< UMakho 1 >
1 Ukuqala kwevangeli likaJesu Kristu, iNdodana kaNkulunkulu;
१देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
2 njengokulotshiweyo kubaprofethiukuthi: Khangela, mina ngiyathuma isithunywa sami phambi kobuso bakho, esizalungisa indlela yakho phambi kwakho.
२यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;
3 Ilizwi lomemezayo enkangala, lithi: Lungisani indlela yeNkosi; qondisani izindledlana zayo.
३अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’”
4 Kweza uJohane ebhabhathiza enkangala, etshumayela ubhabhathizo lokuphenduka kukho ukuthethelelwa kwezono,
४त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.
5 njalo kwaphumela kuye ilizwe lonke leJudiya, labo abeJerusalema, basebebhabhathizwa bonke nguye emfuleni iJordani, bevuma izono zabo.
५यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
6 Futhi uJohane wayembethe uboya bekamela, elozwezwe lwesikhumba ekhalweni lwakhe, wayesidla intethe loluju lweganga.
६योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.
7 Watshumayela, esithi: Olamandla kulami uyeza emva kwami, engingafanele ukukhothama ngithukulule umchilo wamanyathela akhe.
७तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.
8 Mina isibili ngilibhabhathize ngamanzi; kodwa yena uzalibhabhathiza ngoMoya oNgcwele.
८मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
9 Kwasekusithi ngalezonsuku kwafika uJesu evela eNazaretha yeGalili, wabhabhathizwa nguJohane eJordani.
९त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला.
10 Wenela ukukhuphuka emanzini, wabona amazulu eqhekezeka, loMoya kungathi lijuba esehlela phezu kwakhe;
१०येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.
11 kwasekusiza ilizwi livela emazulwini, lathi: Wena uyiNdodana yami ethandekayo, engithokoza ngayo.
११तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
12 Njalo uMoya wahle wamqhubela enkangala.
१२मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.
13 Wayekhona-ke lapho enkangala insuku ezingamatshumi amane elingwa nguSathane, wayelezilo, ingilosi zasezimnceda.
१३सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
14 Kwathi emva kokunikelwa kukaJohane, uJesu wafika eGalili, etshumayela ivangeli lombuso kaNkulunkulu,
१४योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
15 njalo esithi: Isikhathi sigcwalisekile, njalo umbuso kaNkulunkulu ususondele; phendukani, likholwe ivangeli.
१५तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
16 Kwathi ehambahamba elwandle lweGalili wabona uSimoni loAndreya umfowabo, bephosela imbule olwandle; ngoba babengabagoli benhlanzi.
१६येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
17 UJesu wasesithi kubo: Ngilandelani, ngizalenza libe ngabagoli babantu.
१७येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
18 Njalo bahle batshiya amambule abo, bamlandela.
१८मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
19 Eseqhubeke ibangana esuka lapho, wabona uJakobe okaZebediya, loJohane umfowabo, labo babesemkhunjini belungisa amambule abo.
१९तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.
20 Njalo wahle wababiza; basebetshiya uyise uZebediya emkhunjini leziqhatshwa, basuka bamlandela.
२०त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
21 Basebengena eKapenawume; kwathi ngesabatha wahle wangena esinagogeni, wafundisa.
२१नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
22 Basebebabaza ngemfundiso yakhe; ngoba wabafundisa njengolamandla, njalo kungenjengababhali.
२२त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
23 Futhi kwakukhona esinagogeni labo umuntu owayelomoya ongcolileyo, wasememeza,
२३त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
24 wathi: Yekela, silani lawe, Jesu weNazaretha? Uze ukusibhubhisa yini? Ngiyakwazi wena ukuthi ungubani: ONgcwele kaNkulunkulu.
२४आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”
25 UJesu wasemkhuza, wathi: Thula, uphume kuye.
२५परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
26 Futhi umoya ongcolileyo emhlukuluza ekhala ngelizwi elikhulu, waphuma kuye.
२६“नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”
27 Basebemangala bonke, baze babuzana, bathi: Kuyini lokhu? Yimfundiso bani entsha le, ukuthi ngamandla uyalaya labomoya abangcolileyo, futhi bamlalele.
२७लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”
28 Njalo yahle yaphuma indumela yakhe esigabeni sonke seGalili esizingelezeleyo.
२८येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.
29 Njalo bahle baphuma esinagogeni, bangena endlini kaSimoni loAndreya, kanye loJakobe loJohane.
२९येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.
30 Futhi uninazala kaSimoni wayelele eloqhuqho, njalo bahle bamtshela ngaye;
३०शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.
31 wasesondela, wabamba isandla sakhe wamvusa; futhi uqhuqho lwahle lwamyekela, wabasebenzela.
३१तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
32 Kwathi sekuhlwile, ilanga selitshona, baletha kuye bonke abagulayo lababengenwe ngamadimoni;
३२संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.
33 njalo umuzi wonke wawubuthene emnyango.
३३सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले.
34 Wasesilisa abanengi ababegula izifo ezitshiyeneyo, wakhupha amadimoni amanengi, kodwa kavumelanga amadimoni ukuthi akhulume, ngoba ayemazi.
३४त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.
35 Njalo ekuseni kusesemnyama kakhulu wavuka waphuma, waya endaweni eyinkangala, wakhuleka khona.
३५मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
36 USimoni lababelaye basebemdingisisa;
३६शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
37 sebemtholile bathi kuye: Bonke bayakudinga.
३७व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.”
38 Wasesithi kubo: Asiye emizini eseduze, ukuze ngitshumayele lakhona; ngoba ngiphumele lokhu.
३८तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”
39 Wasetshumayela emasinagogeni abo kulo lonke eleGalili, ekhupha amadimoni.
३९मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.
40 Kwasekufika kuye umlephero, emncenga eguqa ngamadolo phambi kwakhe, esithi kuye: Aluba uthanda, ungangihlambulula.
४०एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
41 UJesu wasesiba lesihelo, welula isandla, wamthinta, wathi kuye: Ngiyathanda, hlambuluka;
४१येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
42 esekhulumile bahle basuka ubulephero kuye, wahlanjululwa.
४२आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.
43 Wasemlayisisa, wahle wamyekela wahamba,
४३येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.
44 esithi kuye: Khangela ungatsheli muntu ulutho; kodwa hamba, uziveze kumpristi, unikele ngokuhlanjululwa kwakho lokho uMozisi akulayayo, kube yibufakazi kubo.
४४आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”
45 Kodwa yena esephumile waqala ukumemezela kakhulu walwandisa udaba, kwaze kwathi wayengaselakho ukungena emzini obala, kodwa wayengaphandle ezindaweni ezizinkangala; beza kuye bevela enhlangothini zonke.
४५परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.