< U-Isaya 5 >
1 Ake ngihlabelele othandiweyo wami ingoma yomthandwa wami ngesivini sakhe. Othandiweyo wami ulesivini oqaqeni oluvundileyo.
१मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे. माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.
2 Wasibiyela, wakhupha amatshe kiso, wasihlanyela ngevini elikhethiweyo, wakha umphotshongo phakathi kwaso, wagubha lesikhamelo sewayini kiso; walindela ukuthi sizathela izithelo zevini, kodwa sathela izithelo zevini ezimunyu.
२माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली. त्याने मळ्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्यामध्ये द्राक्षकुंडहि खणले, मग त्याने द्राक्षे द्यावी या अपेक्षेत होता पण त्यातून रानद्राक्षे निघाली.
3 Ngakho-ke, bahlali beJerusalema, lani madoda akoJuda, ake lahlulele phakathi kwami lesivini sami.
३म्हणून आता, “यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांनो व यहूदातल्या पुरुषांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा.
4 Ngabe kwenziwani okunye esivinini sami engingakwenzanga kuso? Ngalindelelani ukuthi sizathela izithelo zevini, kodwa sathela izithelo zevini ezimunyu?
४मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे, त्यापेक्षा मी आणखी करायला पाहीजे असते? चांगले द्राक्ष यावे म्हणून मी त्याकडे पाहिले असता, त्याने का रानद्राक्षे उत्पन्न केले?
5 Ngakho-ke, ake ngilitshele engizakwenza esivinini sami: Ngizasusa uthango lwaso ukuze sibe lidlelo, ngidilize umduli waso ukuze sibe ngesokugxotshwa.
५आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.
6 Ngizasenza sibe liganga, singathenwa, singahlakulwa, kodwa kumile ameva lokhula oluhlabayo. Njalo ngizalaya amayezi ukuthi anganisi izulu phezu kwaso.
६मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील, तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 Ngoba isivini seNkosi yamabandla yindlu kaIsrayeli, labantu bakoJuda bayisithombo sentokozo zayo. Njalo yayilindele isahlulelo, kodwa khangela, ukuchithwa kwegazi; ukulunga, kodwa khangela, ukukhala.
७कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल घराणे होय. आणि यहूदाचे पुरुष हे त्यातील आनंददायी लागवड होय. त्याने न्यायाची वाट पाहिली, परंतु त्याऐवजी, तेथे मारणे; न्यायीपणाची वाट पाहिली, परंतू त्याऐवजी, मदतीचा आक्रोश आढळून आला.
8 Maye kulabo abahlanganisa indlu lendlu, abasondeza insimu lensimu, kuze kusweleke indawo, lina-ke lihlale lodwa phakathi kwelizwe!
८जे घराला घर आणि आपण देशामध्ये रहावे म्हणून जागा न उरेपर्यंत शेताला शेत लावतात, त्यांना हाय हाय!
9 Endlebeni zami iNkosi yamabandla yathi: Isibili izindlu ezinengi zizakuba ngamanxiwa, ezinkulu lezinhle zingabi lamhlali.
९सेनाधीश परमेश्वर माझ्याशी बोलला, “तेथे खूप घरे रिकामी होतील, मोठी व सुंदर घरे राहणाऱ्यांशिवाय ओसाड पडतील.
10 Ngoba indima ezilitshumi zesivini zizathela ibhathi elilodwa, lehomeri lenhlanyelo lithele i-efa.
१०दहा एकर द्राक्षमळा एक बाथ रस देईल, आणि एक होमर बी केवळ एक एफा उपज देईल.
11 Maye kwabavuka ekuseni kakhulu, bexotshana lokunathwayo okulamandla, balibale kuze kuhlwe, lize iwayini libalumathise!
११सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय! जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.
12 Njalo ichacho lomhubhe, isigubhu lomhlanga, lewayini kusemadilini abo, kodwa kabananzi isenzo seNkosi, bengaboni umsebenzi wezandla zayo.
१२मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत.
13 Ngakho abantu bami bazakuya ekuthunjweni ngenxa yokungabi lolwazi, lamadoda abo odumo alendlala, lenengi labo lizakoma ngumhawu.
१३यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत, त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.
14 Ngakho ingcwaba lizazinabulula, livule umlomo walo ube banzi ngokungelasilinganiso, kuze kwehle udumo lwabo lobunengi babo lenxokozelo yabo lothokozayo phakathi kwabo. (Sheol )
१४यास्तव मृत्यूने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे. आणि त्यांचे उत्तम लोक, त्यांचा समुदाय, त्यांचे अधिकारी, आणि त्यांच्यातील मौजमजा करणारे आणि आनंदी, हे अधोलोकात जातील.” (Sheol )
15 Lomuntukazana uzakwehliselwa phansi, lomuntu ophakemeyo athotshiswe, lamehlo abazikhukhumezayo athotshiswe.
१५मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत.
16 Kodwa iNkosi yamabandla izaphakanyiswa ngesahlulelo, loNkulunkulu ongcwele uzangcweliswa ngokulunga.
१६सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो.
17 Lamawundlu azakudla ngokwendlela yawo, labemzini badle amanxiwa abakhulupheleyo.
१७मग मेंढ्या त्यांच्या कुरणात असल्यासारखे चरतील, आणि श्रीमंतांच्या ओसाड भूमीवर कोकरे चरतील.
18 Maye kwabadonsa isiphambeko ngentambo zeze, lesono njengamagoda enqola!
१८जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!
19 Labo abathi: Kaphangise, aphangisise umsebenzi wakhe, ukuze siwubone; lecebo loNgcwele kaIsrayeli kalisondele lize, ukuze silazi.
१९जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू, आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!”
20 Maye kwabathi kokubi kuhle, lakokuhle kubi, ababeka umnyama ube yikukhanya, lokukhanya kube ngumnyama, ababeka okubabayo kube mnandi, lokumnandi kube ngokubabayo!
२०जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!
21 Maye kwabahlakaniphileyo emehlweni abo, labaqedisisayo phambi kobuso babo!
२१जे स्वत: च्या नजरेत आपणास शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हायहाय!
22 Maye kwabangamaqhawe okunatha iwayini, lamadoda alamandla okuhlanganisa okunathwayo okulamandla;
२२जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय!
23 abalungisisa okhohlakeleyo ngenxa yomvuzo, basuse ukulunga kwabalungileyo kubo!
२३जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय!
24 Ngakho njengolimi lomlilo lusidla isidindi sotshani, lamakhoba edilika ngelangabi, ngokunjalo impande yabo izakuba njengokubola, lempoko yabo iphephuke njengothuli; ngoba bewalile umlayo weNkosi yamabandla, balidelela ilizwi loNgcwele kaIsrayeli.
२४यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
25 Ngenxa yalokho ulaka lweNkosi lubavuthele abantu bayo, yelula isandla sayo imelene labo, yabatshaya, izintaba zaze zazamazama, lezidumbu zabo zaba njengengcekeza phakathi kwezitalada. Ngenxa yakho konke lokhu ulaka lwayo kaluphenduki, kodwa isandla sayo silokhu seluliwe.
२५म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे. डोंगरसुध्दा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत. हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोकांस शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
26 Njalo izasiphakamisela isizwe isiboniso ikhatshana, isitshayele ikhwelo isekucineni komhlaba; khangela-ke, sizakuza masinyane ngejubane.
२६तो दूरच्या राष्ट्रांना खूण म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शीळ वाजवील, पाहा ते त्वरेने आणि तातडीने येत आहेत.
27 Kakho ozadinwa, njalo kakho ozakhubeka phakathi kwaso, kakho ozawozela, njalo kakho ozalala, njalo kakho ozakhululelwa ibhanti lokhalo lwakhe, njalo kakho ozaqanyukelwa ngumchilo wamanyathela akhe.
२७त्यांच्या मध्ये कोणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही, त्यांचा कमरबंद कधीच सैल पडणार नाही, आणि त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटणार नाहीत.
28 Omitshoko yakhe ibukhali, lomadandili akhe wonke agotshiwe; amasondo amabhiza akhe azabalwa njengelitshe elilukhuni, lamavili akhe njengesivunguzane.
२८त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्ये वाकलेली आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे आहेत आणि त्यांच्या रथाचे चाक वादळा प्रमाणे आहेत.
29 Ukubhonga kwakhe kuzakuba njengokwesilwane, njalo uzabhonga njengamabhongo esilwane, abhavume abambe impango, ayilethe ekuvikelekeni, njalo kungekho umemuki.
२९त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील. ते गर्जतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील, वाचवणारा कोणीच नसेल.
30 Bazakubhavumela ngalolosuku njengokubhavuma kolwandle. Uba umuntu ekhangela emhlabeni, khangela-ke, umnyama, usizi, lokukhanya kwenziwe kwaba mnyama ngamayezi aso.
३०त्या दिवशी जसा समुद्रगर्जना करतो त्या प्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरूद्ध गर्जना करतील. जर कोणी भूमीकडे दृष्टी लावली तर पाहा अंधार व संकट आणि तिच्यावरील अभ्रांनी प्रकाश जाऊन अंधार झालेला आहे.