थाको पुस्तक ल्याउन भनी शास्‍त्री एज्रालाई भने ।
सर्व इस्राएल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळया जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एज्राला परमेश्वराने इस्राएल लोकांस दिलेले मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले.
2 सातौँ महिनाको पहिलो दिनमा पुजारी एज्राले सुनेर बुझ्न सक्‍ने पुरुष र स्‍त्रीहरू दुवैको समुदायको सामु पुस्तक ल्याए ।
तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षाच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री-पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते.
3 तिनी पानी ढोकाको सामुन्‍नेको खुला क्षेत्रमा फर्के, र तिनले पुरुष र स्‍त्रीहरूको सामु बिहान सबेरैदेखि मध्यदिनसम्म यसबाट पढे, अनि सारा मानिसले व्यवस्थाको पुस्तकलाई ध्यान दिएर सुने ।
एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळया चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले ऐकून समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले.
4 तब शास्‍त्री एज्रा मानिसहरूले त्यस्तै कामको लागि बनाएका काठको उच्‍च मञ्चमा खडा भए । तिनको दाहिनेपट्टि छेउमा मत्तित्याह, शेमा, अनायाह, उरियाह, हिल्कियाह र मासेयाह उभिएका थिए अनि तिनको देब्रेपट्टि पदायाह, मीशाएल, मल्कियाह, हाशूम, हशबदाना, जकरिया र मशुल्लाम उभिएका थिए ।
एज्रा शास्त्री एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.
5 एज्रा सारा मानिसभन्दा माथि उभिएकाले तिनले सबैले देख्‍ने गरी पुस्तक खोले, र तिनले पुस्तक खोल्दा सारा मानिस खडा भए ।
आणि एज्राने ग्रंथ उघडला. एज्रा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळयांना तो दिसत होता. एज्राने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले.
6 एज्राले महान् परमेश्‍वर परमप्रभुलाई धन्यावाद दिए, अनि सारा मानिसले आ-आफ्ना हात उठाएर “आमेन! आमेन!” भने । तब तिनीहरूले आ-आफ्ना शिर झुकाए, र भुइँसम्मै निहुरेर परमप्रभुको आराधना गरे ।
एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले.
7 लेवीहरू येशूअ, बानी, शरेबियाह, यामीन, अक्‍कूब, सब्बतै, होदियाह, मासेयाह, कलीता, अजर्याह, योजाबाद, हानान, पलयाहले मानिसहरूलाई तिनीहरूकै ठाउँमा व्यवस्था बुझ्नलाई मदत गरे ।
बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवीची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया,
8 तिनीहरूले त्यो पुस्तक अर्थात् परमेश्‍वरको व्यवस्था पढे र मानिसहरूले बुझ्न सक्‍ने गरी अर्थ खोलिदिए ।
या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.
9 राज्यपाल नहेम्याह, पुजारीसाथै शास्‍त्री एज्रा र मानिसहरूलाई अर्थ खोलिदिने लेवीहरूले सारा मानिसलाई भने, “यो दिन परमप्रभु तिमीहरूका परमेश्‍वरका लागि पवित्र दिन हो । शोक नगर र नरोओ ।” किनकि तिनीहरूले व्यवस्थाका वचन सुन्दा सारा मानिस रोएका थिए ।
यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांस स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे लोकांस बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा हा पवित्र दिवस आहे. आज दु: खी राहू नका किंवा शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते.
10 तब नहेम्याहले तिनीहरूलाई भने, “आ-आफ्नो बाटो लाग, पुस्टाइएको पशु मारेर खाओ, मिठो पेय पदार्थ पिओ अनि आफ्ना निम्ति तयार पार्न नसक्‍नेहरूका निम्ति पनि थोरै भाग पठाइदेओ किनकि परमप्रभुको आनन्द नै तिमीहरूको शक्ति हो ।”
१०नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु: खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे.”
11 त्यसैले लेवीहरूले यसो भन्दै मानिसहरूलाई शान्त गराए, “चुप लाग, किनकि यो दिन पवित्र छ । शोक नगर ।”
११लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांस शांत केले. आणि म्हणाले, “शांत व्हा, आजचा दिवस पवित्र आहे. शोक करु नका.”
12 तब सारा मानिस खानपान गर्न, पिउन, भोजन बाँडचुँड गर्न र बडो आनन्दसाथ उत्सव मनाउन आ-आफ्नो बाटो लागे किनकि तिनीहरूलाई बताइएका वचनहरू तिनीहरूले बुझेका थिए ।
१२मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची वचने त्यांना अखेर समजली.
13 दोस्रो दिनमा सारा मानिसका परिवार-परिवारका मुख्य-मुख्य मानिसहरू, पुजारीहरूसाथै लेवीहरू व्यवस्थाका वचनहरूबाट अन्तर्ज्ञान प्राप्‍त गर्न शास्‍त्री एज्राकहाँ आए ।
१३यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एज्रा शास्त्रीला तसेच याजकांना व लेवींना भेटायला गेले. नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी ते जमले.
14 सातौँ महिनाको चाडमा इस्राएलीहरू छाप्रोमा बस्‍नपर्छ भनी परमप्रभुले मोशाद्वारा आज्ञा गर्नुभएको वचन तिनीहरूले व्यवस्थामा लेखिएको भेट्टाए ।
१४परमेश्वराने मोशेद्वारे लोकांस हे नियमशास्त्र दिले. त्यामध्ये यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी या सणा दरम्यान तात्पुरत्या तंबूत रहावे.
15 तिनीहरूले तिनीहरूका सबै सहर र यरूशलेममा यसो भन्दै घोषणा गर्नुपर्छ, “लेखिएअनुसार छाप्रा बनाउनलाई पहाडी देशमा गएर जैतून, जङ्गली जैतून, मेहदी, खजूरका हाँगाहरूसाथै अन्य पातहरू भएका हाँगाहरू लिएर आओ ।”
१५लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरूशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी की, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांचे तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”
16 तब मानिसहरू बाहिर गए, र हाँगाहरू ल्याए अनि हरेकले आ-आफ्नो निम्ति घरको छाना र चोकमा, परमेश्‍वरका भवनका चोकहरूमा, पानी ढोकाको सामुन्‍नेको चोकमा र एफ्राएमका ढोकाको चोकमा छाप्राहरू बनाए ।
१६तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी फांद्या आणल्या आणि त्यापासून स्वत: साठी आपल्या धाब्यावर आणि स्वतःच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले.
17 निर्वासनबाट फर्केकाहरू सबै समुदायले छाप्राहरू बनाई तिनमा बसे । किनकि नूनका छोरा यहोशूको समयदेखि त्यस दिनसम्म इस्राएलीहरूले यो चाड मनाएका थिएनन् । त्यसैले तिनीहरू बडो आनन्दित भए ।
१७बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी मांडव उभारले व त्यामध्ये ते राहिले. नूनचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्राएलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.
18 यसबाहेक, पहिलो दिनदेखि पछिल्लो दिनसम्म दिनप्रतिदिन एज्राले परमेश्‍वरको व्यवस्थाको पुस्तकबाट पढ्ने गर्थै । तिनीहरूले सात दिनसम्म चाड मनाए, र आज्ञाअनुसार आठौँ दिनमा पवित्र सभा थियो ।
१८प्रतिदिवशीही, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचीत होता. त्यांनी सात दिवस हा सण साजरा केला आणि नियमानुसार विधीपूर्वक आठव्या दिवशी सभा भरून पाळला.

< नहेम्याह 8 >