< १ राजाहरू 14 >

1 त्यस बेला यारोबामको छोरो अबिया अत्यन्तै बिरामी पर्‍यो ।
याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.
2 यारोबामले आफ्नी पत्नीलाई भने, “उठ र तिमी मेरी पत्नी हौ भनी नचिन्नलाई आफ्नो भेष बदली गर । अनि शीलोमा जाऊ किनकि अहियाह अगमवक्ता त्यहीँ छन् । यी मानिसहरूमाथि म नै राजा हुनेथिएँ भनी मेरो बारेमा बताउने तिनी नै थिए ।
तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.
3 आफ्नो साथमा दसवटा रोटी, केही फुरौला र एक भाँडो मह लिएर अहियाहकहाँ जाऊ । बालकलाई के हुने छ भनी तिनले तिमीलाई बताउने छन् ।”
यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
4 यारोबामकी पत्नीले त्यसै गरिन् । उनी बाटो लागिन् र शीलोमा गइन्, र अहियाहको घरमा आइन् । अहियाहले देख्न सक्दैनथे । तिनको वृद्धावस्थाको कारणले तिनले आफ्ना आँखाको ज्योति गुमाएका थिए ।
मग यराबामाने सांगितल्यावरून त्याची पत्नी शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्यास अंधत्वही आले होते.
5 परमप्रभुले अहियाहलाई भन्नुभयो, “हेर्, यारोबामकी पत्नी आफ्नो छोरोको बारेमा तँबाट सल्लाह लिन आउँदै छे किनकि त्यसको छोरो बिरामी परेको छ । तैँले यस्तो-यस्तो जवाफ दिनू किनकि त्यो अर्कै स्त्री भएझैँ त्यसले नाटक गर्छे ।”
पण परमेश्वराने त्यास सूचना केली, “यराबामाची पत्नी आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे. मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्यास सांगितले. यराबामाची पत्नी अहीयाच्या घरी आली. लोकांस कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.”
6 उनी ढोकामा आइपुग्दा अहियाहले उनको खुट्टाको आवाज सुने, र भने, “हे यारोबामकी पत्नी, भित्र आऊ । किन तिमी अर्कै स्त्री भएझैँ नाटक गर्छ्यौ? म खराब समाचारसहित तिमीकहाँ पठाइएको छु ।
अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची पत्नी ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
7 गएर यारोबामलाई भन कि इस्राएलका परमेश्वर परमप्रभु भन्नुहुन्छ, 'मैले तँलाई मेरो जाति इस्राएलमाथि अगुवा हुनलाई मानिसहरूका बिचबाट उठाएँ ।
परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
8 मेरो दृष्टिमा जे ठिक छ त्यही गर्न अनि मेरा आज्ञाहरू पालन गर्न र सारा ह्रदयले मेरो पछि लाग्ने मेरा दास दाऊदजस्तै तँ नभए तापनि मैले दाऊदको घरानाबाट राज्य टुक्र्याई त्यो तँलाई दिएँ ।
यापूर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन: पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे.
9 तर तैँले तँभन्दा अगिका सबैले भन्दा दुष्ट काम गरेको छस् । तैँले अरू देवताका मूर्तिहरू र ढालेर बनाएका धातुका प्रतिमूर्तिहरू बनाएर मलाई रिस उठाएको छस्, र मलाई तेरो पीठपछि राखेको छस् ।
पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
10 त्यसकारण हेर्, म तेरो परिवारमा विपत्ति ल्याउने छु । चाहे कमारा होस् या फुक्का, म इस्राएलको हरेक पुरुष बालकलाई खतम पारिदिने छु, र तेरो घरानालाई गोबर जलाएझैँ पूर्ण रूपमा हटाइदिने छु ।
१०तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन.
11 तेरो घरानाको हरेक व्यक्ति जो यस सहरमा मर्छ, त्यसलाई कुकुरहरूले खाने छन्, अनि खेतमा मर्ने जोसुकैलाई आकाशका चराचुरुङ्गीहरूले खाने छन् किनकि म परमप्रभुले यसो भनेको छु ।'
११यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.
12 त्यसैले हे यारोबामकी पत्नी, उठेर आफ्नो घर फर्केर जाऊ । तिमी सहरमा प्रवेश गर्दा तिम्रो बालक अबिया मर्ने छ ।
१२अहीया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे.
13 सारा इस्राएलले त्यसको निम्ति शोक गर्ने छन् र त्यसलाई गाड्ने छन् । यारोबामको परिवारबाट चिहानमा जाने त्यही मात्र हुने छ किनकि यारोबामको घरबाट त्यसले मात्र इस्राएलका परमेश्वर परमप्रभुको दृष्टिमा निगाह पायो ।
१३सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे.
14 साथै, त्यस दिन परमप्रभुले इस्राएलबाट एक जना राजा उठाउनुहुने छ जसले यारोबामको परिवारलाई खतम पारिदिने छ । आज नै त्यही दिन हो ।
१४परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लवकरच घडेल.
15 किनकि पानीमा निगालो हल्लिएझैँ परमप्रभुले इस्राएललाई हल्लाउनुहुने छ, र उहाँले तिनीहरूका पिता-पुर्खाहरूलाई दिनुभएको यस असल देशबाट जरैदेखि उखेलिदिनुहुने छ । उहाँले तिनीहरूलाई यूफ्रेटिस नदीभन्दा पारि तितर-बितर पारिदिनुहुने छ किनकि तिनीहरूले अशेराका खम्बाहरू बनाई परमप्रभुलाई रिस उठाएका छन् ।
१५मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांस उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्यास संताप आला.
16 यारोबामले पाप गरेका कारण र तिनले इस्राएललाई पाप गर्न लगाएकाले उहाँले इस्राएललाई त्यागिदिनुहुने छ ।”
१६आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांस पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
17 त्यसैले यारोबामकी पत्नी उठिन् र बाटो लागिन् अनि तिर्सामा आइन् । उनले आफ्नो घरको सँघार टेक्दा बालक मर्‍यो ।
१७यराबामाची पत्नी तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला.
18 सारा इस्राएलले त्यसलाई गाडे, र त्यसको निम्ति शोक गरे जस्तो परमप्रभुले आफ्ना दास अहियाह अगमवक्ताद्वारा भन्नुभएको थियो ।
१८सर्व इस्राएल लोकांस त्याच्या मृत्यूचे दु: ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
19 यारोबामका अन्य कामहरूको बारेमा अर्थात् कसरी तिनले युद्ध गरे र शासन गरे भन्ने विषयमा इस्राएलका राजाहरूको इतिहासको पुस्तकमा लेखिएका छन् ।
१९राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
20 यारोबामले बाइस वर्ष शासन गरे, र त्यसपछि तिनी आफ्ना पित्रहरूसित सुत्न गए, अनि तिनको ठाउँमा तिनका छोरा नादाब राजा भए ।
२०यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.
21 सोलोमनका छोरा रहबामले यहूदामा शासन गर्दै थिए । रहबाम राजा हुँदा तिनी एकचालिस वर्षका थिए । तिनले परमप्रभुले आफ्नो नाउँ राख्न इस्राएलका सबै कुलबाट चुन्नुभएको सहर यरूशलेममा सत्र वर्ष शासन गरे । तिनकी आमाको नाउँ नामा थियो जो एक अम्मोनी स्त्री थिइन् ।
२१शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरूशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत: च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती.
22 यहूदाले परमप्रभुको दृष्टिमा जे खराब छ त्यही गरे । तिनीहरूका पिता-पुर्खाहरूले गरेका पापभन्दा बढी पाप गरेर तिनीहरूले उहाँलाई डाही तुल्याए ।
२२यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.
23 किनकि तिनीहरूले पनि आफ्ना लागि प्रत्येक उच्च स्थान र हरियो रुखमुनि डाँडाका ठाउँहरू, ढुङ्गाका मूर्तिहरू र अशेराका खम्बाहरू बनाए ।
२३या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या.
24 त्यस देशमा झुटा धर्मसम्बन्धी वेश्याहरू पनि थिए । परमप्रभुले इस्राएलीहरूकै सामुबाट धपाउनुभएका जातिहरूले अभ्यास गरेका घिनलाग्दा कार्यहरू नै तिनीहरूले गरे ।
२४परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापूर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता.
25 राजा रहबामको शासनकालको पाँचौँ वर्षमा मिश्रका राजा शीशकले यरूशलेमको विरुद्धमा आक्रमण गरे ।
२५रहबामाच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरूशलेमेवर स्वारी केली.
26 तिनले परमप्रभुको मन्दिर र राजको महलका खजानाहरू लिएर गए । तिनले हरेक कुरो लिएर गए । तिनले सोलोमनले बनाएका सुनका ढालहरू पनि लिएर गए ।
२६त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरूशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली त्याने नेल्या.
27 राजा रहबामले तिनको सट्टामा काँसाका ढालहरू बनाए, र राजाको महलको ढोकाहरूको रक्षा गर्ने रक्षकहरूका हातमा जिम्मा दिए ।
२७मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.
28 राजा परमप्रभुको मन्दिरमा प्रवेश गर्दा ती रक्षकहरूले ती ढालहरू बोक्थे । त्यसपछि तिनीहरूले ती रक्षक कोठामा ल्याएर राख्ने गर्थे ।
२८राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
29 रहबामले गरेका अरू सबै कामहरूको बारेमा के यहूदाका राजाहरूको इतिहासको पुस्तकमा लेखिएका छैनन् र?
२९यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
30 रहबाम र यारोबामको बिचमा युद्ध चलिरह्‍यो ।
३०रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
31 यसरी रहबाम आफ्ना पित्रहरूसित सुत्न गए, र तिनीहरूसँगै दाऊदको सहरमा गाडिए । तिनकी आमाको नाउँ नामा थियो जो अम्मोनी स्त्री थिइन् । तिनको ठाउँमा तिनका छोरा अबिया राजा भए ।
३१रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्यास पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.

< १ राजाहरू 14 >