< नहेम्याह 13 >
1 त्यस दिन तिनीहरूले मानिसहरूले सुन्ने गरी मोशाको व्यवस्था पढे । कुनै अम्मोनी वा मोआबी कहिल्यै पनि परमेश्वरको सभामा आउनुहुँदैन भनी त्यसमा लेखिएको भेट्टाइयो ।
१त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही.
2 किनकि तिनीहरू रोटी र पानी लिएर इस्राएलीहरूकहाँ आएका थिएनन्, तर तिनीहरूले इस्राएललाई सराप दिन बालामलाई भाडामा लिएका थिए । तथापि हाम्रा परमेश्वरले सरापलाई आशिष्मा परिणत गरिदिनुभयो ।
२या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
3 तिनीहरूले व्यवस्था सुन्नेबित्तिकै तिनीहरूले इस्राएलबाट हरेक विदेशीबाट अलग गराए ।
३हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले.
4 अब योभन्दा पहिले पुजारी एल्यासीब हाम्रा परमेश्वरको मन्दिरका भण्डार-कोठाहरूका जिम्मावाल नियुक्त भएका थिए । तिनको तोबियासित सम्बन्ध थियो ।
४यापूर्वीच याजक एल्याशीबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबीयाचा नातलग होता. एल्याशीबाने तोबीयासाठी एक मोठे भांडार तयार केले होते जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात.
5 एल्यासीबले तोबियाको लागि एउटा ठुलो भण्डार-कोठा तयार पारेका थिए जहाँ पहिले तिनीहरूले लेवीहरू, गायकहरू, द्वारपालहरूका निम्ति अन्नबलि, धूप, काठपातहरू, अन्नका दशांशहरू, नयाँ दाखमद्य र तेल अनि पुजारीहरूका निम्ति दान राख्ने गर्थे ।
५जे लेवी, गायक व द्वारपाल यांच्यासाठी लागणारा धान्याचा दशामांश, नवीन द्राक्षरस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशांची अर्पणे तेथे ठेवली जात.
6 तर यी सबै समयमा म यरूशलेममा थिइनँ । किनकि बेबिलोनका राजा अर्तासास्तको बत्तिसौँ वर्षमा म राजाकहाँ गएको थिएँ । केही समयपछि फर्केर जान मैले राजालाई अनुमति मागेँ,
६परंतु हे घडताना मी यरूशलेमेमध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी बाबेलला गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली,
7 र म यरूशलेम फर्कें । परमेश्वरको मन्दिरका चोकहरूमा एल्यासीबले तोबियालाई भण्डार-कोठा दिएर तिनले गरेको दुष्टतालाई मैले बुझेँ ।
७आणि मी यरूशलेमेला परतलो. एल्याशीबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशीबाने तोबीयाला खोली दिलेली होती.
8 म सार्हैँ रिसाएँ, र मैले भण्डार-कोठाबाट तोबियाका सबै सरसामानहरू फालिदिएँ ।
८मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.
9 भण्डार-कोठाहरू शुद्ध पारिऊन् भनी मैले आज्ञा दिएँ, अनि मैले परमेश्वरका मन्दिरका सामानहरू, अन्नबलिहरू र धूप फेरि त्यहाँ राखेँ ।
९त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
10 लेवीहरूलाई तिनीहरूको भाग दिइएको रहेनछ, अनि लेवीहरूसाथै काम गर्ने गायकहरू आ-आफ्नो जग्गामा भागेर गएका रहे छन् भनी मैले थाहा पाएँ ।
१०लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते.
11 त्यसैले मैले अधिकारीहरूको सामना गरी तिनीहरूलाई भनेँ, “परमेश्वरको मन्दिरलाई किन बेवास्ता गरिएको?” मैले तिनीहरूलाई जम्मा गरी तिनीहरूकै पदमा नियुक्त गरेँ ।
११म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले.
12 तब सारा यहूदाले अन्नको दशांश, नयाँ दाखमद्य र तेल भण्डार-कोठाहरूभित्र ल्याए ।
१२त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या.
13 मैले पुजारी शेलेम्याह, शास्त्री सादोक र लेवीहरूबाट पदायाहलाई भण्डार-कोठाहरूको कोषाध्यक्षको रूपमा नियुक्त गरेँ । जक्कूरका छोरा, मत्तन्याहका नाति हानानलाई तिनीहरूका सहायकको रूपमा नियुक्त गरेँ किनकि तिनीहरू भरोसायोग्य ठानिएका थिए । तिनीहरूका सहायकहरूका खानेकुराहरू वितरण गर्नु नै तिनीहरूको कर्तव्य थियो ।
१३कोठारांवर या मनुष्यांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते.
14 हे मेरा परमेश्वर, यस विषयमा मेरो सम्झना गर्नुहोस्, अनि मेरा परमेश्वरको मन्दिर र यसका सेवाहरूमा मैले गरेका असल कार्यहरूलाई नमेटिदिनुहोस् ।
१४देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.
15 ती दिनमा मैले यहूदामा मानिसहरूले शबाथमा कोल पेलिरहेका, अन्नका भारीहरू ल्याइरहेका, अनि दाखमद्य, दाख, नेभारा र सबै किसिमका भारीहरू गधाहरूमाथि लादेर शबाथ-दिनमा यरूशलेममा ल्याएको देखेँ । त्यस दिन तिनीहरूले खानेकुरा बेच्दै थिए भनी मैले विरोध जनाएँ ।
१५यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते.
