< U-Esta 9 >
1 Kwathi ngenyanga yetshumi lambili, eyinyanga uAdari, ngosuku lwetshumi lantathu lwayo, sekusondele ilizwi lenkosi lomlayo wayo ukuthi kwenziwe, ngosuku izitha zamaJuda ezazithemba ukuwabusa ngalo, kwaguquka, ngoba amaJuda ngokwawo abusa kwababewazonda.
१आता बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांस राजाच्या आज्ञेचे व हुकूमाचे पालन करायचे होते, यहूद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती पण त्याच्या उलट झाले, जे यहूद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहूदी आता वरचढ झाले होते.
2 AmaJuda abuthana emizini yawo kuzo zonke izabelo zenkosi uAhasuwerusi ukwelulela isandla kulabo ababedinge ukulinyazwa kwawo; njalo kakho owayengema phambi kwawo, ngoba ukwesabeka kwawo kwakwehlele bonke abantu.
२आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहूदी आपआपल्या नगरात एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात जायची कोणामध्येच ताकद नव्हती म्हणून यहूद्यांना ते लोक घाबरले.
3 Zonke-ke iziphathamandla zezabelo, lezikhulu, lababusi, labenzi bomsebenzi inkosi eyayilabo, basiza amaJuda, ngoba ukwesabeka kukaModekhayi kwakubehlele.
३शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहूद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते.
4 Ngoba uModekhayi wayemkhulu endlini yenkosi, lodumo lwakhe lwahamba kuzo zonke izabelo, ngoba lindoda uModekhayi yaqhubeka ikhula.
४मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची किर्ती राज्यातील सर्वापर्यंत पोहचली होती, मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.
5 Ngakho amaJuda atshaya phakathi kwezitha zawo zonke ngokutshaya kwenkemba lokubulala lokubhubhisa, enza ngabazondi bawo ngokwentando yawo.
५यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला.
6 EShushani isigodlo amaJuda asebulala abhubhisa abantu abangamakhulu amahlanu,
६शूशन या राजधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला.
7 loParishanidatha, loDalifoni, loAsiphatha,
७शिवाय त्यांनी पुढील लोकांस ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा,
8 loPoratha, loAdaliya, loAridatha,
८पोराथा, अदल्या, अरीदाथा,
9 loParimashita, loArisayi, loAridayi, loVayizatha.
९पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा,
10 Amadodana alitshumi kaHamani indodana kaHamedatha, isitha samaJuda, awabulala; kodwa kawelulelanga isandla sawo empangweni.
१०हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.
11 Ngalolosuku inani lababulawayo eShushani isigodlo lafika phambi kwenkosi.
११तटबंदी असलेल्या शूशनमध्ये, त्यादिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले.
12 Inkosi yasisithi kuEsta indlovukazi: EShushani isigodlo amaJuda abulele abhubhisa abantu abangamakhulu amahlanu lamadodana alitshumi kaHamani. Enzeni kwezinye izabelo zenkosi? Siyini-ke isicelo sakho? Njalo uzasinikwa. Siyini-ke isifiso sakho futhi? Njalo sizakwenziwa.
१२तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानाच्या दहा पुत्रासहीत यहूद्यांनी शूशनमध्ये पाचशे लोकांस मारले. आता राजाच्या इतर प्रांतांत काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तुझी काय विनंती आहे? ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे? ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल.”
13 UEsta wasesithi: Uba kulungile enkosini kawavunyelwe amaJuda aseShushani ukwenza lakusasa njengokomthetho walamuhla; lamadodana alitshumi kaHamani kabawalengise egodweni.
१३एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहूद्यांना आजच्यासारखेच उद्या करु द्यावे आणि हामानाच्या दहा पुत्रांचे देहही खांबावर टांगावे.”
14 Inkosi yasisithi kwenziwe njalo; kwasekunikwa umthetho eShushani, lamadodana alitshumi kaHamani bawalengisa.
१४तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानाच्या दहा मुलांना टांगले गेले.
15 AmaJuda eyeseShushani asebuthana futhi ngosuku lwetshumi lane lwenyanga uAdari, abulala abantu abangamakhulu amathathu eShushani; kodwa kawelulelanga isandla sawo empangweni.
१५अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहूदी एकत्र जमले आणि त्यांनी शूशनमधल्या तीनशे जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.
16 Amanye kumaJuda ayesezabelweni zenkosi abuthana-ke amela impilo yabo, aphumula ezitheni zawo, abulala kwabawazondayo izinkulungwane ezingamatshumi ayisikhombisa lanhlanu; kodwa kawelulelanga isandla sawo empangweni.
१६त्यावेळी राजाच्या प्रांतांमधले यहूदीदेखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रुपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या पंचाहत्तर हजार लोकांस त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही.
17 Kwakungosuku lwetshumi lantathu lwenyanga uAdari. Asephumula ngolwetshumi lane lwayo, alwenza lwaba lusuku lwedili lentokozo.
