< 1 KwabaseKhorinte 10 >

1 Kangithandi-ke ukuthi lingazi, bazalwane, ukuthi bonke obaba bethu babengaphansi kweyezi, njalo bonke badabula ulwandle,
बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.
2 futhi bonke babhabhathizwa kuMozisi eyezini lasolwandle,
मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वाचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला.
3 labo bonke badla ukudla kunye komoya,
त्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले.
4 futhi bonke banatha okunathwayo kunye komoya; ngoba banatha edwaleni lomoya elabalandelayo; lalelodwala lalinguKristu.
व ते एकच आत्मिक पेय प्याले कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते आणि तो खडक ख्रिस्त होता.
5 Kodwa ubunengi babo uNkulunkulu wayengathokozi ngabo; ngoba bachithwa enkangala.
परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती.
6 Lalezizinto zaba yizibonelo kithi, ukuze singaloyisi okubi, njengalokhu labo baloyisa.
आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये.
7 Njalo lingabi ngabakhonza izithombe, njengabanye babo; njengokulotshiweyo ukuthi: Abantu bahlala phansi ukudla lokunatha, basebesukuma ukudlala.
त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.”
8 Njalo kasingaphingi, njengabanye babo abaphingayo, basebesiwa ngasuku lunye inkulungwane ezingamatshumi amabili lantathu.
ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.
9 Njalo asingamlingi uKristu, njengabanye babo futhi bamlinga, basebebhujiswa zinyoka.
आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले.
10 Lingasoli-ke, njengabanye babo labo basola, babhujiswa ngumbhubhisi.
१०कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले.
11 Lalezizinto zonke zabehlela labo kube yizibonelo, njalo zabhalelwa ukuba yisixwayiso sethu, osekufike ukucina kwezikhathi. (aiōn g165)
११या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात (aiōn g165)
12 Ngakho lowo ocabanga ukuthi umi, kabone ukuthi kawi.
१२म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
13 Kakulakulingwa okulibambileyo ngaphandle kokusebantwini; kodwa uNkulunkulu uthembekile, ongayikuvuma ukuthi lilingwe ngokungaphezu kwamandla enu, kanti kanye lesilingo uzakwenza lendlela yokuphepha, ukuze libe lamandla okusithwala.
१३जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.
14 Ngakho-ke, bathandiweyo bami, balekelani ukukhonza izithombe.
१४तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तीपूजा टाळा.
15 Ngikhuluma njengakwabahlakaniphileyo; lina yehlukanisani engikutshoyo.
१५मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.
16 Inkezo yesibusiso esiyibusisayo, kayisiyo yini eyokuhlanganyela kwegazi likaKristu? Isinkwa esisihlephunayo, kayisiso yini esokuhlanganyela komzimba kaKristu?
१६जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?
17 Ngoba thina abanengi siyisinkwa sinye, simzimba munye; ngoba thina sonke sihlanganyela lesosinkwa sinye.
१७आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत.
18 Khangelani uIsrayeli ngokwenyama; abadlayo imihlatshelo kabasibo yini abahlanganyela lelathi?
१८देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का?
19 Ngithini pho? Ukuthi isithombe siyilutho yini? Kumbe ukuthi okuhlatshelwe izithombe kuyilutho?
१९तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे?
20 Kodwa ukuthi izinto abezizwe abazihlabayo, bazihlabela amadimoni, njalo kungeyisikho kuNkulunkulu; kodwa kangithandi ukuthi libe lenhlanganyelo lamadimoni.
२०नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही.
21 Lingenathe inkezo yeNkosi lenkezo yamadimoni; lingehlanganyele itafula leNkosi letafula lamadimoni.
२१तुम्ही देवाचा आणि भूतांचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही.
22 Kumbe sizayivusela ubukhwele iNkosi? Kambe silamandla kulayo?
२२आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.
23 Zonke izinto zivunyelwe kimi, kodwa kayisizo zonke izinto ezisizayo. Zonke izinto zivunyelwe kimi, kodwa kayisizo zonke izinto ezakhayo.
२३“काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.
24 Kakungabi khona ozidingela okwakhe, kodwa ngulowo lalowo okomunye.
२४कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
25 Konke okuthengiswa esilaheni kudleni, lingabuzi lutho ngenxa yesazela;
२५मांसाच्या बाजारात जे मांस विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकभावाला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा.
26 ngoba umhlaba ungoweNkosi lokugcwala kwawo.
२६कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.”
27 Njalo uba omunye kwabangakholwayo elinxusa, njalo lithanda ukuya, dlanini konke okubekwa phambi kwenu, lingabuzi lutho ngenxa yesazela.
२७विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हास जेवावयास बोलावले आणि तुम्हास जावेसे वाटले तर विवेकभावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
28 Kodwa uba umuntu esithi kini: Lokhu kuhlatshelwe isithombe; lingadli ngenxa yalowo olitshelileyo, langenxa yesazela; ngoba umhlaba ungoweNkosi lokugcwala kwawo.
२८परंतु जर कोणी तुम्हास सांगितले की, “हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,” तर विवेकभावासाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
29 Kodwa isazela ngithi, esingeyisiso esakho, kodwa esomunye; ngoba kungani inkululeko yami yahlulelwe yisazela somunye?
२९आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा आणि हेच फक्त एक कारण आहे कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सदविवेकबुद्धीने न्याय का व्हावा?
30 Njalo uba mina ngomusa ngihlanganyela, ngikhulunyelwani kubi ngalokho mina engikubongayo?
३०जर मी आभारपूर्वक अन्न खातो तर माझी निंदा होऊ नये कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो.
31 Ngakho uba lisidla, loba linatha, loba lisenzani, konke kwenzeleni udumo lukaNkulunkulu.
३१म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.
32 Lingabi ngabakhubekisi lakumaJuda lakumaGriki lebandleni likaNkulunkulu;
३२यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.
33 njengami futhi ezintweni zonke ngithokozisa bonke, ngingadingi olwami usizo, kodwa olwabanengi, ukuze basindiswe.
३३जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.

< 1 KwabaseKhorinte 10 >