16 यरूशलेममा बस्ने टुरोसका मानिसहरूले माछासाथै सबै किसिमका खानेकुरा ल्याए, अनि शबाथमा तिनीहरूले यहूदा र सहरका मानिसहरूलाई ती चिजहरू बेचे ।
१६सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत.
17 तब मैले यहूदाका मानिसहरूको सामना गरेँ, “शबाथ-दिनलाई अपवित्र पारी तपाईंहरूले यो दुष्ट काम गर्नुको अर्थ के हो?
१७यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात.
18 के तपाईंहरूका पुर्खाहरूले यसै गरेका होइनन् र? के हाम्रा परमेश्वरले हामी र हाम्रो सहरमाथि यी सबै खराबी ल्याउनुभएको होइन र? अब शबाथलाई अपवित्र पारी तपाईंहरूले इस्राएलमाथि अझै धेरै क्रोध ल्याउँदै हुनुहुन्छ ।”
१८तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.”
19 शबाथअगि यरूशलेमका प्रवेश-द्वारहरूमा साँझ पर्नेबित्तिकै ती बन्द गरेर शबाथ नसकिएसम्म नखोलिऊन् भनी मैले आज्ञा दिएँ । शबाथ-दिनमा कुनै भारी भित्र लैजान नसकियोस् भनेर प्रवेश-द्वारहरूमा मैले मेरा केही सेवकहरू नियुक्त गरेँ ।
१९प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही.
20 सबै किसिमका सामान ल्याउने र बेच्नेहरूले एक-दुई पटक यरूशलेमबाहिरै छाउनी हाले ।
२०एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.
21 तर मैले तिनीहरूलाई चेताउनी दिएँ, “तपाईंहरू किन पर्खालबाहिर छाउनी हाल्नुहुन्छ? तपाईंहरूले फेरि यसो गर्नुभयो भने म तपाईंहरूलाई कारबाही गर्ने छु ।” त्यस समयदेखि तिनीहरू शबाथमा आएनन् ।
२१मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत.
22 तब मैले लेवीहरूलाई आ-आफूलाई शुद्ध पारी शबाथलाई पवित्र पार्न प्रवेशद्वारहरूको पहरा दिनू भनी आज्ञा दिएँ । हे मेरा परमेश्वर, मप्रति तपाईंको करारको बफादारीको कारणले यसको लागि पनि मलाई सम्झनुहोस्, र मलाई दया देखाउनुहोस् ।
२२मग मी लेवींना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे.
23 ती दिनमा अश्दोद, अम्मोन र मोआबका स्त्रीहरूलाई बिहे गर्ने यहूदीहरूलाई पनि मैले देखेँ ।
२३त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.
24 तिनीहरूका सन्तानमध्ये आधाले अश्दोदको भाषा बोल्थे । तिनीहरूमध्ये कसैले पनि यहूदाको भाषा बोल्न सक्दैनथ्यो, तर ती मानिसहरूको कुनै एउटा भाषा बोल्दथे ।
२४आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत परंतु त्यांना यहूदी भाषा येत नव्हती, पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते.
25 मैले तिनीहरूको सामना गरी तिनीहरूलाई सराप दिएँ, र केहीलाई हिर्काएँ र तिनीहरूको जगल्टा लुछेँ । मैले तिनीहरूलाई यसो भनी परमेश्वरको नाउँमा शपथ खान लगाएँ, “तिमीहरूले आफ्ना छोरीहरू तिनीहरूका छोराहरूलाई नदिनू अथवा तिनीहरूका छोरीहरू आफ्ना छोराहरू वा आफ्नै लागि नलिनू ।
२५आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका.
26 के यी स्त्रीहरूकै कारणले इस्राएलका राजा सोलोमनले पाप गरेका होइनन् र? जाति-जातिहरूका बिचमा तिनीजस्ता राजा कोही थिइनन्, र तिनका परमेश्वरले तिनलाई प्रेम गर्नुहुन्थ्यो, अनि परमेश्वरले सारा इस्राएलमाथि तिनलाई राजा बनाउनुभयो । तथापि, तिनका विदेशी पत्नीहरूले तिनलाई पाप गर्न लगाए । के तपाईंहरूको कुरा सुनी यी सबै दुष्ट काम गर्ने अनि विदेशी स्त्रीहरूसित बिहे गरी हाम्रा परमेश्वरलाई धोका दिने?”
२६अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.
27 प्रधान पुजारी एल्यासीबका छोरा योयादाको एक जना छोरो होरोनी सन्बलतको ज्वाइँ रहेछ । त्यसकारण मैले त्यसलाई मेरो उपस्थितिबाट भाग्न लगाएँ ।
२७तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरूद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय?”
28 हे मेरा परमेश्वर, तिनीहरूलाई सम्झनुहोस्, किनकि तिनीहरूले पुजारीको पद, यसको करार र लेवीहरूलाई दुषित पारेका छन् ।
२८योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्यासमोरून हाकून लावले.
29 यसरी मैले तिनीहरूलाई हरेक विदेशीबाट शुद्ध पारेँ, अनि पुजारीहरूसाथै लेवीहरूलाई तिनीहरूको आ-आफ्नै कर्तव्यमा स्थापित गराएँ ।
२९हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर.
30 मैले तोकिएको समयमा दाउराको भेटी र अगौटे फलहरू उपलब्ध गराएँ ।
३०याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या.
31 हे मेरा परमेश्वर, सदासर्वदा मेरो सम्झना गर्नुहोस् ।
३१लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर.