< 3 UJohane 1 >

1 Umdala, kuye uGayusi othandekayo, mina engimthanda ngeqiniso.
प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याजकडून.
2 Sithandwa, kuzo zonke izinto ngifisa ukuthi uphumelele njalo uphile, njengalokhu umphefumulo wakho uphumelela.
प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
3 Ngoba ngathokoza kakhulukazi, lapho kufika abazalwane, befakazela iqiniso lakho, njengoba wena uhamba eqinisweni.
कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषययी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला.
4 Kangilantokozo enkulu edlula lezizinto, ukuthi ngizwe ukuthi abantwana bami bahamba eqinisweni.
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
5 Sithandwa, wenza ngokuthembeka loba yikuphi okwenza kubazalwane lakwabemzini,
प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी जे काही तू करतोस ते विश्वासूपणाने करतोस.
6 abafakazele uthando lwakho phambi kwebandla; uzakwenza kuhle uba ubaphelekezela ngokufanele uNkulunkulu.
त्यांनी तू दाखविलेल्या प्रीतीविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, देवाला आवडेल त्या रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील.
7 Ngoba ngenxa yebizo lakhe baphumile bengemukeli lutho kwabezizwe.
कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत.
8 Ngakho thina sifanele ukubemukela abanjalo, ukuze sibe yizisebenzi kanye leqiniso.
म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामधे त्यांचे सहकारी होऊ.
9 Ngabhalela ibandla; kodwa uDiyotrefe othanda ukuba ngowokuqala kubo kasemukeli.
मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.
10 Ngakho, uba ngifika, ngizakhumbuza imisebenzi yakhe ayenzayo, uyasihleba ngamazwi amabi; futhi kakholiswa yilezizinto, yena uqobo kemukeli abazalwane, uyabalela lalabo abathanda ukukwenza, njalo uyabaxotsha ebandleni.
१०या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
11 Sithandwa, ungakulingiseli okubi, kodwa okuhle. Owenza okuhle ungokaNkulunkulu; kodwa owenza okubi kambonanga uNkulunkulu.
११माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.
12 NgoDemetriyu kufakazwe yibo bonke, langeqiniso uqobo; lathi futhi siyafakaza, lani liyazi ukuthi ubufakazi bethu buqinisile.
१२प्रत्येकजण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः खरेपणानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीदेखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो आणि तुम्हास माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
13 Bengilezinto ezinengi zokubhala, kodwa kangithandi ukukubhalela ngeyinki losiba;
१३मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही.
14 kodwa ngithemba ukukubona masinyane, sibe sesikhuluma umlomo ngomlomo. Ukuthula kakube kuwe. Abangane bayakubingelela. Bingelela abangane ngamabizo.
१४त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. तुझ्याबरोबर शांती असो. तुझे मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.

< 3 UJohane 1 >