< Isambulo 19 >
1 Emva kwalezizinto ngasengisizwa ilizwi elikhulu elexuku elikhulu ezulwini, lisithi: Haleluya! Usindiso lobukhosi lodumo lamandla kungokweNkosi uNkulunkulu wethu;
१या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली हालेलूया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,
2 ngoba izigwebo zakhe ziqotho zilungile; ngoba usilahlile isifebe esikhulu, esonakalise umhlaba ngobufebe baso, usephindisele igazi lenceku zakhe esandleni saso.
२कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.
3 Basebesithi ngokwesibili: Haleluya! Lentuthu yaso ithunqa kuze kube nini lanini. (aiōn )
३आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. (aiōn )
4 Labadala abangamatshumi amabili lane lezidalwa ezine eziphilayo zawela phansi zakhonza uNkulunkulu ohlezi esihlalweni sobukhosi zisithi: Ameni! Haleluya!
४तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; हालेलूया.
5 Ilizwi laseliphuma livela esihlalweni sobukhosi, lisithi: Mdumiseni uNkulunkulu wethu, lina lonke zinceku zakhe, labamesabayo, labancinyane, labakhulu.
५आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा.
6 Ngasengisizwa kungathi yilizwi lexuku elikhulu, njalo kungathi ngumdumo wamanzi amanengi, njalo kungathi ngumsindo wemidumo elamandla, kusithi: Haleluya! Ngoba iNkosi uNkulunkulu uSomandla uyabusa.
६आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलूया; कारण, आमचा प्रभू सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे.
7 Asithokoze sithabe kakhulu, besesisipha udumo kuye; ngoba umtshado weWundlu usufikile, lomkalo usezilungisele.
७या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
8 Kwasekuphiwa kuye ukuthi embathe ilembu elicolekileyo kakhulu elihlanzekileyo lelikhazimulayo; ngoba ilembu elicolekileyo kakhulu liyikulunga kwabangcwele.
८आणि तिला नेसायला, स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.)
9 Yasisithi kimi: Bhala uthi: Babusisiwe labo ababizelwe ekudleni kwantambama komtshado weWundlu. Yasisithi kimi: La ngamazwi aqotho kaNkulunkulu.
९आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”
10 Ngasengiwela phansi enyaweni zayo ukuyikhonza; yasisithi kimi: Qaphela ungakwenzi; ngiyinceku kanye lawe labazalwane bakho abalobufakazi bukaJesu; khonza uNkulunkulu; ngoba ubufakazi bukaJesu bungumoya wesiprofetho.
१०आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”
11 Ngasengibona izulu livuliwe, khangela-ke ibhiza elimhlophe, loligadileyo ubizwa ngokuthi oThembekileyo loQotho, njalo ngokulunga uyahlulela alwe.
११तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो,
12 Lamehlo akhe afanana lelangabi lomlilo, lekhanda lakhe kulemiqhele eminengi; njalo ulebizo elilotshiweyo, okungelamuntu olaziyo ngaphandle kwakhe,
१२त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही.
13 wasesembatha isembatho esicwiliswe egazini; lebizo lakhe libizwa ngokuthi, nguLizwi likaNkulunkulu.
१३त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे;
14 Lamabutho ayesezulwini amlandela egade amabhiza amhlophe, embethe ilembu elicolekileyo kakhulu elimhlophe lelihlanzekileyo.
१४आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या.
15 Emlonyeni wakhe kwasekuphuma inkemba ebukhali, ukuze atshaye izizwe ngayo; njalo yena uzazibusa ngentonga yensimbi; yena-ke uzanyathela isikhamelo sevini sewayini lentukuthelo lolaka lukaNkulunkulu uSomandla.
१५आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील.
16 Njalo esembathweni lethangazini lakhe ulebizo elibhalwe ukuthi: INKOSI YAMAKHOSI LOMBUSI WABABUSI.
१६त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.
17 Ngasengibona ingilosi eyodwa imi elangeni; yasimemeza ngelizwi elikhulu, isithi enyonini zonke eziphaphayo phakathi laphakathi kwezulu: Wozani libuthaniswe ekudleni kwantambama kukaNkulunkulu omkhulu,
१७आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा;
18 ukuze lidle inyama yamakhosi, lenyama yenduna ezinkulu, lenyama yabalamandla, lenyama yamabhiza leyabagadi bawo, lenyama yabo bonke, abakhululekileyo kanye labayizigqili, labancinyane labakhulu.
१८म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल; घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल.
19 Ngasengibona isilo, lamakhosi omhlaba lamabutho awo ebuthanele ukulwa impi laye ogade ibhiza, kanye lebutho lakhe.
१९आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या.
20 Isilo sasesibanjwa, njalo kanye laso umprofethi wamanga owenza izibonakaliso phambi kwaso, aduhisa ngazo labo ababelophawu lwesilo, lalabo abakhonza umfanekiso waso; labo bobabili baphoselwa bephila echibini lomlilo elivutha isibabule; (Limnē Pyr )
२०मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणाऱ्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांस फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले; (Limnē Pyr )
21 labaseleyo babulawa ngenkemba yogade ibhiza, ephuma emlonyeni wakhe; lenyoni zonke zasutha inyama yabo.
२१बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.