< U-Eksodusi 9 >
1 UThixo wasesithi kuMosi, “Yana kuFaro uthi kuye, ‘Nanku okutshiwo nguThixo, uNkulunkulu wamaHebheru, ukuthi, “Yekela abantu bami bahambe, ukuze bayengikhonza.”
१नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.’
2 Ungabalela ukuthi bahambe ube ulokhu ubabambile
२जर तू त्यांना जाण्यापासून सतत असाच नाकारीत राहशील व जर तू त्यांना मागे ठेवून घेशील.
3 uThixo uzakwehlisela isifo esibi ezifuyweni zakho emadlelweni, amabhiza enu, obabhemi, amakamela, inkomo, izimvu lembuzi.
३तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.
4 Kodwa uThixo uzakwenza umahluko phakathi kwezifuyo zabako-Israyeli lezamaGibhithe ukuze kungafi lasinye isifuyo sabako-Israyeli.’”
४परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यांच्यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.”
5 UThixo wamisa isikhathi esithile wathi, “uThixo uzakwenza lokhu kusasa elizweni leli.”
५याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “या देशात उद्या हे सर्व घडून येईल.”
6 Lakanye ngelanga elilandelayo uThixo wakwenza, zonke izifuyo zamaGibhithe zafa, kodwa akufanga ngitsho lasinye isifuyo sabako-Israyeli.
६दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही.
7 UFaro wathuma amadoda ukuyahlola umonakalo afumana ukuthi kwakungafanga sifuyo lasinye sabako-Israyeli. Kodwa inhliziyo yakhe yala ilokhu ilukhuni, wabalela abantu ukuthi bahambe.
७फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
8 UThixo wasesithi kuMosi lo-Aroni, “Thathani umlotha omlutshwana eziko lifike kuFaro uMosi awuhazele emoyeni phambi kwakhe.
८नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारोदेखत आकाशाकडे उधळावी.
9 Uzakuba luthuli phezu kwelizwe lonke laseGibhithe, lapho-ke kuzaphihlika amathumba amabi ebantwini lasezinyamazaneni kulolonke ilizwe.”
९त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरतील आणि त्यांच्या स्पर्शाने मनुष्यांना व पशूंना फोड येऊन गळवे येतील.”
10 Ngakho bathatha umlotha eziko baya kuFaro. UMosi wawuhazela emoyeni, abantu bonke lezinyamazana zonke kwamilwa ngamathumba aphihlikayo.
१०तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे मनुष्यांना व पशूंना फोड व गळवे आले.
11 Izangoma zehluleka ukumisana loMosi ngenxa yamathumba ayezibulala kanye lamaGibhithe wonke.
११गळव्यामुळे जादूगारांना मोशेपुढे उभे राहवेना. कारण जादूगारांना व सर्व मिसरी लोक यांना गळवे आली होती.
12 Kodwa uThixo wenza yaba lukhuni inhliziyo kaFaro wala ukulalela uMosi lo-Aroni njengoba uThixo wayevele etshilo kuMosi.
१२परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते.
13 UThixo wasesithi kuMosi, “Vuka ekuseni kakhulu uye kuFaro, uthi kuye, ‘Nanku okutshiwo nguThixo, uNkulunkulu wamaHebheru, uthi, yekela abantu bami bahambe ukuze bayengikhonza.
१३मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्यास सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.
14 Kungenjalo kulesisikhathi ngizakwehlisa ubunzima bezinhlupho zami obulesihluku phezu kwakho, phezu kwezinceku zakho labantu bakho ukuze lazi ukuthi kakho omunye onjengami emhlabeni wonke.
१४कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल.
15 Kunje nje ngabe sengiselulile isandla sami ngakutshaya kanye labantu bakho ngesifo ebesizakucitsha emhlabeni.
१५मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता.
16 Kodwa ngikuphephisile ngayonale injongo yokuthi ngikubonise amandla ami, lokuthi ibizo lami lifakazwe kuwo wonke umhlaba.
१६परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.
17 Ulokhu utshingela abantu bami ubalela ukuthi bahambe.
१७तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस.
18 Ngalokho-ke ngalesisikhathi kusasa ngizakwehlisa isiqhotho esingakaze sehlele eGibhithe lilokhu lababala laba khona ilizwe leli.
१८म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
19 Wohle nje uthumezele ilizwi lokuthi izifuyo zakho lakho konke olakho emadlelweni kubuyiswe kuvalelwe esibayeni esivikelweyo ngoba isiqhotho leso sizatshaya umuntu wonke lesifuyo sonke esingabuthwanga nxa silokhu sisegangeni, konke kuzakufa.’”
१९तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा मनुष्य किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”
20 Lezozikhulu zikaFaro ezalesabayo ilizwi likaThixo zaphanga zangenisa izigqili zazo lezifuyo ngaphakathi.
२०फारोच्या सेवकांपैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले.
21 Labo abangalinanzanga ilizwi likaThixo izigqili zabo lezifuyo zabo bakuyekela kusegangeni.
२१परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले व रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली.
22 UThixo wasesithi kuMosi, “Yelula isandla sakho siye phezulu ukuze kune isiqhotho kulolonke iGibhithe, phezu kwabantu lezinyamazana laphezu kwakho konke okukhulayo emasimini aseGibhithe.”
२२परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरुवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”
23 UMosi wonela ukukhomba ngentonga yakhe phezulu, uThixo wehlisa umdumo lesiqhotho, umbane wabaneka phansi emhlabathini. Ngakho uThixo wanisa isiqhotho elizweni laseGibhithe.
२३तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.
24 Isiqhotho satshaya umbane wabaneka yonke indawo. Sasingakaze sibe khona isiphepho esinjalo sekulokhu isizwe saseGibhithe saba khona.
२४गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरावर कधी आले नव्हते.
25 Isiqhotho satshaya saqothula yonke into egangeni, abantu lezinyamazana; sabhuqa konke okukhulayo emasimini, saphundla izihlahla zonke eGibhithe.
२५त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही वनांत होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतांतील सर्व वनस्पतींवर मारा झाला. तसेच वनांतील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली.
26 Indawo eyasilayo yiGosheni lapho okwakulabako-Israyeli khona.
२६गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही.
27 UFaro wasebiza uMosi lo-Aroni. Wathi kubo, “Okwamanje ngenze isono. UThixo ulungile, kukanti mina labantu bami siyizoni.
२७फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “या वेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत.
28 Khulekani kuThixo, ngoba ukukhwaza kwezulu lesiqhotho sekwanele. Ngizaliyekela lihambe; akusadingeki ukuthi lihlale.”
२८तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हास जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.”
29 UMosi waphendula wathi. “Nxa sengiphumile edolobheni ngizavula izandla zami ngikhuleke kuThixo. Ukuduma kuzakhawula kungabe kusaba lesiqhotho, ukuze wazi ukuthi umhlaba ngokaThixo.
२९मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
30 Kodwa ngiyazi ukuthi wena lezikhulu zakho lilokhu lingamesabi uThixo uNkulunkulu.”
३०परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वर देवाचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.”
31 (Amabele lebhali kwabhuqwa nya ngoba amabele ayeselezikhwebu lophoko selumumethe.
३१या वेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसास बोंडे आली होती. या पिकांचा आता नाश झाला.
32 Ingqoloyi lenyawuthi khona kakuthintwanga ngoba kuvuthwa muva.)
३२परंतु साधा गहू व काठ्या गहू इतर धान्यापेक्षा उशिरा पिकतात; त्याची उशिरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.
33 UMosi wasesuka kuFaro waphuma edolobheni. Welulela izandla zakhe kuThixo; ukuduma kwezulu lesiqhotho kwakhawula, izulu alabe lisana emhlabeni.
३३मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली, आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले.
34 Kwathi uFaro ebona ukuthi izulu lesiqhotho lokukhwaza kwezulu kwasekukhawule waphinda wenza isono: Yena lezikhulu zakhe benza inhliziyo zabo zaba lukhuni.
३४पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले.
35 Ngakho inhliziyo kaFaro yaba lukhuni akaze avumela abako-Israyeli ukuthi bahambe njengoba uThixo wayetshilo ngoMosi.
३५फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांस मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले.