< जखऱ्या 6 >
1 १ मग मी वळून आपले डोळे वर करून बघितले तेव्हा दोन पर्वतांमधून चार रथ जातांना दिसले. ते पर्वत पितळेचे होते.
१मैंने फिर आँखें उठाई, और क्या देखा कि दो पहाड़ों के बीच से चार रथ चले आते हैं; और वे पहाड़ पीतल के हैं।
2 २ पहिल्या रथला तांबडे रंगाचे घोडे होते. दुसऱ्या रथाला काळ्या रंगाचे घोडे होते.
२पहले रथ में लाल घोड़े और दूसरे रथ में काले,
3 ३ तिसऱ्या रथाला पांढऱ्या रंगाचे घोडे होते आणि चौथ्या रथाला ठिपके असलेले राखाडी घोडे होते.
३तीसरे रथ में श्वेत और चौथे रथ में चितकबरे और बादामी घोड़े हैं।
4 ४ मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, हे काय आहे?”
४तब मैंने उस दूत से जो मुझसे बातें करता था, पूछा, “हे मेरे प्रभु, ये क्या हैं?”
5 ५ देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे स्वर्गातले वारे आहेत. ते अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर उभे होते व आता बाहेर येत आहेत.
५दूत ने मुझसे कहा, “ये आकाश की चारों वायु हैं जो सारी पृथ्वी के प्रभु के पास उपस्थित रहते हैं, परन्तु अब निकल आए हैं।
6 ६ काळे घोडे उत्तर देशाला, पांढरे घोडे पश्चिम देशाला व ठिपके असलेले राखाडी घोडे दक्षिण देशाला जात आहेत.”
६जिस रथ में काले घोड़े हैं, वह उत्तर देश की ओर जाता है, और श्वेत घोड़े पश्चिम की ओर जाते है, और चितकबरे घोड़े दक्षिण देश की ओर जाते हैं।
7 ७ तांबडे घोडेही बाहेर पडले, त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा कल होता. म्हणून देवदूताने त्यांना पृथ्वीवर फिरण्यास सांगितले मग ते पृथ्वीवर फिरले.
७और बादामी घोड़ों ने निकलकर चाहा कि जाकर पृथ्वी पर फेरा करें।” अतः दूत ने कहा, “जाकर पृथ्वी पर फेरा करो।” तब वे पृथ्वी पर फेरा करने लगे।
8 ८ मग त्याने मला हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी आपले काम पूर्ण केले आहे. उत्तर देशात त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे.”
८तब उसने मुझसे पुकारकर कहा, “देख, वे जो उत्तर के देश की ओर जाते हैं, उन्होंने वहाँ मेरे प्राण को ठंडा किया है।”
9 ९ मग मला परमेश्वराचे वचन मिळाले. तो म्हणाला,
९फिर यहोवा का यह वचन मेरे पास पहुँचा:
10 १० बंदिवासात असलेल्या हेल्दय, तोबीया व यदया ह्यास सोबत घे. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, योशीयाच्या घरी आजच जा, ते बाबेलाहून आले आहेत.
१०“बँधुआई के लोगों में से, हेल्दै, तोबियाह और यदायाह से कुछ ले और उसी दिन तू सपन्याह के पुत्र योशियाह के घर में जा जिसमें वे बाबेल से आकर उतरे हैं।
11 ११ त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव.
११उनके हाथ से सोना चाँदी ले, और मुकुट बनाकर उन्हें यहोसादाक के पुत्र यहोशू महायाजक के सिर पर रख;
12 १२ मग त्यास पुढील गोष्टी सांग: “सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: ‘फांदी’ नावाचा एक मनुष्य आहे. तो आपल्या स्थानावर उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
१२और उससे यह कह, ‘सेनाओं का यहोवा यह कहता है, उस पुरुष को देख जिसका नाम शाख है, वह अपने ही स्थान में उगकर यहोवा के मन्दिर को बनाएगा।
13 १३ तो परमेश्वराचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली होईल. स्वत: च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. तो सिंहासनावर याजकही होईल. या दोन्हीमध्ये शांतीची सहमती असेल.”
१३वही यहोवा के मन्दिर को बनाएगा, और महिमा पाएगा, और अपने सिंहासन पर विराजमान होकर प्रभुता करेगा। और उसके सिंहासन के पास एक याजक भी रहेगा, और दोनों के बीच मेल की सम्मति होगी।’
14 १४ “तो मुकुट परमेश्वराच्या मंदिरात ठेवतील. हेलेम, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या दानशूरपणाची आठवण म्हणून ठेवण्यात येईल.
१४और वे मुकुट हेलेम, तोबियाह, यदायाह, और सपन्याह के पुत्र हेन को मिलें, और वे यहोवा के मन्दिर में स्मरण के लिये बने रहें।
15 १५ दूरवर राहणारे लोक येतील आणि परमेश्वराचे मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की सेनाधीश परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठवले आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकाल तर असे होईल.”
१५“फिर दूर-दूर के लोग आ आकर यहोवा का मन्दिर बनाने में सहायता करेंगे, और तुम जानोगे कि सेनाओं के यहोवा ने मुझे तुम्हारे पास भेजा है। और यदि तुम मन लगाकर अपने परमेश्वर यहोवा की आज्ञाओं का पालन करो तो यह बात पूरी होगी।”