< 2 Imilando 18 >
1 Ngakho uJehoshafathi wayenothe kakhulu njalo ehlonipheka, waba lobunini lo-Ahabi ngokwendiselana.
१यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला.
2 Ngemva kweminyaka ethile wayakwethekelela u-Ahabi eSamariya. U-Ahabi wamhlabela izimvu ezinengi lenkomo yena kanye labantu ayelabo njalo wamkhuthaza ukuba ahlasele iRamothi Giliyadi.
२त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.
3 U-Ahabi inkosi yako-Israyeli yabuza uJehoshafathi inkosi yakoJuda wathi: “Uzahamba lami na ukuyahlasela iRamothi Giliyadi?” UJehoshafathi waphendula wathi, “Mina nginjengawe, abantu bami banjengabantu bakho; sizakuba lawe empini.”
३अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.”
4 Kodwa uJehoshafathi waphinda wathi enkosini yako-Israyeli, “Akubuze kuThixo kuqala.”
४यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.”
5 Ngakho inkosi yako-Israyeli yasibuthanisa abaphrofethi, amadoda angamakhulu amane, yababuza yathi, “Siphume impi siyehlasela iRamothi Giliyadi, loba ngizithibe na?” Bayiphendula bathi, “Hamba, ngoba uNkulunkulu uzayinikela esandleni senkosi.”
५तेव्हा इस्राएलाचा राजा अहाबाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, “जरुर जा. कारण देव राजाला जय देईल.”
6 Kodwa uJehoshafathi wabuza wathi, “Kambe kakusela mphrofethi kaThixo lapha esingabuza kuye na?”
६पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.”
7 Inkosi yako-Israyeli yathi kuJehoshafathi, “Ukhona oyedwa esingabuza uThixo ngaye kodwa ngiyamzonda ngoba kakaze aphrofethe okuhle ngami, uhlala ekhuluma okubi. Ibizo lakhe nguMikhaya indodana ka-Imla.” UJehoshafathi wathi, “Inkosi kayimelanga itsho njalo.”
७तेव्हा इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “इथे तसा एकजण आहे. त्याच्या मार्फत आपण परमेश्वरास विचारु शकतो. पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही. नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो. त्याचे नाव मीखाया. तो इम्लाचा पुत्र.” पण यहोशाफाट म्हणाला, “अहाब, तू असे म्हणू नकोस.”
8 Ngakho inkosi yako-Israyeli yabiza esinye sezikhulu zayo yathi kuso, “Ngibizela uMikhaya indodana ka-Imla khathesi.”
८तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून “इम्लाचा पुत्र मीखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले.”
9 Bembethe izembatho zabo zobukhosi, inkosi yako-Israyeli loJehoshafathi inkosi yakoJuda babehlezi ezihlalweni zabo zobukhosi esizeni sokubhulela amabele esangweni laseSamariya labo bonke abaphrofethi bephrofetha phambi kwabo.
९इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या वेशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनांवर विराजमान झाले होते. त्यांच्यासमोर ते चारशे संदेष्टे भविष्यकथन करत होते.
10 UZedekhiya indodana kaKhenana wayekhande impondo zensimbi, wasesithi, “Nanku okutshiwo nguThixo, uthi: ‘Ngempondo lezi uzagwaza ama-Aramu uwabhubhise.’”
१०कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’”
11 Bonke abaphrofethi babevele bephrofetha okufananayo besithi, “Hlasela iRamothi Giliyadi unqobe, ngoba uThixo uyinikile esandleni senkosi.”
११इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.”
12 Isithunywa esasithunywe ukuyabiza uMikhaya sathi kuye, “Khangela, abanye abaphrofethi bafakaza bengela kuthandabuza ukuthi inkosi izanqoba. Lawe vumelana labo, ukhulume okuyithokozisayo.”
१२मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”
13 Kodwa uMikhaya wathi, “Ngeqiniso njengoba uThixo ekhona, engingamtshela khona yilokhu okutshiwo nguThixo.”
१३पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”
14 Uthe efika, inkosi yambuza yathi, “Mikhaya, siye empini eRamothi Giliyadi, loba ngizithibe na?” Yena waphendula wathi: “Hlasela unqobe, ngoba bazanikelwa ezandleni zakho.”
१४मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्यास म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.”
15 Inkosi yathi kuye, “Kumele ngikufungise kangaki ukuze ungangikhohlisi kodwa ungitshele iqiniso ebizweni likaThixo?”
१५राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!”
16 Ngakho uMikhaya waphendula wathi, “Ngabona abako-Israyeli bonke behlakazekile emaqaqeni njengezimvu ezingelamelusi, uThixo wathi, ‘Lababantu kabalamkhokheli. Kabazibuyelele emakhaya ngokuthula.’”
१६यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांस डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.”
17 Inkosi yako-Israyeli yathi kuJehoshafathi, “Kangikutshelanga yini ukuthi uvele kaphrofethi lutho oluhle ngami kodwa okubi kuphela na?”
