< Amahubo 16 >

1 Imikithamu kaDavida. Ngilondoloza, Oh Nkulunkulu, ngoba ngiphephela kuwe.
दाविदाचे मिक्ताम (सुवर्णगीत) हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
2 Ngathi kuThixo, “UnguThixo wami; ngaphandle kwakho angilakho okuhle.”
मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
3 Labo abangcwele abakhona elizweni bangabakhazimulayo engithokoza ngabo.
पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.
4 Labo abagijimela abanye onkulunkulu inhlupho zabo zizakwanda. Angiyi kuyithulula iminikelo yegazi kubonkulunkulu labo njalo amabizo abo kawayikuphuma kwezami izindebe.
जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु: खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.
5 Thixo, usungahlukanisele isabelo sami kanye lenkezo yami; konke okwami usukumise kuhle.
परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.
6 Imingcele yesabelo sami idabula ezindaweni ezibukekayo; ngeqiniso elami ilifa liyathokozisa.
माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.
7 Ngizamdumisa uThixo, onguye ongelulekayo; lasebusuku inhliziyo yami iyangiqondisa.
मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते.
8 Ngikhangele kuThixo kokuphela. Njengoba esesandleni sami sokunene angiyi kunyikinywa.
मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
9 Ngakho-ke inhliziyo yami iyathokoza lolimi lwami luyajabula; lomzimba wami uzaphumula uvikelekile,
त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
10 ngoba kawuzukungiyekela ngize ngiye endaweni yabafileyo, njalo kawusoze wekele othembekileyo wakho ezwe ukubola. (Sheol h7585)
१०कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. (Sheol h7585)
11 Usungazisile indlela yempilo; uzangigcwalisa ngokuthaba phambi kwakho, ngenjabulo engapheliyo kwesokunene sakho.
११तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.

< Amahubo 16 >