१७अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहूद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवाणीचा ठरविला.
18 Kodwa amaJuda aseShushani abuthana ngolwetshumi lantathu lwayo langolwetshumi lane lwayo; asephumula ngolwetshumi lanhlanu lwayo, alwenza lwaba lusuku lwedili lentokozo.
१८परंतु शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस त्यांनी मेजवाणीचा व आनंदोत्सवाचा ठरविला.
19 Ngenxa yalokhu amaJuda emaphandleni ahlala emizini emaphandleni enza usuku lwetshumi lane lwenyanga uAdari lwaba ngolwentokozo ledili, losuku oluhle, lolokuthumelana izabelo.
१९म्हणून खेडोपाडी राहणारे जे यहूदी गावकूस नसलेल्या गावात राहतात ते अदारच्या चतुर्दशीला पुरीम हा सण साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्यादिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
20 UModekhayi wasezibhala lezizinto, wathumela izincwadi kuwo wonke amaJuda ayekuzo zonke izabelo zenkosi uAhasuwerusi, aseduze lakhatshana,
२०मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली,
21 ukumisa phakathi kwabo ukwenza usuku lwetshumi lane lwenyanga uAdari losuku lwetshumi lanhlanu lwayo kuwo wonke umnyaka ngomnyaka,
२१दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा,
22 njengokwensuku amaJuda aphumula ngazo ezitheni zawo, lenyanga eyaphendulwa kuwo kusuka osizini kusiya kuntokozo, lekulileni kube lusuku oluhle, azenze zibe zinsuku zedili lentokozo, lezokuthumelana izabelo, lezipho kubayanga.
२२त्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहूद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
23 AmaJuda emukela lokho ayesekuqalile ukukwenza, lalokho uModekhayi ayewabhalele khona.
२३मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला.
24 Ngoba uHamani indodana kaHamedatha umAgagi, isitha sawo wonke amaJuda, wayecebe mayelana lamaJuda ukuwachitha, waphosa iPuri, eyinkatho, ukuwachoboza lokuwabhubhisa.
२४हम्मदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहूद्यांचा शत्रू होता. त्याने यहूद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहूद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता.
25 Kodwa lapho uEsta efika phambi kwenkosi, yalaya ngencwadi ukuthi icebo lakhe elibi ayelicebe ngamaJuda libuyele ekhanda lakhe; basebebalengisa yena lamadodana akhe egodweni.
२५परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहूदी लोकांविरूद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी.
26 Ngenxa yalokhu babiza lezozinsuku ngokuthi iPurimi ngebizo lePuri. Ngenxa yalokhu, ngenxa yawo wonke amazwi aleyoncwadi, lababekubonile mayelana lalokho, lokwakubehlele,
२६यास्तव पूर या शब्दावरून “पुरीम” असे म्हणत, म्हणून या दिवसास “पुरीम” नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्याबाबतीत जे घडले होते त्यामुळे यहूद्यांनी ही प्रथा स्विकारली.
27 amaJuda amisa azemukelela wona lenzalo yawo labo bonke abazihlanganisa lawo, ukuze bangeqi, ukugcina lezinsuku ezimbili, njengokombhalo wazo, lanjengokwesikhathi sazo esimisiweyo, kuwo wonke umnyaka lomnyaka,
२७यहूद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्विकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजासाठी व जो प्रत्येकजन त्यांना जोडलेले आहे तो. आपण हे दोन दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येकवर्षी त्याच वेळी साजरे करावे.
28 ukuthi lezinsuku zikhunjulwe zigcinwe kuso sonke isizukulwana lesizukulwana, usapho losapho, isabelo ngesabelo, lomuzi ngomuzi, ukuthi lezinsuku zePurimi zingeqiwa phakathi kwamaJuda, lesikhumbuzo sazo singapheli enzalweni yawo.
२८प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.
29 UEsta indlovukazi, indodakazi kaAbihayili, loModekhayi umJuda, basebebhala ngamandla wonke ukuqinisa lincwadi yesibili yePurimi.
२९मग अबीहाईल ची कन्या राणी एस्तेर आणि यहूदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले.
30 Wasethumela izincwadi kuwo wonke amaJuda ezabelweni ezilikhulu lamatshumi amabili lesikhombisa zombuso kaAhasuwerusi, amazwi okuthula leqiniso,
३०राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती.
31 ukuqinisa lezinsuku zePurimi ngezikhathi zazo ezimisiweyo njengokumisa phezu kwawo kukaModekhayi umJuda loEsta indlovukazi, lanjengokuzimisela kwawo wona lenzalo yawo, indaba zokuzila ukudla lokukhala kwawo.
३१पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा.
32 Ilizwi likaEsta laseliqinisa lezizindaba zePurimi; kwasekubhalwa egwalweni.
३२पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले. आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली.