< जखऱ्या 5 >
1 १ नंतर मी वळलो व डोळे वर करून पाहीले, आणि मला उडतांना एक पट दिसला.
我又举目观看,见有一飞行的书卷。
2 २ त्या देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उडता पट दिसत आहे, त्याची लांबी वीस हात व रूंदी दहा हात आहे.”
他问我说:“你看见什么?”我回答说:“我看见一飞行的书卷,长二十肘,宽十肘。”
3 ३ तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे आणि त्यावरील लेखानुसार प्रत्येक चोर यावरील एका बाजूस लिहीलेल्या शापानुसार देशातून घालवला जाईल आणि दुसऱ्या बाजूवरील लेखानूसार खोटी शपथ वाहणाऱ्या प्रत्येकाला देशातून घालवले जाईल.
他对我说:“这是发出行在遍地上的咒诅。凡偷窃的必按卷上这面的话除灭;凡起假誓的必按卷上那面的话除灭。
4 ४ सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन. तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”
万军之耶和华说:我必使这书卷出去,进入偷窃人的家和指我名起假誓人的家,必常在他家里,连房屋带木石都毁灭了。”
5 ५ मग माझ्याशी बोलणारा देवदूत बाहेर गेला आणि मला म्हणाला, “तुझे डोळे वर करून बघ! काय येत आहे?”
与我说话的天使出来,对我说:“你要举目观看,见所出来的是什么?”
6 ६ मी विचारले, “ते काय आहे?” तो म्हणाला, “ती एक मापन-टोपली आहे. हे त्यांच्या संपूर्ण देशाच्या पापाचे रूपक आहे.”
我说:“这是什么呢?”他说:“这出来的是量器。”他又说:“这是恶人在遍地的形状。”
7 ७ मापन-टोपलीवरचे झाकण वर उचलेले होते आणि त्या मापन-टोपलीत एक स्त्री बसली होती.
(我见有一片圆铅被举起来。)这坐在量器中的是个妇人。
8 ८ देवदूत म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे!” मग त्याने त्या तिला मापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आणि त्याने शिशाचे वजन मापन-टोपलीच्या मुखावर टाकले.
天使说:“这是罪恶。”他就把妇人扔在量器中,将那片圆铅扔在量器的口上。
9 ९ नंतर मी माझे डोळे वर केले व पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांनी ती टोपली उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधून नेली.
我又举目观看,见有两个妇人出来,在她们翅膀中有风,飞得甚快,翅膀如同鹳鸟的翅膀。她们将量器抬起来,悬在天地中间。
10 १० मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “त्या ती टोपली कोठे घेऊन जात आहेत?”
我问与我说话的天使说:“她们要将量器抬到哪里去呢?”
11 ११ देवदूत मला म्हणाला, “शिनार देशामध्ये त्या मापन-टोपलीसाठी एक मंदिर बांधण्यासाठी त्या जात आहेत. जेव्हा ते घर पूर्ण होईल तेव्हा ती टोपली तेथे ठेवतील.”
他对我说:“要往示拿地去,为它盖造房屋;等房屋齐备,就把它安置在自己的地方。”