< नहेम्याह 4 >
1 हामीले पर्खाल निर्माण गरिरहेका थियौँ भनी जब सन्बलतले सुने तिनी डाहले जले र अत्यन्तै क्रोधित भए, अनि यहूदीहरूको खिसी गरे ।
१आम्ही यरूशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
2 तिनका दाजुभाइहरू र सामरियाका सेनाको उपस्थितिमा तिनले भने, “यी निर्बल यहूदीहरू के गर्दै छन्? के तिनीहरू आफैले सहरको पुनर्स्थापना गर्ने छन्? के तिनीहरूले बलिदानहरू चढाउने छन्? के तिनीहरूले एकै दिनमा काम सक्ने छन्? ती जलिसकेका कसिङ्गरको थुप्रोबाट के तिनीहरूले ढुङ्गाहरूलाई पुनर्जीवित पार्न सक्छन्?
२सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”
3 तिनीसँगै भएका अम्मोनी तोबियाले भने, “तिनीहरूले निर्माण गरेरहेको वस्तुमा एउटा फ्याउरो चढ्यो भने पनि तिनीहरूको पर्खाल भत्कने छ!”
३तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.”
4 हे हाम्रा परमेश्वर, सुन्नुहोस्, किनकि हामीलाई अपमान गरिएको छ । तिनीहरूका गिल्ला तिनीहरूकै शिरमाथि फर्काइदिनुहोस्, र तिनीहरू कैदीहरूको देशमा लुटका माल बनून् ।
४आमच्या देवा, ऐक कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्यामस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो.
5 तपाईंको सामुबाट तिनीहरूको अपराध नढाक्नुहोस्, र तिनीहरूको पाप नमेटिदिनुहोस्, किनकि तिनीहरूले निर्माणकर्ताहरूलाई रिस उठाएका छन् ।
५त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयांदेखत केलेल्या पापांची क्षमा करु नकोस. कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे.
6 यसरी हामीले आधा उचासम्म सबै पर्खाल निर्माण गर्यौँ, किनकि मानिसहरूमा काम गर्ने इच्छा थियो ।
६यरूशलेमचा कोट आम्ही बांधला. व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला कारण लोकांनी मनापासून काम केले.
7 तर यरूशलेमका पर्खालहरू मर्मत गर्ने काम अगाडि बढिरहेको थियो र पर्खालमा भत्किएका भागहरू टालिँदै थिए भनी जब सन्बलत, तोबिया, अरबीहरू, अम्मोनीहरू र अश्दोदीहरूले सुने तिनीहरू रिसले आगो भए ।
७पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
8 तिनीहरू सबै मिलेर षड्यन्त्र रचे, र तिनीहरू यरूशलेमको विरुद्धमा र यसमा भ्रम उत्पन्न गर्न आए ।
८तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरूशलेमेविरुध्द हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला.
9 तर हामीले हाम्रा परमेश्वरलाई प्रार्थना चढायौँ, र तिनीहरूको धम्कीको कारणले दिनरात तिनीहरूको विरुद्धमा सुरक्षा दिने पहरेदार राख्यौँ ।
९पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
10 तब यहूदाका मानिसहरूले भने, “भारी बोक्नेहरूको ताकत घट्दै छ । कसिङ्गरहरू थुप्रै छन्, र हामी पर्खाल पुनर्निर्माण गर्न सक्दैनौँ ।”
१०मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.”
11 हाम्रा शत्रुहरूले भने, “तिनीहरूले थाहा पाउनुअगि र तिनीहरूले देख्नुअगि तिनीहरूका बिचमा आएर तिनीहरूलाई मारी काम रोकिदिन्छौँ ।”
११आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”
12 त्यस बेला तिनीहरूको नजिक बस्ने यहूदीहरू सबै दिशाबाट आएर तिनीहरूले हाम्रो विरुद्धमा रचेका षड्यन्त्रहरूको बारेमा चेताउनी दिँदै हामीलाई दस पटक बताए ।
१२त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले.
13 त्यसैले मैले खुल्ला क्षेत्रहरूमा पर्खालका सबैभन्दा तल्लो भू-भागहरूमा मानिसहरूलाई बसाएँ । मैले हरेक परिवारलाई आ-आफ्ना तरवार, भाला र धनुर्बाण लिएर बस्न लगाएँ ।
१३तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती.
14 तब मैले हेरेँ, र खडा भएर अधिकारीहरू, शासकहरू र बाँकी मानिसहरूलाई भनेँ, “तिनीहरूदेखि नडराओ । प्रभुलाई सम्झनुहोस् जो महान् र भययोग्य हुनुहुन्छ । आ-आफ्ना परिवाहरू, छोराछोरीहरू, पत्नीहरू र घरहरूका लागि लड्नुहोस् ।”
१४सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.”
15 जब हामीले हाम्रा शत्रुहरूका योजनाहरू थाहा पायौँ र परमेश्वरले तिनीहरूका योजनाहरू विफल पारिदिनुभयो भनी तिनीहरूले सुने, हामी सबै आ-आफ्नो काम गर्न पर्खालमा फर्क्यौं ।
१५आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला.
16 त्यस समयदेखि मेरा आधा सेवकहरूले केवल पर्खाल पुनर्निर्माण गर्थे भने आधा बाँकी सेवकहरू भाला, ढाल, धनुर्बाण र झिलम लाएर बस्थे । अगुवाहरूचाहिँ यहूदाका सबै मानिसहरूको पछाडि बस्थे ।
१६त्यादिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते.
17 पर्खालको निर्माण गरिरहेका र भारी बोकिरहेका उही मजदुरहरूले पनि आ-आफैलाई सुरक्षा दिइरहेका हुन्थे । हरेकले एउटा हातले काम गर्थ्यो भने अर्को हातले आफ्नो हतियार समाउँथ्यो ।
१७बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
18 हरेक निर्माणकर्ताले आफ्नो तरवार भिरेर काम गर्थ्यो । तुरही बजाउनेचाहिँ मेरो छेउमा बस्थ्यो ।
१८तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता.
19 मैले अगुवाहरू, अधिकारीहरू र बाँकी मानिसहरूलाई भने, “काम विशाल र बृहत् छ, अनि हामी पर्खालमा एक-अर्कादेखि छुट्टिएका छौँ ।
१९मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
20 तिमीहरूले जहाँबाट तुरही बजेको सुन्छौ त्यहीँ भेला हतार गर । हाम्रा परमेश्वर हाम्रो पक्षमा लड्नुहुने छ ।”
२०तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल.”
21 यसरी हामीले काम गर्दै थियौँ । आधा मानिसहरूले सूर्योदयदेखि सूर्यास्तसम्म तरवार भिर्दै थिए ।
२१अशाप्रकारे आम्ही यरूशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत.
22 त्यस बेला मानिसहरूलाई मैले यो पनि भनेँ, “रातमा हाम्रा लागि पहरा दिन र दिनमा काम गर्न हरेक मानिस र त्यसको सेवकले यरूशलेमको बिचमा रात बिताओस् ।”
२२त्यावेळी मी लोकांस असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरूशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
23 न मैले, न मेरा दाजुभाइहरूले, न मेरा सेवकहरूले, न मलाई पछ्याउने पहरेदारहरूले आफ्ना लुगाहरू बद्लियौँ । पानी पिउन जाँदा पनि हरेकले आ-आफ्नो तरवार बोक्थ्यो ।
२३मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जातानासुद्धा आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धारण करीत असे.