< आमोस 1 >
1 तकोका गोठालामध्ये एक जना आमोसले इस्राएलका विषयमा प्रकाशमा पाएका कुराहरू यी नै हुन् । भुकम्प जानुभन्दा दुई वर्षअगाडि यहूदाका राजा उज्जियाहका दिनमा, र येहोआशका छोरा इस्राएलका राजा यारोबामका दिनमा पनि तिनले यी कुराहरू प्राप्त गरे ।
१तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.
2 तिनले भने, “परमप्रभु सियोनबाट गर्जनुहुनेछ । उहाँले यरूशलेमबाट आफ्नो आवाज उठाउनुहुनेछ । गोठालाहरूका खर्कहरू सुक्नेछन् । कार्मेलको टाकुरो ओइलाउनेछ ।”
२तो म्हणाला: सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल, तो यरूशलेमेतून आपला शब्द उच्चारील. मेंढपाळांची कुरणे शोक करतील, आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल.
3 परमप्रभु यसो भन्नुहुन्छः “दमस्कसका तिन वा चारवटा पापका निम्ति समेत, दण्ड दिनबाट म पछि हट्नेछैनँ, किनभने तिनीहरूले गिलादलाई फलामका औजारहरूले नाश पारे ।
३परमेश्वर असे म्हणतो, “कारण दिमिष्काच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे.
4 हजाएलको घरानामा म आगो पठाउनेछु, र त्यसले बेन-हददका किल्लाहरू भस्म पार्नेछ ।
४मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन; आणि तो अग्नी बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकीन.
5 म दमस्कसका मूल ढोकाका गजबारहरू भाँच्नेछु र आवन उपत्यकामा राज्य गर्नेलाई, र बेथ-अदनमा राजदण्ड लिनेलाई समेत म टुक्राटुक्रा पार्नेछु । अरामका मानिसहरू निर्वासित भएर कीरमा जानेछन्,” परमप्रभु भन्नुहुन्छ ।
५मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन, आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन. आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.” असे परमेश्वर म्हणतो.
6 परमप्रभु यसो भन्नुहुन्छ, “गाजाका तिन वा चारवटा पापका निम्ति समेत, दण्ड दिनबाट म पछि हट्नेछैनँ, किनभने तिनीहरूले सम्पूर्ण मानिसलाई कैदी बनाएर, एदोमको हातमा सुम्पन लगे ।
६आणि परमेश्वर असे म्हणतो, “गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस गुलाम म्हणून नेले, ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे.
7 गाजाका पर्खालहरूमा म आगो पठाउनेछु र त्यसले त्यसका किल्लाहरू भस्म पार्नेछ ।
७म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन. आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील.
8 अश्दोदमा बस्ने मानिस, र अश्कलोनको राजदण्ड लिने मानिसलाई म टुक्राटुक्रा पार्नेछु । एक्रोनको विरुद्ध म आफ्ना हात उठाउनेछु, र बाँकी रहेका पलिश्तीहरू नाश हुनेछन्,” परमप्रभु परमेश्वर भन्नुहुन्छ ।
८मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन. एक्रोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन. आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.” असे परमेश्वर देव म्हणतो.
9 परमप्रभु यसो भन्नुहुन्छः “टुरोसका तिन वा चारवटा पापका निम्ति समेत, दण्ड दिनबाट म पछि हट्नेछैनँ, किनभने तिनीहरूले सम्पूर्ण मानिसलाई एदोममा सुम्पेका छन्, र आफ्नो भ्रातृत्व करार तिनीहरूले तोडेका छन् ।
९परमेश्वर असे म्हणतो, “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.
10 टुरोसका पर्खालहरूमा म आगो पठाउनेछु, र त्यसले उसका किल्लाहरूलाई भस्म पार्नेछ ।”
१०म्हणून सोराच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करील.”
11 परमप्रभु यस्तो भन्नुहुन्छ, “एदोमका तिन वा चारवटा पापका निम्ति समेत, दण्ड दिनबाट म पछि हट्नेछैनँ, किनभने त्यसले आफ्नो भाइलाई तरवारले खेद्यो, र सबै दयालाई त्यागिदियो । त्यसको रिस निरन्तर बढ्यो, र त्यसको क्रोध सदाको निम्ति रह्यो ।
११परमेश्वर असे म्हणतो, “अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला. आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.
12 तेमानमा म आगो पठाउनेछु, र त्यसले बोज्राका दरबारहरूलाई भस्म पार्नेछ ।”
१२म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”
13 परमप्रभु यसो भन्नुहुन्छ, “अम्मोनका तिन वा चारवटा पापका निम्ति समेत, दण्ड दिनबाट म पछि हट्नेछैनँ, किनभने तिनीहरूले आफ्नो सीमा बढाउन सकून् भनेर, गिलादका गर्भवती स्त्रीहरूका पेट चिरे ।
१३परमेश्वर असे म्हणतो, “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले, ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.
14 रब्बाका पर्खालहरूमा म आगो बाल्नेछु, र युद्धको दिनको चिच्याहट, र हुरीबतासमा हुने आँधीको दिनको, आवाज निकालेर दरबारहरूलाई भस्म पार्नेछ ।
१४म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन, त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी आरडाओरड होत असतांना, आणि वावटळीच्या दिवशी वादळाने, ती त्याचे महाल खाऊन टाकील.
15 तिनीहरूका राजा, त्योसँगै त्यसका अधिकारीहरू समेत कैदमा जानेछन्,” परमप्रभु भन्नुहुन्छ ।
१५आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.” असे परमेश्वर म्हणतो.