< सफन्या 2 >

1 हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या.
הִֽתְקוֹשְׁשׁוּ וָקוֹשּׁוּ הַגּוֹי לֹא נִכְסָֽף׃
2 फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या.
בְּטֶרֶם לֶדֶת חֹק כְּמֹץ עָבַר יוֹם בְּטֶרֶם ׀ לֹא־יָבוֹא עֲלֵיכֶם חֲרוֹן אַף־יְהוָה בְּטֶרֶם לֹא־יָבוֹא עֲלֵיכֶם יוֹם אַף־יְהוָֽה׃
3 पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित रहाल.
בַּקְּשׁוּ אֶת־יְהוָה כָּל־עַנְוֵי הָאָרֶץ אֲשֶׁר מִשְׁפָּטוֹ פָּעָלוּ בַּקְּשׁוּ־צֶדֶק בַּקְּשׁוּ עֲנָוָה אוּלַי תִּסָּתְרוּ בְּיוֹם אַף־יְהוָֽה׃
4 गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल. ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल.
כִּי עַזָּה עֲזוּבָה תִֽהְיֶה וְאַשְׁקְלוֹן לִשְׁמָמָה אַשְׁדּוֹד בַּֽצָּהֳרַיִם יְגָרְשׁוּהָ וְעֶקְרוֹן תֵּעָקֵֽר׃
5 समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे. कनान, जो पलिष्ट्यांचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की, तुझ्यात कोणीही रहीवासी उरणार नाही.
הוֹי יֹֽשְׁבֵי חֶבֶל הַיָּם גּוֹי כְּרֵתִים דְּבַר־יְהוָה עֲלֵיכֶם כְּנַעַן אֶרֶץ פְּלִשְׁתִּים וְהַאֲבַדְתִּיךְ מֵאֵין יוֹשֵֽׁב׃
6 तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल.
וְֽהָיְתָה חֶבֶל הַיָּם נְוֺת כְּרֹת רֹעִים וְגִדְרוֹת צֹֽאן׃
7 किनाऱ्याचा प्रदेश यहूदाच्या घराण्यातील राहिलेल्यांचा होईल. ते त्यावर आपले कळप चारतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील घरात विश्रांती घेतील, कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांची काळजी घेईल, आणि त्यांचे भविष्य पुनर्संचयित करीन.
וְהָיָה חֶבֶל לִשְׁאֵרִית בֵּית יְהוּדָה עֲלֵיהֶם יִרְעוּן בְּבָתֵּי אַשְׁקְלוֹן בָּעֶרֶב יִרְבָּצוּן כִּי יִפְקְדֵם יְהוָה אֱלֹהֵיהֶם וְשָׁב שבותם שְׁבִיתָֽם׃
8 मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.
שָׁמַעְתִּי חֶרְפַּת מוֹאָב וְגִדּוּפֵי בְּנֵי עַמּוֹן אֲשֶׁר חֵֽרְפוּ אֶת־עַמִּי וַיַּגְדִּילוּ עַל־גְּבוּלָֽם׃
9 ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”
לָכֵן חַי־אָנִי נְאֻם יְהוָה צְבָאוֹת אֱלֹהֵי יִשְׂרָאֵל כִּֽי־מוֹאָב כִּסְדֹם תִּֽהְיֶה וּבְנֵי עַמּוֹן כַּֽעֲמֹרָה מִמְשַׁק חָרוּל וּמִכְרֵה־מֶלַח וּשְׁמָמָה עַד־עוֹלָם שְׁאֵרִית עַמִּי יְבָזּוּם וְיֶתֶר גוי גּוֹיִי יִנְחָלֽוּם׃
10 १० मवाब व अम्मोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्याचा परमेश्वर याच्या लोकांस टोमणे मारले व त्यांची थट्टा केली.
זֹאת לָהֶם תַּחַת גְּאוֹנָם כִּי חֵֽרְפוּ וַיַּגְדִּלוּ עַל־עַם יְהוָה צְבָאֽוֹת׃
11 ११ ते लोक परमेश्वरास घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल, सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी व सर्व राष्ट्रद्विपे त्याची आराधना करतील.
נוֹרָא יְהוָה עֲלֵיהֶם כִּי רָזָה אֵת כָּל־אֱלֹהֵי הָאָרֶץ וְיִשְׁתַּֽחֲווּ־לוֹ אִישׁ מִמְּקוֹמוֹ כֹּל אִיֵּי הַגּוֹיִֽם׃
12 १२ अहो कूशींनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.
גַּם־אַתֶּם כּוּשִׁים חַֽלְלֵי חַרְבִּי הֵֽמָּה׃
13 १३ नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल.
וְיֵט יָדוֹ עַל־צָפוֹן וִֽיאַבֵּד אֶת־אַשּׁוּר וְיָשֵׂם אֶת־נִֽינְוֵה לִשְׁמָמָה צִיָּה כַּמִּדְבָּֽר׃
14 १४ तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.
וְרָבְצוּ בְתוֹכָהּ עֲדָרִים כָּל־חַיְתוֹ־גוֹי גַּם־קָאַת גַּם־קִפֹּד בְּכַפְתֹּרֶיהָ יָלִינוּ קוֹל יְשׁוֹרֵר בַּֽחַלּוֹן חֹרֶב בַּסַּף כִּי אַרְזָה עֵרָֽה׃
15 १५ जी नगरी आधी हर्षात व भीती शिवाय जगत होती, आणि आपल्या मनात म्हणत होती की, मीच आहे आणि माझ्याबरोबरीची दुसरी कोणीच नाही, तीच ही आहे. ती आता कशी ओसाड व वनपशू बसण्याचे स्थान अशी झाली आहे! आणि तिच्याजवळून जाणारा येणारा प्रत्येकजण फुसफुसणार व आपला हात हलवणार!
זֹאת הָעִיר הָעַלִּיזָה הַיּוֹשֶׁבֶת לָבֶטַח הָאֹֽמְרָה בִּלְבָבָהּ אֲנִי וְאַפְסִי עוֹד אֵיךְ ׀ הָיְתָה לְשַׁמָּה מַרְבֵּץ לַֽחַיָּה כֹּל עוֹבֵר עָלֶיהָ יִשְׁרֹק יָנִיעַ יָדֽוֹ׃

< सफन्या 2 >