< जखऱ्या 3 >

1 देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.
Un viņš man rādīja augsto priesteri Jozua, stāvam Tā Kunga eņģeļa priekšā. Un sātans stāvēja viņam pa labo roku, viņu apsūdzēt.
2 मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरूशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?”
Bet Tas Kungs sacīja uz sātanu: lai Tas Kungs tevi rāj, sātan: lai tevi rāj Tas Kungs, kas Jeruzālemi izredzējis! Vai šī nav pagale, no uguns izrauta?
3 यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता.
Un Jozuas bija apģērbts netīrās drēbēs, kad viņš stāvēja tā eņģeļa priekšā.
4 म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.”
Tad viņš (tas eņģelis) atbildēja un runāja uz tiem, kas viņa priekšā stāvēja, un sacīja: atņemiet tam tās netīrās drēbes. Un viņš uz to sacīja: redzi, tavu noziegumu es tev esmu atņēmis, un tevi apģērbšu ar svētku drēbēm.
5 तो म्हणाला, “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.
Un es sacīju: lai liek tīru cepuri viņam galvā. Un tie tam lika tīru cepuri galvā un tam apvilka drēbes, un Tā Kunga eņģelis stāvēja tur klāt.
6 पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला,
Tad Tā Kunga eņģelis Jozuam apliecināja un sacīja:
7 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.
Tā saka Tas Kungs Cebaot: ja tu staigāsi Manos ceļos un sargāsi Manu likumu, tad tev arī Manu namu būs tiesāt un arī Manus pagalmus sargāt, un Es tev došu pieiešanu to starpā, kas te stāv.
8 तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.
Klausies nu jel, Jozua, augstais priesteri, tu un tavi draugi, kas tavā priekšā, jo tie ir par brīnuma zīmi. Jo redzi, Es likšu nākt Savam kalpam Cemak (Atvasei).
9 आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत, आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’ आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Jo redzi to akmeni, ko Es Jozuas priekšā esmu nolicis! Uz to vienu akmeni (skatās) septiņas acis. Redzi, Es ierakstīšu viņa rakstu, saka Tas Kungs Cebaot, un atņemšu šās zemes noziegumu vienā dienā.
10 १० सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”
Tai dienā, saka Tas Kungs Cebaot, jūs aicināsiet cits citu apakš vīna koka un apakš vīģes koka.

< जखऱ्या 3 >