< KwabaseRoma 10 >

1 Bazalwane, isifiso senhliziyo yami, lomkhuleko kuNkulunkulu ngenxa kaIsrayeli yikuthi basindiswe.
बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.
2 Ngoba ngiyabafakazela ukuthi balokutshisekela uNkulunkulu, kodwa kungenjengolwazi;
कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.
3 ngoba bengakwazi ukulunga kukaNkulunkulu, njalo bedinga ukumisa okwabo ukulunga, kabazehliselanga ngaphansi kokulunga kukaNkulunkulu.
कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत.
4 Ngoba uKristu uyisiphetho somlayo ekulungeni kuye wonke okholwayo.
कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.
5 Ngoba uMozisi ubhala ngokulunga okungokomlayo, ukuthi umuntu owenza lezizinto uzaphila ngazo.
कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’
6 Kodwa ukulunga okungokholo kukhuluma kanje: Ungatsho enhliziyweni yakho ukuthi: Ngubani ozakwenyukela ezulwini? Lokhu kuyikuthi ukumehlisa uKristu;
पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)
7 kumbe ukuthi: Ngubani ozakwehlela ekujuleni? Lokhu kuyikuthi ukumkhuphula uKristu kwabafileyo. (Abyssos g12)
किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास) (Abyssos g12)
8 Kodwa kuthini? Ilizwi liseduze lawe, emlonyeni wakho lenhliziyweni yakho; leli yilizwi lokholo esilitshumayelayo;
पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.
9 ukuthi uba uvuma ngomlomo wakho iNkosi uJesu, njalo ukholwa enhliziyweni yakho ukuthi uNkulunkulu wamvusa kwabafileyo, uzasindiswa;
कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
10 ngoba ngenhliziyo omunye uyakholwa kube yikulunga, langomlomo uyavuma kube lusindiso.
१०कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
11 Ngoba umbhalo uthi: Wonke okholwa kuye kayikuyangeka.
११म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
12 Ngoba kakukho umehluko phakathi komJuda lomGriki; ngoba yinye iNkosi yabo bonke, inothele bonke abakhuleka kuyo.
१२यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,
13 Ngoba wonke loba ngubani ozabiza ibizo leNkosi uzasindiswa.
१३‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
14 Ngakho bazayibiza njani abangakholwanga kuyo? Futhi bazakholwa njani kuyo abangezwanga ngayo? Futhi bazakuzwa njani bengelamtshumayeli?
१४मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?
15 Njalo bazatshumayela njani uba bengathunywanga? Njengokulotshiweyo ukuthi: Zinhle kangakanani inyawo zabatshumayela ivangeli lokuthula, zabatshumayela ivangeli ngezinto ezinhle!
१५आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’
16 Kodwa kabalilalelanga bonke ivangeli. Ngoba uIsaya uthi: Nkosi, ngubani owakholwa umbiko wethu?
१६पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
17 Ngakho ukholo luvela ekuzweni, lokuzwa ngelizwi likaNkulunkulu.
१७तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
18 Kodwa ngithi: Kabezwanga yini? Yebo sibili, ilizwi labo liphumele emhlabeni wonke, lamazwi abo emikhawulweni yomhlaba.
१८पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले; ‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’
19 Kodwa ngithi: UIsrayeli kaqedisisanga yini? Kuqala uMozisi uthi: Mina ngizalivusela umona ngabo abangesiso isizwe, ngilithukuthelise ngesizwe esingelangqondo.
१९पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, ‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून. मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’
20 LoIsaya ulesibindi uthi: Ngaficwa yilabo abangangidinganga, ngabonakala kubo abangabuzanga ngami.
२०पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’
21 Kodwa kuIsrayeli uthi: Usuku lonke ngelulela izandla zami kubantu abangalaleliyo labalenkani.
२१पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्‍या आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’

< KwabaseRoma 10 >