< जखऱ्या 8 >

1 सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले.
ויהי דבר יהוה צבאות לאמר׃
2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेसाठी खूप ईर्ष्यावान झालो आहे. तिच्या करीता क्रोधाने व आवेशाने ईर्ष्यावान झालो आहे.”
כה אמר יהוה צבאות קנאתי לציון קנאה גדולה וחמה גדולה קנאתי לה׃
3 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”
כה אמר יהוה שבתי אל ציון ושכנתי בתוך ירושלם ונקראה ירושלם עיר האמת והר יהוה צבאות הר הקדש׃
4 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्त्री आणि वृध्द पुरुष यरूशलेमेच्या रस्त्यावर पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालतांना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल.
כה אמר יהוה צבאות עד ישבו זקנים וזקנות ברחבות ירושלם ואיש משענתו בידו מרב ימים׃
5 रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी गजबजून जाईल.
ורחבות העיר ימלאו ילדים וילדות משחקים ברחבתיה׃
6 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट देशाला आश्चर्य वाटेल, म्हणून मलाही आश्चर्य वाटेल का?” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
כה אמר יהוה צבאות כי יפלא בעיני שארית העם הזה בימים ההם גם בעיני יפלא נאם יהוה צבאות׃
7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशातून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन.
כה אמר יהוה צבאות הנני מושיע את עמי מארץ מזרח ומארץ מבוא השמש׃
8 मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”
והבאתי אתם ושכנו בתוך ירושלם והיו לי לעם ואני אהיה להם לאלהים באמת ובצדקה׃
9 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “आपले हात दृढ करा! सेनाधीश परमेश्वराने मंदिराच्या पुनर्निर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.
כה אמר יהוה צבאות תחזקנה ידיכם השמעים בימים האלה את הדברים האלה מפי הנביאים אשר ביום יסד בית יהוה צבאות ההיכל להבנות׃
10 १० त्या दिवसापूर्वी, लोकांस काम मिळत नसे वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नसे. जाणे येणे शत्रूंमुळे सूरक्षित नव्हते. मी प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याविरुध्द भडकविले होते.
כי לפני הימים ההם שכר האדם לא נהיה ושכר הבהמה איננה וליוצא ולבא אין שלום מן הצר ואשלח את כל האדם איש ברעהו׃
11 ११ पण आता तसे पूर्वीच्या दिवसासारखे नसेल. मी उर्वरित लोकांबरोबर असणार.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
ועתה לא כימים הראשנים אני לשארית העם הזה נאם יהוה צבאות׃
12 १२ “ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांस वतन देईन.
כי זרע השלום הגפן תתן פריה והארץ תתן את יבולה והשמים יתנו טלם והנחלתי את שארית העם הזה את כל אלה׃
13 १३ शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!”
והיה כאשר הייתם קללה בגוים בית יהודה ובית ישראל כן אושיע אתכם והייתם ברכה אל תיראו תחזקנה ידיכם׃
14 १४ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.
כי כה אמר יהוה צבאות כאשר זממתי להרע לכם בהקציף אבתיכם אתי אמר יהוה צבאות ולא נחמתי׃
15 १५ “पण आता मात्र माझे मन: परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरूशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!
כן שבתי זממתי בימים האלה להיטיב את ירושלם ואת בית יהודה אל תיראו׃
16 १६ पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.
אלה הדברים אשר תעשו דברו אמת איש את רעהו אמת ומשפט שלום שפטו בשעריכם׃
17 १७ आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी शपथ देण्याची आवड धरू नका. कारण या गोष्टींचा मला द्वेष आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
ואיש את רעת רעהו אל תחשבו בלבבכם ושבעת שקר אל תאהבו כי את כל אלה אשר שנאתי נאם יהוה׃
18 १८ सेनाधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले.
ויהי דבר יהוה צבאות אלי לאמר׃
19 १९ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”
כה אמר יהוה צבאות צום הרביעי וצום החמישי וצום השביעי וצום העשירי יהיה לבית יהודה לששון ולשמחה ולמעדים טובים והאמת והשלום אהבו׃
20 २० सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरूशलेमेला येतील.
כה אמר יהוה צבאות עד אשר יבאו עמים וישבי ערים רבות׃
21 २१ निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्यास शोधू.’ मीही येतो.”
והלכו ישבי אחת אל אחת לאמר נלכה הלוך לחלות את פני יהוה ולבקש את יהוה צבאות אלכה גם אני׃
22 २२ पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरूशलेमेत येतील.
ובאו עמים רבים וגוים עצומים לבקש את יהוה צבאות בירושלם ולחלות את פני יהוה׃
23 २३ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दहा लोक यहूदी मनुष्याकडे येऊन त्याचा झगा पकडून त्यास विचारतील, ‘देव तुम्हाबरोबर आहे’ असे आम्ही ऐकले आहे! आम्ही तुम्हाबरोबर येतो.”
כה אמר יהוה צבאות בימים ההמה אשר יחזיקו עשרה אנשים מכל לשנות הגוים והחזיקו בכנף איש יהודי לאמר נלכה עמכם כי שמענו אלהים עמכם׃

< जखऱ्या 8 >