< 1 UJohane 5 >
1 Wonke okholwa ukuthi uJesu unguKristu uzelwe nguNkulunkulu; laye wonke othanda umzali uthanda lozelwe nguye.
१येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.
2 Ngalokho siyazi ukuthi siyabathanda abantwana bakaNkulunkulu, nxa sithanda uNkulunkulu, njalo sigcina imilayo yakhe;
२देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
3 ngoba lolu luthando lukaNkulunkulu, ukuthi sigcine imilayo yakhe; lemilayo yakhe kayinzima.
३देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.
4 Ngoba konke okuzelwe nguNkulunkulu kuyawunqoba umhlaba; lalokho yikunqoba okunqoba umhlaba, ukholo lwethu.
४कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
5 Ngubani onqoba umhlaba, ngaphandle kokholwa ukuthi uJesu uyiNdodana kaNkulunkulu?
५येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
6 Lo nguye oweza ngamanzi legazi, uJesu Kristu; kungeyisikho ngamanzi kuphela, kodwa ngamanzi legazi. LoMoya nguye ofakazayo, ngoba uMoya uliqiniso.
६जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.
7 Ngoba bathathu abafakazayo ezulwini, uYise, uLizwi, loMoya oNgcwele; laba abathathu banye.
७आत्मा हा साक्ष देणारा आहे कारण आत्मा सत्य आहे.
8 Njalo bathathu abafakazayo emhlabeni, uMoya, lamanzi, legazi; laba abathathu bahlanganyela intonye.
८साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत. आत्मा, पाणी आणि रक्त, या तिघांची एकच साक्ष आहे.
9 Uba sisemukela ubufakazi babantu, ubufakazi bukaNkulunkulu bukhulu; ngoba lobu yibufakazi bukaNkulunkulu, abufakazileyo ngeNdodana yakhe.
९जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे.
10 Okholwa eNdodaneni kaNkulunkulu ulobufakazi phakathi kwakhe ngokwakhe; ongakholwa uNkulunkulu, umenze abe ngumqambimanga, ngoba engakholwanga ubufakazi uNkulunkulu abufakazileyo ngeNdodana yakhe.
१०जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
11 Yilobu-ke ubufakazi, ukuthi uNkulunkulu usinikile impilo elaphakade, lale impilo iseNdodaneni yakhe. (aiōnios )
११आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. (aiōnios )
12 Olayo iNdodana ulempilo; ongelayo iNdodana kaNkulunkulu kalampilo.
१२ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही.
13 Lezizinto ngizibhalela lina elikholwa ebizweni leNdodana kaNkulunkulu, ukuze lazi ukuthi lilempilo elaphakade, lokuze likholwe ebizweni leNdodana kaNkulunkulu. (aiōnios )
१३जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. (aiōnios )
14 Njalo yilesi isibindi esilaso kuye, ukuthi uba sicela ulutho ngokwentando yakhe, uyasizwa;
१४आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.
15 uba-ke sisazi ukuthi uyasizwa, loba yini esiyicelayo, siyazi ukuthi sesilezicelo esizicela kuye.
१५आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
16 Uba umuntu ebona umzalwane wakhe esona isono esingasi ekufeni, uzacela, njalo uzamnika impilo labo abangonelanga ekufeni. Sikhona isono esisa ekufeni; kangitsho ukuthi ancenge ngaleso;
१६जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.
17 konke ukungalungi kuyisono; njalo kukhona isono esingasi ekufeni.
१७सर्व अनीती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही.
18 Siyazi ukuthi wonke ozelwe nguNkulunkulu koni; kodwa ozelwe nguNkulunkulu uyazigcina, lomubi kamthinti.
१८आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत राहत नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही.
19 Siyazi ukuthi singabakaNkulunkulu, lokuthi umhlaba wonke ulele ebubini.
१९आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग हे त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे.
20 Njalo siyazi ukuthi iNdodana kaNkulunkulu isifikile, yasinika ukuqedisisa ukuze simazi oweqiniso; njalo sikuye oweqiniso, eNdodaneni yakhe uJesu Kristu. Yena unguNkulunkulu weqiniso, lempilo elaphakade. (aiōnios )
२०पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे. (aiōnios )
21 Bantwanyana, zilondolozeni ezithombeni. Ameni.
२१माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.