१७इस्राएलचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “मीखाया मला कधीच परमेश्वराचा शुभसंदेश देत नाही. तो नेहमी प्रतिकूलच बोलतो असे मी तुला म्हणालोच होतो.”
18 UMikhaya waqhubeka wathi, “Ngakho zwanini ilizwi likaThixo: Ngabona uThixo ehlezi esihlalweni sakhe sobukhosi lebutho lonke lasezulwini limi ngakwesokudla langakwesokhohlo.
१८मीखाया म्हणाला, “तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती.”
19 Njalo uThixo wathi, ‘Ngubani ozakhohlisa u-Ahabi inkosi yako-Israyeli ukuba ahlasele eRamothi Giliyadi njalo ayofela khona na?’ Omunye wabonisa lokhu, omunye laye lokhuyana.
१९परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,
20 Ekucineni kwavela umoya, wema phambi kukaThixo wathi: ‘Mina ngizamhuga.’ UThixo wathi kuwo: ‘Ngendlela bani na?’
२०“मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?”
21 Wona wathi: ‘Ngizahamba ngiyekuba ngumoya wokuqamba amanga emilonyeni yabo bonke abaphrofethi bakhe.’ UThixo wathi: ‘Uzaphumelela ukumhuga. Hamba-ke uyekwenza lokho.’
२१तेव्हा तो म्हणाला, “अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील, चल जा आपल्या कामगिरीवर.”
22 Ngakho khathesi uThixo usefake umoya wenkohliso emilonyeni yabaphrofethi bakho bonke laba. UThixo usekumisele ukubhujiswa.”
२२“अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
23 Ngakho uZedekhiya indodana kaKhenana waphakama wayawakala uMikhaya ngempama ebusweni, watsho embuza wathi, “Umoya kaThixo wasuka njani kimi ukuyakhuluma kuwe na?”
२३तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”
24 UMikhaya waphendula wathi, “Wena ngokwakho uzakubona lokho mhla ubalekela endlini engaphakathi usiyacatsha.”
२४मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”
25 Inkosi yako-Israyeli yathi, “Bambani uMikhaya, limbuyisele ku-Amoni umbusi wedolobho lakuJowashi indodana yenkosi
२५इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा
26 lithi: ‘Nanku okutshiwo yinkosi, ithi: Valelani umuntu lo entolongweni, lingamniki lutho ngaphandle kwesinkwa lamanzi ngize ngiphenduke kukuhle.’”
२६आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्यास कैदयांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.”
27 UMikhaya waqonqosela wathi: “Nxa ungaphenduka kuhle, uThixo uyabe engakhulumanga ngami.” Waqhubeka wathi, “Lani lonke bantu abambisiseni amazwi ami!”
२७मीखाया म्हणाला, “अहाब तू लढाईनंतर सुखरुप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोकहो, माझे हे शब्द लक्षात ठेवा.”
28 Ngakho inkosi yako-Israyeli loJehoshafathi inkosi yakoJuda baya eRamothi Giliyadi.
२८इस्राएलचा राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ-गिलादावर हल्ला चढवला.
29 Inkosi yako-Israyeli yathi kuJehoshafathi: “Mina ngizakuya empini ngizazifihla ngokulahlisa isimo sami, kodwa wena gqoka ezakho ezobukhosi.” Ngakho inkosi yako-Israyeli yazifihla ngokulahlisa isimo sayo yangena empini.
२९इस्राएलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, “मी युध्दात जातांना वेषांतर करतो. तू मात्र राजवस्त्रेच घाल.” आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले.
30 Ngakho inkosi yase-Aramu yayiqonqosele abalawuli bezinqola zokulwa yathi, “Lingalwi lamuntu, loba ngomncinyane loba ngomkhulu, ngaphandle kwenkosi yako-Israyeli.”
३०अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”
31 Abalawuli bezinqola zokulwa bathi bebona uJehoshafathi bathi, “Yiyonale inkosi yako-Israyeli.” Ngakho bamphendukela ukuba bamhlasele, kodwa uJehoshafathi wahlaba umkhosi, uThixo wamsiza. UNkulunkulu wabenza baya khatshana laye,
३१त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
32 ngoba abalawuli bezinqola zokulwa bathi sebebonile ukuthi kasiyo inkosi yako-Israyeli, abazange besaxotshana laye.
३२हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.
33 Kodwa omunye watshoka kungananzelelwe umtshoko waphutsha emkhandlwini wesikhali wagwaza inkosi yako-Israyeli. Inkosi yatshela umtshayeli wenqola yokulwa yathi, “Phendula inqola yakho ungisuse lapha, sengilimele.”
३३पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून, लक्ष्य निश्चित न करता, धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्राएलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मागे वळ आणि मला युध्द भूमीतून बाहेर काढ. मी जखमी झालो आहे.”
34 Impi yalwiwa ilanga lonke, njalo inkosi yako-Israyeli yeyama enqoleni yayo yokulwa ikhangele ama-Aramu kwaze kwaba ntambama. Kuthe litshona layo yabe isifa.
३४त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.