< Amahubo 32 >

1 Ihubo likaDavida. Ubusisiwe lowo oziphambeko zakhe zithethelelwe, ozono zakhe zisibekelwe.
दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण) ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस.
2 Ubusisiwe lowo ongasoze abalelwe isono sakhe nguThixo, njalo ongelankohliso emoyeni wakhe.
परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
3 Ngathi lapho ngithule, amathambo ami ababuthakathaka ngenxa yokububula kwami ilanga lonke.
मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
4 Ngoba imini lobusuku isandla Sakho sasingelekile, singisinda; amandla ami aphela kwafana lesikhudumezi sehlobo.
कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
5 Lapho-ke ngasengisivuma isono sami Kuwe angabe ngisasibekela ububi bami. Ngathi, “Ngizazivuma iziphambeko zami kuThixo,” walithethelela icala lesono sami.
तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 Ngakho akuthi wonke umuntu othembekileyo akhuleke kuwe usatholakala; ngeqiniso kuzakuthi lapho impophoma seziqubuka, kabayi kumfinyelela.
याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 Uyindawo yami yokuphephela; uzangivikela enkathazweni ungizungeze ngezingoma zensindiso.
तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
8 Ngizakutshengisa ngikufundise indlela ofanele uhambe ngayo; ngizakweluleka ngikulinde.
परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
9 Ungabi njengebhiza loba imbongolo, khona akulakuzwisisa kodwa kumele kukhokhelwa ngamatomu ukuze umuntu kumlalele.
म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 Zinengi izikhalazo zababi, kodwa uthando lukaThixo olungaphuthiyo luyamzungeza umuntu othemba kuye.
१०वाईट लोकांस खूप दु: ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 Thokozani kuThixo, lithabe lina balungileyo; hlabelelani lonke lina eliqotho enhliziyweni!
११अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.

< Amahubo 32 >