< U-Eksodusi 31 >

1 UThixo wathi kuMosi,
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला
2 “Khangela, sengikhethe uBhezaleli indodana ka-Uri oyindodana kaHuri owesizwe sikaJuda
“पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.
3 ngamgcwalisa ngomoya kaNkulunkulu, ukuhlakanipha, ukuqedisisa lolwazi ekwenzeni yonke imisebenzi yobungcitshi
देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.
4 ukuze adwebe imisebenzi yobungcitshi ngesimo sezinto ezenziwa ngegolide, isiliva kanye lethusi,
तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील.
5 abaze amatshe awabeke kuhle, abaze izigodo kanye lokwenza yonke imisebenzi yomuntu oleminwe lobungcwethi.
तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.
6 Phezu kwalokho, ngikhethe lo-Oholiyabhi indodana ka-Ahisamakhi, owesizwe sikaDani ukuba amncedise. Nginike ulwazi kuzozonke izingcitshi ukuba zenze konke engikulaye ukuba kwenziwe:
त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दी ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.
7 ithente lokuhlangana, umtshokotsho wobufakazi, isihlalo somusa esikuwo, lakho konke okunye okokuhlobisa ithente:
म्हणजे दर्शनमंडप, आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूच्या सर्व वस्तू;
8 itafula lezitsha zalo, uluthi lwesibane lwegolide elicolekileyo lezitsha zalo zonke, i-alithari lempepha,
मेज व त्यावरील सर्व वस्तू, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;
9 i-alithari lomnikelo wokutshiswa kanye lezitsha zalo zonke, lomkolo kanye lezinyawo zawo
होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;
10 lezembatho ezelukiweyo, lezembatho ezingcwele zika-Aroni umphristi kanye lezembatho zamadodana akhe ezomsebenzi wabo wobuphristi,
१०अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, कुशलतेने विणलेली तलम व पवित्र वस्रे;
11 lamafutha okugcobela isikhundla, lempepha enuka mnandi eyeNdawo eNgcwele. Kumele bakwenze njengoba ngikulayile.”
११अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील.”
12 UThixo wasesithi kuMosi,
१२नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
13 “Batshele abako-Israyeli uthi, ‘Kumele ligcine amaSabatha ami. Lokhu kuzakuba luphawu phakathi kwami lani kuzizukulwane zenu ezizayo, ukuze lazi ukuthi mina nginguThixo olenza libengcwele.
१३“इस्राएल लोकांस हे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण की पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की, तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
14 Gcinani iSabatha ngoba lingcwele kini. Lowo olonayo kumele abulawe, lalowo osebenzayo ngalolosuku uzasuswa ebantwini bakibo.
१४म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसास जर कोणी भ्रष्ट करील तर त्यास अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्यादिवशी काम करील, त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.
15 Umsebenzi kawenziwe okwensuku eziyisithupha, kodwa usuku lwesikhombisa luliSabatha lokuphumula, lungcwele kuThixo. Lowo osebenzayo ngosuku lweSabatha kumele abulawe.
१५सहा दिवस काम करावे. परंतु सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमविश्रामाचा शब्बाथ होय. जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्यास अवश्य ठार मारावे.
16 Abako-Israyeli kumele bagcine iSabatha, baligcine kuzizukulwane zabo ezizayo njengesivumelwano esingapheliyo.
१६इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.
17 Lizakuba luphawu phakathi kwami labako-Israyeli nini lanini. Ngoba ngezinsuku eziyisithupha uThixo wenza amazulu lomhlaba, kwathi ngosuku lwesikhombisa waphumula.’”
१७शब्बाथ दिवस इस्राएल लोकांमध्ये व माझ्यामध्ये कायमची खूण आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी स्वस्थ राहून विसावा घेतला.”
18 Kwathi lapho uThixo eseqedile ukukhuluma loMosi entabeni yaseSinayi wamnika izibhebhedu ezimbili zamatshe obufakazi, izibhebhedu zamatshe alotshwe ngomunwe kaNkulunkulu.
१८या प्रमाणे देवाने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन दगडी पाट्यांचे आज्ञापट त्यास दिले.

< U-Eksodusi 31 >