< जखऱ्या 4 >

1 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने एखाद्या मनुष्यास झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले.
And he returned the angel who was speaking with me and he roused me like a person who he is roused from sleep his.
2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
And he said to me what? [are] you seeing (and I said *Q(K)*) I see - and there! a lampstand of gold all of it and a bowl [is] on top its and seven lamps its [are] on it seven and seven pipes [belong] to the lamps which [are] on top its.
3 वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.”
And two olive trees [were] at it one from [the] right [side] of the bowl and one at left [side] its.
4 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “प्रभू, या गोष्टींचा अर्थ काय?”
And I answered and I said to the angel who was speaking with me saying what? [are] these O lord my.
5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” मी म्हणालो, “नाही प्रभू.”
And he answered the angel who was speaking with me and he said to me ¿ not do you know what? they [are] these and I said no O lord my.
6 मग त्याने मला सांगितले हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे तो असा: “बलाने नव्हे अथवा शक्तीने नव्हे तर केवळ माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल.” सेनाधीश परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
And he answered and he said to me saying this [is] [the] word of Yahweh to Zerubbabel saying not by strength and not by power that except by spirit my he says Yahweh of hosts.
7 “हे उंच पर्वता तू कोण आहेस? तू जरुब्बाबेलासमोर सपाट प्रदेश होशील, तो त्यावर ‘अनुग्रह! अनुग्रह!’ असा गजर करीत शिखर पुढे आणील.”
Who? [are] you O mountain great before Zerubbabel level ground and he will bring forth the stone top shouting grace grace to it.
8 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे:
And it came [the] word of Yahweh to me saying.
9 “जरुब्बाबेलाने माझ्या मंदिराचा पाया घातला आहे आणि त्याचेच हात हे मंदिर बांधून पूर्ण करतील तेव्हा तू समजशील की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.
[the] hands of Zerubbabel they have founded the house this and hands his they will finish [it] and you will know that Yahweh of hosts he has sent me to you.
10 १० लहानशा आरंभाच्या दिवसास कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे सात दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्वकाही पाहतात. आणि ते जरुब्बाबेलाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील”
For who? has he despised a day of small [things] and they will rejoice and they will see the stone tin in [the] hand of Zerubbabel seven these [the] eyes of Yahweh they [are] roving about in all the earth.
11 ११ मग मी (जखऱ्या) त्यास म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?”
And I answered and I said to him what? [are] [the] two the olive trees these at [the] right [side] of the lampstand and at left [side] its.
12 १२ मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
And I answered a second [time] and I said to him what? [are] [the] two [the] clusters of the olive trees which [are] at [the] hand of [the] two [the] pipes of gold which are pouring out from on them the gold.
13 १३ तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला या गोष्टींबद्दल माहीती नाही?” मी म्हणालो, “नाही, महाराज!”
And he said to me saying ¿ not do you know what? [are] these and I said no O lord my.
14 १४ तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी संपुर्ण पृथ्वीतून निवडलेल्या दोन अभिषिक्तांची ती प्रतिके आहेत.”
And he said these [are] [the] two [the] sons of the fresh oil who stand at [the] lord of all the earth.

< जखऱ्या 4 >