< जखऱ्या 1 >

1 पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे,
Uti åttonde månadenom, i andro årena ( Konungs ) Darios, skedde detta Herrans ord till ZacharIa, Berechia son, Iddo sons, den Propheten, och sade:
2 परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता.
Herren hafver vred varit uppå edra fäder.
3 तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Och säg; till dem: Detta säger Herren Zebaoth: Vänder eder till mig, säger Herren Zebaoth; så vill jag vända mig till eder, säger Herren Zebaoth.
4 संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.
Varer icke såsom edra fäder, hvilkom de förre Propheter predikade, och sade: så säger Herren Zebaoth: Vänder eder ifrån edra onda vägar, och ifrån edart onda väsende; men de hörde intet, och skötte intet om mig, säger Herren.
5 “तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?
Hvar äro nu edre fäder och Propheter? Lefva de ock ännu?
6 परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले, ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?” तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, “सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत.”
Hafva min ord och mina rätter, som jag böd, genom mina tjenare Propheterna, icke kommit intill edra fäder? att de hafva måst vända sig om, och säga: Lika som Herren Zebaoth i sinnet hade att göra emot oss, efter som vi gingom och gjordom; alltså hafver han ock gjort emot oss.
7 दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा:
På fjerde och tjugonde dagen i ellofte månadenom, som är den månaden Sebat, uti andro årena ( Konungs ) Darios, skedde detta Herrans ord till ZacharIa, Berechia son, Iddo sons, den Propheten, och sade:
8 “रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.”
Jag såg om nattena, och si, en man satt på enom rödom häst, och han höll ibland myrtenträ i dalenom; och bakför honom voro röde, brune och hvite hästar.
9 मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”
Och jag sade: Min herre, ho äro desse? Och Ängelen, som med mig talade, sade till mig: Jag vill kungöra dig, ho desse äro.
10 १० मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.”
Och mannen, som höll ibland myrtenträn, svarade, och sade: Desse äro de som Herren utsändt hafver till att draga genom landet.
11 ११ नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.”
Men de svarade Herrans Ängel, som ibland myrtenträn höll, och sade: Vi hafve dragit igenom landet; och si, all land sitta stilla.
12 १२ मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरूशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?”
Då svarade Herrans Ängel, och sade: Herre Zebaoth, huru länge vill du då icke förbarma dig öfver Jerusalem, och öfver Juda städer, uppå hvilka du hafver vred varit i dessa sjutio år?
13 १३ माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला.
Och Herren svarade Änglenom, som med mig talade, vänlig ord, och tröstelig ord.
14 १४ मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: “मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे!
Och Ängelen, som med mig talade, sade till mig: Predika, och säg: Detta säger Herren Zebaoth: Jag hafver stort nit haft öfver Jerusalem och Zion.
15 १५ आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे; कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.”
Men jag är ganska vred uppå de stolta Hedningar; ty jag var icke utan litet vred, men de hulpo till förderf.
16 १६ म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरूशलेमेवर लावण्यात येईल.”
Derföre så säger Herren: Jag vill åter vända mig till Jerusalem med barmhertighet; och mitt hus skall deruti uppbygdt varda, säger Herren Zebaoth; dertill skall timbersnöret i Jerusalem draget varda.
17 १७ पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील, परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरूशलेमची निवड करील.”
Och predika ytterligare, och säg: Detta säger Herren Zebaoth: Mina städer skall åter gå väl, och Herren skall åter trösta Zion, och skall åter utvälja Jerusalem.
18 १८ मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली!
Och jag hof upp min ögon, och såg; och si der voro fyra horn.
19 १९ माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”
Och jag sade till Ängelen, som med mig talade: Ho äro dessa? Han sade till mig: Desse äro de hornen, som Juda, Israel och Jerusalem förskingrat hafva.
20 २० मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.
Och Herren viste mig fyra smeder.
21 २१ मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांस विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”
Då sade jag: Hvad vilja dessa göra? Han sade: De hornen, som Juda så förskingrat hafva, att ingen hafver kunnat upplyfta sitt hufvud; till att afskräcka dem äro desse komne, på det de skola afstöta Hedningarnas horn; hvilke hornet upphäfvit hafva öfver Juda land, till att förskingra det.

< जखऱ्या 1 >