< सफन्या 3 >
1 १ त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.
Woe to the rebellious and unclean city of oppression,
2 २ तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही. तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही.
She has not obeyed the voice, she has not accepted instruction, In the Lord she has not trusted, to her God she has not drawn near.
3 ३ तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळच्या वेळचे लांडगे आहेत, जे सकाळपर्यंत कशाचीही नामोनिशाणी ठेवत नाहीत!
Her rulers in her midst are roaring lions. Her judges are evening wolves, who leave nothing over until the morning,
4 ४ तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत. तिच्या याजकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे!
Her prophets are braggarts, faithless men. Her priests profane what is holy and do violence to the law.
5 ५ परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही! तो दररोज आपला न्याय उजेडात आणतो! तो प्रकाशात लपवला जाणार नाही, तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही.
The Lord is righteous in her midst, he does no wrong, Morning by morning he establishes his decree, Light is not lacking, an oversight is unknown. But the unjust know no shame.
6 ६ मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे. मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे व आता येथून कोणीही जात नाही. त्यांची शहरे नष्ट झाली, त्यामुळे तिथे कोणीही राहत नाही.
‘I have cut off nations, their turrets are destroyed; I have laid waste their broad streets, so that none passes over them. Desolate are their cities without people, without inhabitants.’
7 ७ मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत.
I said: ‘Surely the city will fear me, she will accept instruction. Nothing will vanish from her eyes that I have impressed upon her; But the more zealously have they made all their deeds corrupt.’
8 ८ ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला ऊठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी, आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा, असा मी निश्चय केला आहे, कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.
Wait for me, is the Lord’s message, until the day when I stand up as a witness, for it is my fixed purpose to gather the nations, to collect the kingdoms, to pour upon them my wrath and my hot anger; for by the fire of my fury will all the earth be consumed.
9 ९ त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी.
For then I will purify the lips of all peoples, so that they will all call on the Lord’s name, to serve him with one accord.
10 १० कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील.
From beyond the rivers of Cush my worshipers will bring me offerings.
11 ११ त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही, कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन, आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस.
On that day you will no longer be ashamed of all your deeds by which you rebelled against me. For I will rid you of your proudly arrogant ones, and you will never again be haughty on my holy mountain.
12 १२ तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकांसच राहू देईन, आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील.”
But I will leave in your midst a people humble and poor, and the remnant of Israel will trust in the name of the Lord.
13 १३ “इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जीभ आढळणार नाही. ते चरुन आडवे पडून राहतील व त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
They will not do evil, nor speak falsehood, and a deceitful tongue will not be found in their mouth; but they will pasture and lie down, and no one will make them afraid.
14 १४ सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर!
Cry out with joy, daughter of Zion, shout aloud, Israel! Rejoice and exult with all your heart, daughter of Jerusalem.
15 १५ कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही!
The Lord has put away your adversaries, he has turned away your foes; the Lord is king in your midst, you will fear evil no more.
16 १६ त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको.
In that day it will be said to Jerusalem: Fear not! Zion, let not your hands grow weak!
17 १७ परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
The Lord your God is in your midst, a victorious hero. He will rejoice over you with joy, he will renew his love, he will exult over you with singing,
18 १८ जे लोक सणाच्या वेळेकरता दु: ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन.
as on a day of festival. I will take away from you your disgrace, and put away from you your reproach.
19 १९ त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन.
I will destroy at that time all who afflict you. I will deliver the lame, and gather the outcast, I will make them an object of renown and fame in all the earth.
20 २० त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन, मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिध्दी व कीर्ती मिळवून देईन. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचयित करीन.” असे परमेश्वर म्हणतो!
I will do good to you, at the time when I gather you. For I will make you an object of fame and renown among all the peoples of the earth; when I bring back your captivity before your eyes. This says the Lord.