< सफन्या 1 >
1 १ यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा योशीया याच्या दिवसात, परमेश्वराचे हे वचन सफन्या जो कूशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो हिज्कीयाचा मुलगा, याजकडे आले. ते असे,
Az Örökkévaló igéje, mely lett Czefanjához, Kúsi fiához, a ki fia Gedaljának, Chizkíja fia; Amarja fiának, Jósijáhú, Ámón fia, Jehúda királyának napjaiban.
2 २ परमेश्वर असे म्हणतो की, “मी पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा पूर्णपणे नाश करीन.
Elveszítve elveszitek; mindent a föld színéről, úgymond az Örökkévaló;
3 ३ मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो.
elveszítek embert és állatot, elveszítem az ég madarait és a tenger halait, és a botlás okait a gonoszokkal együtt; és kiirtom az embert a föld színéről, úgymond az Örökkévaló.
4 ४ मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन.
Kinyújtom kezemet Jehúda ellen, meg mind a Jeruzsálem lakói ellen, s kiirtom ebből a helyből a Báal maradékát, a bálványpapok; nevét a papokkal együtt;
5 ५ जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,
meg azokat a kik leborulnak a háztetőkön az ég serege előtt, s a leborulókat, kik esküsznek; az Örökkévalóra, és a kik esküsznek Malkámra;
6 ६ आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.”
és azokat, kik elhúzódnak az Örökkévaló mellől, és a kik nem keresték az Örökkévalót és nem kérdezték meg.
7 ७ प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत शांत राहा, कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे; कारण परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे, आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे.
Csitt az Úr, az Örökkévaló előtt! Mert közel van az Örökkévaló napja; mert készített az Örökkévaló áldozást, szentelte meghívottjait.
8 ८ “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, असे होईल की, मी राजाची मुले व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन आणि परदेशीय वस्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईन.
És lészen az Örökkévaló áldozásának napján, megbüntetem a nagyokat meg a királyfiakat s mindazokat, kik idegen öltözékbe öltözködnek.
9 ९ तेव्हा उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि जे आपल्या धन्याचे घर फसवणूक व हिंसाचाराने भरतात त्यांना मी त्या दिवशी शिक्षा देईन.”
És megbüntetem mind azt, a ki a küszöbön átugrik, ama napon, a kik megtöltik uruknak házát erőszakkal és csalással.
10 १० परमेश्वर असेही म्हणाला, त्या दिवशी, मासळी दारातून आक्रंदनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत आणि टेकड्यांवरून मोठा धडाक्याचा आवाज होईल.
És lészen ama napon, úgymond az Örökkévaló, hallik jajkiáltás a halak kapuja felől, és jajgatás a második városrész felől, és nagy romlás a halmokról.
11 ११ मक्तेशातल्या रहिवाश्यांनो गळा काढून रडा, कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत.
Jajgassatok ti lakói a Mozsárnak, mert megsemmisült az egész kanaáni nép, kiírtattak mind az ezüsttel terheltek.
12 १२ “तेव्हा मी एक दिवा घेऊन यरूशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.’
És lészen amaz időben, átkutatom Jeruzsálemet mécsesekkel és megbüntetem azon férfiakat, kik ott merevednek seprűjükön, akik azt mondják szívükben: nem tesz jót az Örökkévaló, se nem rosszat:
13 १३ त्यांची संपत्ती लूट अशी होईल, आणि त्यांच्या घरांचा त्याग करण्यात येईल. ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील, पण त्यांना द्राक्षरस प्यायला मिळणार नाही.
hogy legyen vagyonuk kifosztásra, házaik pedig pusztulásra; építenek házakat, de nem lakják, ültetnek szőlőket, de nem isszák borukat.
14 १४ परमेश्वराचा महान दिवस जवळ येत आहे. तो जवळ आहे आणि वेगाने येऊ पाहत आहे! परमेश्वराच्या दिवसाचा आवाज होतो, तेथे वीर दु: खाने ओरडत आहे.
Közel van az Örökkévalónak nagy napja, közel van és siet nagyon; hallga, az Örökkévaló napja: keservesen sikolt ott a hős.
15 १५ तो दिवस क्रोधाचा, दु: खाचा व क्लेशाचा दिवस आहे, वादळ व नासधूस ह्यांचा दिवस आहे, उजाडीचा व ओसाडीचा दिवस, अभ्रांचा व अंधाराचा दिवस आहे.
Haragnak napja ama nap, szorítás és szorongatás napja, vihar és viharzás napja, sötétség és homály napja, felhőnek és sűrű ködnek napja!
16 १६ तो दिवस तटबंदीच्या शहरांविरूद्ध आणि उंच बूरूजांविरूद्ध तुतारीच्या शब्दाचा व गजराचा असा आहे.
Harsona és riadás napja az erősített városok fölött és a magas ormok fölött.
17 १७ मी मनुष्यजातीवर पीडा आणीन, तेव्हा ते अंधळ्यांप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे. त्याचे रक्त धूळीसारखे ओतले जाईल, व त्यांचे मांस शेणासारखे फेकले जाईल.
És szorongatom az embereket, hogy járjanak mint a vakok, mert az Örökkévaló ellen vétkeztek, és majd ontatik a vérük mint a por, és húsuk, mint a ganéj.
18 १८ परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोनेचांदी त्यांना वाचवू शकणार नाही. तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टकली जाईल, कारण देशांतल्या सर्व राहणाऱ्यांविरुद्ध जो नाश तो आणणार आहे, तो भयानक असेल!”
Sem ezüstjök, sem aranyuk nem mentheti majd meg őket, az Örökkévaló haragjának napján – és buzgalmának tűzétől megemésztetik az egész föld. Mert végpusztítást, bizony rémületest visz véghez mind a föld lakóival.