< Baebrania 7 >

1 Yai eno Melkizedeki, mpwalu wa Salemu kuhani wa Nnongo wa kunani, abwanagine ni Abrahamu kabuya kuoma kuabulaga apwalume ni kumbariki.
हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला.
2 Abrahamu kaampaya jimo ya komi ya kila kilebe sa abi atweti. Lina lake “Melkizedeki” maana yake “mpwalume wa haki” ni iyeya “mpwalume wa Salemu” ambaye nga 'mpwalume wa amani.”
व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो.
3 Ntopo tate ntopo mao, ntopo abelezi ntopo mwanzo wa siku ntopo mwiso wa lisiku badala yake aigala kuhani milele kati mwana wa Nnongo.
मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.
4 Fikiria wete yeno mundu eyo ni nkolo, mbelei witu Abrahamu ampayi yimo ya komi na ilebe inoike atweti kuvita.
यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला.
5 Hakika, ukolo wa alawi balyo bapokii ofisi za kikuhani bai ni amri kuoma kusaliya kutola yimo ya komi kuoma kwa kila bandu, kuoma kwa Aisrael ayabe, pamope ni bembe, pia ni lukolo kuoma kwa Abrahamu.
आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा.
6 Lakini Melkizedeki, ywembe lukolo kwako wa alawi, apokii yimo ya komi kuoma kwa Abrahamu, ni kaambariki ywembe abi ni ahadi.
मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्यास त्याने आशीर्वाद दिला.
7 Palo ikanikiwe kwaa mundu nchunu barikilwa ni nkolo.
यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.
8 Kwa likowe leleno mundu ywa pokya yimo ya komi awaa lisiku jimo lakini kwa lyenge yumo ywaa apokii yimo ya komi kuoma kwa Abrahamu kaikoywa kati ya atami.
एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.
9 kwa namna ya kulongela, Lawi apokii yimo ya komi, iyeya apiye yimo ya komi kwa Abrahamu.
एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात.
10 Kwa maana Lawi abile mu; iuno ya tate bake Abrahamu wakati Melkizedeku akwembine ni Abrahamu.
१०कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.
11 Kati ukamilifu utiwezekana patya kwa ukuhani wa Lawi, (Kwa eyo pae yake bandu hupokya saliya), pabile ni hitaji lyaako zaidi kwa kuhani ywenge kuinua baada ya nfumo wa Melkizedeki, na kemelwa kwaa baada ya mpangilio ba Haruni?
११लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांस नियमशास्त्र दिले गेले, पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता.
12 Kwa eyo ukuhani mana ubadilike, yapalikwa na saliya kubadilika.
१२कारण जेव्हा याजकपण बदलते तेव्हा नियमशास्त्रसुद्धा अवश्य बदलते.
13 Yumo ywabile ni makowe aga gabaywa kuhusu kabila lyenge, kuoma kwabe ntopo ywahukumilwa mu'madhabahu.
१३कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही.
14 Nga yabile wazi kuwa Ngwana witu abokite mu'Yuda, likabila lyabile Musa alibaya kwaa kuhusu makuhani.
१४हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभू यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.
15 Nga aya tugabaya nga wazi mana itei kuhani ywenge atiboka kwa mpwano wa Melkizedeki.
१५आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हाही गोष्ट आणखी स्पष्ट होते.
16 Kuhani yolo wayambe yumo kwaa ywabile kuhani nnani ya msingi ba saliya zabile husiana na ubeleko wa mundu, lakini mu'misingi ya ngupu ya maisha gawezekana kwaa haribika.
१६मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने त्यास याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्यास याजक करण्यात आले.
17 Kwa eyo maandiko yatishuhudia kuhusu ywembe: “Ywembe nga kuhani milele boka ku'mfumo wa Melkizedeki.” (aiōn g165)
१७कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.” (aiōn g165)
18 Kwa mana amri yabile ya kwanza yatibekwa pembeni mana yabile zaifu na yaifaike kwaa.
१८जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व निरुपयोगी होता.
19 Eyo saliya yapangite kwaa chochoti sakikamilifu. Ila, pabile ni ujasiri unoyite kwa ago tunkengama Nnongo.
१९कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हास देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
20 No ujasiri unoyite walowa patikana kwaa ila kwa ndela ya lapa, kwa likowe lee makuhani wenge bachukianga kwaa kilapo chochoti.
२०हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही.
21 Lakini Nnongo akichukii kilapo palyo abayite husu Yesu, “Ngwana alapile ni kana abadili malango gake.'wenga wa kuhani milele.” (aiōn g165)
२१जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की, ‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही, तू युगानुयुगाचा याजक आहेस.’ (aiōn g165)
22 Kwa likowe lee Yesu atiisa kuba kati dhamana ya liagano linoyite.
२२याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे
23 Hakika, kiwo huzuia makuhani tama milele. Yee nga kwa mana babile makuhani banansima, yumo baada ya ywenge.
२३तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे निरंतर ते याजकपद चालवू शकले नाही.
24 Lakini kwa mana Yesu atama milele, ukuhani wake ubadilika kwaa. (aiōn g165)
२४त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो. (aiōn g165)
25 Kwa eyo ywembe kae ywaweza kwa ukamilifu kamilisha kwalopwa balo bankaribia Nnongo petya kwake, kwa mana ywembe atama daima kwa kuloba kwaajili yabe.
२५म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
26 Kwa eyo kuhani nkolo wa namna yee atistahili kwitu. Abile kwaa ni sambi, hatia, nsafi, ywatengwa kuoma kwa babile ni sambi, ni ywabile nnani kuliko maunde.
२६म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे.
27 Ywembe abile kwaa ni lihitaji, mpwano wa makuhani akolo. kuoma dhabihu kila lisoba, kwanza kwa sambi yake mwene, ni baadae kwa sambi sa bandu. Apangite nyoo mara jimo kwa boti, paajilekite ywembe mwene.
२७जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे.
28 Kwa saliya huchawa bandu babile adhaifu kuba nga makuhani, akolo, lakini neno lya kiapo, lalibile baada ya saliya, ywachaulilwe Mwana, ywapangilwe kuba nga mkamilifu milele. (aiōn g165)
२८कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला. (aiōn g165)

< Baebrania 7 >