< UZekhariya 10 >

1 Celani kuThixo izulu ngesikhathi sentwasahlobo; nguye uThixo owenza amayezi aleziphepho. Unika imikhizo yezulu ebantwini, lezihlahla zeganga ebantwini bonke.
वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
2 Izithombe zikhuluma inkohliso, izangoma zibona imibono yamanga; zikhuluma amaphupho amanga; ziphe induduzo engesulutho. Kungakho abantu bephumputheka njengezimvu bahlupheke ngoba bengelamelusi.
कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत.
3 “Ulaka lwami luyavutha kubelusi, njalo ngizabajezisa abaholi; ngoba uThixo uSomandla uzawunakekela umhlambi wezimvu zakhe, indlu kaJuda, abenze babe njengebhiza elilesithunzi empini.
परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.”
4 Ilitshe lekhoneni lizavela kuJuda, kuye kuzavela isikhonkwane sethente, kuye kuzavela idandili lokulwa impi, kuye kuzavela bonke ababusi.
“त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.
5 Ndawonye bazakuba njengamaqhawe alamandla empini enyathelela izitha zawo odakeni lwemigwaqo. Bazakulwa ngoba uThixo ephakathi kwabo, babanqobe abagadi bamabhiza.
ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.”
6 Ngizayiqinisa indlu kaJuda, ngisindise indlu kaJosefa. Ngizababuyisa ngoba ngilesihawu kubo. Bazakuba sengathi kangizange ngibakhalale, ngoba nginguThixo uNkulunkulu wabo njalo ngizabaphendula.
“मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.
7 Abako-Efrayimi bazakuba njengamaqhawe, lezinhliziyo zabo zizajabula kungathi banathe iwayini. Abantwababo bazakubona lokho bathokoze; inhliziyo zabo zizathokoza kuThixo.
एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.”
8 Ngizabamema ngibabuthe ndawonye. Ngempela ngizabahlenga; bazakuba banengi njengakuqala.
“मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल.
9 Lanxa ngibahlakazile phakathi kwezizwe, kodwa bazangikhumbula khonale emazweni akude. Bona kanye labantwababo bazaphila, njalo bazabuya.
होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
10 Ngizababuyisa basuke eGibhithe ngibaqoqe e-Asiriya. Ngizabaletha eGiliyadi leLebhanoni, kuze kungasabi lendawo ebaneleyo.
१०मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.”
11 Bazadabula phakathi kolwandle lokuhlupheka; ulwandle oluphuphumayo luzadediswa lezinziki zonke zeNayili zizakoma qha. Ukuzikhukhumeza kwe-Asiriya kuzakwehliswa lentonga yobukhosi yaseGibhithe izaphela.
११ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल.
12 Ngizabaqinisa kuThixo, bona bazahamba ngebizo lakhe,” kutsho uThixo.
१२मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.

< UZekhariya 10 >