< UGenesisi 45 >
1 UJosefa wehluleka ukuzibamba phambi kwazo zonke izinceku zakhe, wasememeza wathi, “Sukani lonke lapha kimi!” Ngakho kakho owayekhona loJosefa lapho eziveza kubafowabo.
१आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.
2 Wakhala kakhulu ephumisela amaGibhithe amuzwa, labendlu kaFaro bezwa ngalokho.
२तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.
3 UJosefa wathi kubafowabo, “Mina nginguJosefa! Kambe ubaba usaphila na?” Kodwa abafowabo behluleka ukumphendula ngoba besaba kakhulu bephambi kwakhe.
३मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.
4 UJosefa wasesithi kubafowabo, “Sondelani kimi.” Bathi sebekwenzile lokho wathi, “Ngingumfowenu uJosefa, yena lowo elamthengisela eGibhithe!
४तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले.
5 Kodwa manje lingakhathazeki njalo lingaze lazisola ngenxa yokungithengisa lapha, ngoba kwakuyikusiza imiphefumulo ukuba uNkulunkulu angithume phambi kwenu.
५आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
6 Sekube yiminyaka emibili manje indlala ikhona elizweni, njalo okweminyaka emihlanu ezayo kakuyikulinywa loba ukuvuna.
६हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.
7 Kodwa uNkulunkulu wangithuma phambi kwenu ukuba alilondolozele insalela emhlabeni njalo aphephise impilo zenu ngokukhulula okukhulu.
७देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
8 Ngakho-ke, kwakungayisini elangithuma lapha, kodwa nguNkulunkulu. Wangenza ngaba ngubaba kuFaro, lenkosi yomuzi wakhe wonke kanye lombusi weGibhithe lonke.
८मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”
9 Manje, phangisani liye kubaba lithi kuye, ‘Nanku indodana yakho uJosefa akutshoyo: UNkulunkulu usengenze ngaba yinkosi yalo lonke elaseGibhithe. Yehla uze kimi; ungaphuzi.
९योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.
10 Uzahlala esigodini saseGosheni ube seduze lami, wena labantwabakho, labazukulu bakho; lemihlambi yakho yezimvu leyenkomo lakho konke olakho.
१०तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील.
11 Ngizakunakekela ukhonapho ngoba kuseza eminye iminyaka emihlanu yendlala. Kungenjalo wena lomuzi wakho, labo bonke abangabakho lizahawukelwa.’
११येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.
12 Liyazibonela ngokwenu, njengoba lomnawami uBhenjamini ebona, ukuthi yimi mina ngeqiniso engikhuluma lani.
१२पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत.
13 Limtshele ubaba ngalo lonke udumo engiluphiwayo eGibhithe langakho konke elikubonileyo. Ubaba limlethe ngokuphangisa lapha.”
१३मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”
14 Wasegona umnawakhe uBhenjamini, wakhala, loBhenjamini wamanga ekhala.
१४मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.
15 Njalo wabanga bonke abafowabo ekhala kulowo lalowo. Ngemva kwalokho abafowabo baxoxa laye.
१५मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.
16 Kwathi ukuba izindaba zifike esigodlweni sikaFaro ukuthi abafowabo bakaJosefa babefikile, uFaro lezikhulu zakhe bathokoza.
१६“योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला.
17 UFaro wathi, kuJosefa, “Tshela abafowenu uthi, ‘Yenzani lokhu: Thwalisani izinyamazana zenu libuyele elizweni laseKhenani,
१७तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हास गरज असेल तेवढी अन्नसामग्री जनावरांवर लादून कनान देशास जा.
18 beselibuya loyihlo kanye lemizi yenu kimi. Ngizalipha umhlaba omuhle kakhulu lapha eGibhithe, likholise amanono elizwe.’
१८तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हास रहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.’
19 Uyalaywa njalo ukuthi ubatshele uthi, ‘Yenzani lokhu: Thathani izinqola ezithile lapha eGibhithe lisenzela abantwabenu, labomkenu, lithathe uyihlo lize laye.
१९तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.
20 Lingazihluphi ngempahla zenu ngoba okuhle konke kwaseGibhithe kuzakuba ngokwenu.’”
२०तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’”
21 Ngakho amadodana ka-Israyeli akwenza lokhu. UJosefa wabapha izinqola, njengokulaya kukaFaro, wabuye wabapha umphako wendlela.
२१तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली.
22 Ngulowo lalowo wamupha izigqoko ezintsha, kodwa uBhenjamini wamupha amashekeli esiliva angamakhulu amathathu kanye lezigqoko ezinhlanu.
२२तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
23 Njalo nanku akuphathisela uyise: obabhemi abalitshumi bethwele konke okuhle kwaseGibhithe, labobabhemi abasikazi abalitshumi bebhensiswa ngamabele lesinkwa lokunye okomphako wakhe wendlela.
२३त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या.
24 Wasevalelisa abafowabo, bathi sebesuka wathi kubo, “Lingaxabani endleleni!”
२४मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.”
25 Ngakho basuka baphuma eGibhithe bayafika kuyise uJakhobe elizweni laseKhenani.
२५अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपला पिता याकोब याच्याकडे गेले.
26 Bamtshela bathi, “UJosefa ulokhu ephila! Isibili ungumbusi walo lonke elaseGibhithe.” UJakhobe waphela amandla; kazange abakholwe.
२६त्यांनी आपल्या पित्यास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही.
27 Kodwa kwathi lapho sebemtshelile konke uJosefa ayekutshilo kubo, njalo esebone izinqola uJosefa ayethe zizomthwala zimlethe, umoya kayise, uJakhobe wavuseleleka.
२७परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.
28 U-Israyeli wathi, “Sengisuthisekile! Indodana yami uJosefa isaphila. Ngizahamba ngiyeyibona ngingakafi.”
२८इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.”