< ULevi 18 >
1 INkosi yasikhuluma kuMozisi isithi:
१परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 Tshono ebantwaneni bakoIsrayeli uthi kubo: NgiyiNkosi uNkulunkulu wenu.
२इस्राएल लोकांस सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
3 Lingenzi njengokwemisebenzi yelizwe leGibhithe lapho elalihlala khona, lingenzi futhi njengokwemisebenzi yelizwe leKhanani engililetha kulo. Lingahambi ngemithetho yabo.
३तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.
4 Lizakwenza izahlulelo zami ligcine izimiso zami, ukuhamba kuzo. NgiyiNkosi uNkulunkulu wenu.
४तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
5 Ngakho lizagcina izimiso zami lezahlulelo zami; okuthi uba umuntu ezenza uzaphila ngazo. NgiyiNkosi.
५म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
6 Kakungasondeli lamuntu lakusiphi isihlobo senyama yakhe ukwembula ubunqunu baso. NgiyiNkosi.
६तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:
7 Ungembuli ubunqunu bukayihlo lobunqunu bukanyoko; ungunyoko, ungembuli ubunqunu bakhe.
७तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर.
8 Ungembuli ubunqunu bomkayihlo, buyibunqunu bukayihlo.
८तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको.
9 Ubunqunu bukadadewenu, indodakazi kayihlo loba indodakazi kanyoko, ezelwe ekhaya loba ezelwe ngaphandle, ungembuli ubunqunu babo.
९तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको.
10 Ungembuli ubunqunu bendodakazi yendodana yakho, loba bendodakazi yendodakazi yakho, ngoba bayibunqunu bakho.
१०तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!
11 Ubunqunu bendodakazi yomkayihlo ezelwe nguyihlo, ingudadewenu, ungembuli ubunqunu bayo.
११जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
12 Ungembuli ubunqunu bukadadewabo kayihlo, ngoba eyisihlobo sikayihlo.
१२तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
13 Ungembuli ubunqunu bukadadewabo kanyoko, ngoba eyisihlobo sikanyoko.
१३तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
14 Ungembuli ubunqunu bomfowabo kayihlo; ungasondeli kumkakhe, ngoba enguyihlokazi.
१४तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.
15 Ungembuli ubunqunu bukamalokozana; ungumkandodana yakho, ungembuli ubunqunu bakhe.
१५तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची पत्नी आहे तिच्याशी शारीरिक संबध ठेवू नको.
16 Ungembuli ubunqunu bomkamfowenu, buyibunqunu bomfowenu.
१६तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्याप्रकारे त्याची लाज काढू नको.
17 Ungembuli ubunqunu bowesifazana lobendodakazi yakhe; ungathathi indodakazi yendodana yakhe loba indodakazi yendodakazi yakhe, ukwembula ubunqunu bayo; bayizihlobo; kuyinkohlakalo.
१७एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शरीरसंबंध ठेवू नको. कारण त्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अतिदुष्टपणाचे आहे.
18 Ungathathi owesifazana kanye lodadewabo ukumhlupha, ukwembula ubunqunu bakhe kanye laye empilweni yakhe.
१८तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
19 Ungasondeli kowesifazana ekwehlukanisweni kokungcola kwakhe ukwembula ubunqunu bakhe.
१९स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते.
20 Ungalali lomkamakhelwane wakho ukungcola ngaye.
२०तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको.
21 Unganiki okwenzalo yakho ukuthi ukudabulisele kuMoleki; ungangcolisi ibizo likaNkulunkulu wakho. NgiyiNkosi.
२१तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.
22 Ungalali lowesilisa njengokulala lowesifazana; kuyisinengiso.
२२स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
23 Ungalali laloba yiyiphi inyamazana ukungcola ngayo; futhi owesifazana angemi phambi kwenyamazana ukulala layo; kuyingxube elihlazo.
२३कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.
24 Lingazingcolisi langenye yalezizinto, ngoba ngazo zonke lezizinto izizwe ziyangcoliswa engizixotsha phambi kwenu.
२४अशाप्रकारे स्वत: ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले.
25 Ngalokho ilizwe lingcolile; ngakho ngiphindisela ububi balo phezu kwalo, lelizwe liyabahlanza abahlali balo.
२५त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाशांचा त्याग करीत आहे.
26 Ngakho lina lizagcina izimiso zami lezahlulelo zami, lingenzi okwazo zonke lezizinengiso; owokuzalwa elizweni loba owemzini ohlala njengowezizwe phakathi kwenu.
२६ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये.
27 Ngoba zonke lezizinengiso bazenza abantu balelolizwe ababekhona ngaphambi kwenu, ngakho ilizwe langcola.
२७कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.
28 Ukuze ilizwe lingalihlanzi lapho lilingcolisa, njengalokhu lahlanza isizwe esasikhona ngaphambi kwenu.
२८जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
29 Ngoba wonke owenza okwalezizinengiso, imiphefumulo ekwenzayo izaqunywa isuke ebantwini bayo.
२९जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30 Ngakho lizagcina umlayo wami, ukuze lingenzi okwalezozimiso eziyisinengiso ezenziwa ngaphambi kwenu, ukuthi lingazingcolisi ngazo. NgiyiNkosi uNkulunkulu wenu.
३०इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; अशी भयंकर अमंगळ कृत्ये करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे!