< UJohane 14 >

1 Inhliziyo yenu kayingakhathazeki; liyakholwa kuNkulunkulu, kholwani lakimi.
“तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.
2 Ekhaya likaBaba kukhona izindlu ezinengi; kodwa uba kwakungenjalo, ngabe ngalitshela. Ngiyahamba ukuyalilungisela indawo.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो
3 Njalo nxa ngihamba ngisiyalilungisela indawo, ngizabuya futhi ngilemukele kimi; ukuze kuthi lapho mina engikhona, libe khona lani.
आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
4 Lalapho mina engiya khona liyakwazi, lendlela liyayazi.
मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.”
5 UTomasi wathi kuye: Nkosi, kasikwazi lapho oya khona; pho, singayazi njani indlela?
थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”
6 UJesu wathi kuye: Mina ngiyindlela, leqiniso, lempilo; kakho oza kuBaba, kodwa ngami.
येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
7 Uba belingazile, belizamazi loBaba; njalo kusukela khathesi liyamazi, selimbonile.
मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.”
8 UFiliphu wathi kuye: Nkosi, sitshengise uYihlo, njalo kusanele.
फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.”
9 UJesu wathi kuye: Sengilani isikhathi eside kangaka, kawukangazi, Filiphu? Yena obone mina, ubone uBaba; njalo utsho njani ukuthi: Sitshengise uYihlo?
येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
10 Kawukholwa yini ukuthi mina ngikuBaba, loBaba ukimi? Amazwi mina engiwakhuluma kini, kangizikhulumeli ngokwami; kodwa uBaba ohlezi kimi, yena wenza imisebenzi.
१०मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.
11 Ngikholwani ukuthi mina ngikuBaba, loBaba ukimi; njalo uba kungenjalo, ngikholwani ngenxa yemisebenzi ngokwayo.
११मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
12 Ngiqinisile, ngiqinisile, ngithi kini: Okholwa kimi, imisebenzi engiyenzayo uzayenza laye, lemikhulu kulale uzayenza; ngoba mina ngiya kuBaba.
१२मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
13 Njalo loba yini eliyicelayo ngebizo lami, le ngizayenza, ukuze uYise adunyiswe eNdodaneni.
१३पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
14 Uba licela loba yini ebizweni lami, mina ngizayenza.
१४तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
15 Uba lingithanda, londolozani imilayo yami.
१५माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
16 Lami ngizacela kuBaba, laye uzalinika omunye uMduduzi, ukuze ahlale lani laphakade, (aiōn g165)
१६मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. (aiōn g165)
17 uMoya weqiniso, ongememukele umhlaba, ngoba ungamboni, ungamazi. Kodwa lina liyamazi, ngoba uhlala lani, njalo uzakuba kini.
१७तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
18 Kangiyikulitshiya lizintandane; ngizakuza kini.
१८मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.
19 Kube kanti okwesikhatshana, lomhlaba kawusayikungibona, kodwa lina lizangibona; ngoba mina ngiyaphila, lani lizaphila.
१९आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत रहाल.
20 Ngalolosuku lina lizakwazi ukuthi mina ngikuBaba, lani likimi, lami ngikini.
२०त्यादिवशी तुम्हास समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
21 Olemilayo yami ayilondoloze, nguye ongithandayo; njalo yena ongithandayo, uzathandwa nguBaba; lami ngizamthanda, ngizazibonakalisa kuye.
२१ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”
22 UJudasi, ongesuye uIskariyothi, wathi kuye: Nkosi, kungani uzazibonakalisa kithi, kodwa kungeyisikho kumhlaba?
२२यहूदा (इस्कार्योत नव्हे) त्यास म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”
23 UJesu waphendula wathi kuye: Uba umuntu engithanda, uzalondoloza ilizwi lami, loBaba uzamthanda, njalo sizakuza kuye, sihlale laye.
२३येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
24 Yena ongangithandiyo, kawalondolozi amazwi ami; lelizwi elilizwayo kayisilo elami, kodwa ngelikaBaba ongithumileyo.
२४जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.
25 Lezizinto ngizikhulumile kini ngihlezi lani.
२५मी तुमच्याबरोबर राहत असतांना या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत.
26 Kodwa uMduduzi, uMoya oyiNgcwele, uBaba azamthuma ebizweni lami, yena uzalifundisa zonke izinto, njalo alikhumbuze konke engakutshoyo kini.
२६तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
27 Ukuthula ngikutshiya kini, ukuthula kwami ngilinika khona; kungeyisikho njengoba umhlaba unika, mina ngiyalinika. Inhliziyo yenu kayingakhathazwa, ingesabi.
२७मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
28 Lizwile ukuthi mina ngithe kini: Ngiyahamba njalo ngizabuya kini. Uba belingithanda, belizathokoza, ngoba ngithe: Ngiya kuBaba; ngoba uBaba mkhulu kulami.
२८‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’ असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.
29 Njalo khathesi ngilitshelile kungakenzeki; ukuze, lapho sekusenzeka, likholwe.
२९ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर, आता मी तुम्हास सांगितले आहे,
30 Kangisayikukhuluma okunengi lani; ngoba umbusi walumhlaba uyeza, kodwa kalalutho kimi;
३०यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
31 kodwa ukuze umhlaba wazi ukuthi ngiyamthanda uBaba, lokuthi njengoba uBaba engilayile, ngenze njalo. Sukumani, sisuke lapha.
३१परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”

< UJohane 14 >