< जखऱ्या 3 >
1 १ देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.
And the Lord revealed to me: Jesus the high priest, standing in the sight of the angel of the Lord. And Satan stood before his right hand, so as to be his adversary.
2 २ मग परमेश्वराचा दूत सैतानाला म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला धमकावो. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरूशलेमची निवड केली आहे, तो तुला धमकावो. आगीतून कोलीत ओढून काढावे, तसा हा नाही काय?”
And the Lord said to Satan, “May the Lord rebuke you, Satan! And may the Lord, who chose Jerusalem, rebuke you! Are you not a firebrand plucked from the fire?”
3 ३ यहोशवा देवदूतापुढे मळकट वस्त्रे घालून उभा होता.
And Jesus was clothed with filthy garments. And he stood before the face of an angel.
4 ४ म्हणून जवळ उभ्या असलेल्या इतरांना हा देवदूत म्हणाला, “याच्यावरची मळकट वस्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत यहोशवाला बोलला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि मी तुला भरजरी वस्त्रे नेसवत आहे.”
He answered and spoke to those who stood before him, saying, “Take away the filthy garments from him.” And he said to him, “Behold, I have taken away from you your iniquity, and I have clothed you with a change of clothing.”
5 ५ तो म्हणाला, “त्यांनी त्याच्या डोक्यावर स्वच्छ फेटा बांधावा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला आणि परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्यास स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली.
And he said, “Place a clean diadem on his head.” And they placed a clean diadem on his head, and they clothed him with garments. And the angel of the Lord remained standing.
6 ६ पुढे परमेश्वराच्या दूताने यहोशवाला गंभीरतेने आज्ञा केली आणि म्हणाला,
And the angel of the Lord contested with Jesus, saying:
7 ७ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या मार्गात चालशील, आणि तू माझ्या आज्ञा पाळशील, तर तूच माझ्या मंदिराचा मुख्य अधिकारी होशील आणि मंदिराच्या अंगणाची तू निगा राखशील. माझ्यासमोर उभ्या असलेल्यामध्ये तुला जाता-येता येईल असे मी करीन.
Thus says the Lord of hosts: If you will walk in my ways and keep my charge, you likewise will judge my house and will keep my courts, and I will give you some of those who now attend here to walk with you.
8 ८ तेव्हा हे यहोशवा मुख्य याजका, तू स्वत: व तुझ्यासमोर राहणाऱ्या सहकारी याजकांनो ऐका! ही माणसे तर चिन्ह अशी आहेत, मी माझ्या सेवकाला आणतो, त्यास फांदी असे म्हणतील.
Listen, Jesus the high priest, you and your friends, who dwell before you, who have been portending to men. For behold, I will lead my servant to the East.
9 ९ आता मी यहोशवापुढे ठेवलेला दगड पाहा. या एका दगडाला सात बाजू आहेत, आणि मी त्यावर एक शिलालेख कोरीन. ‘हा सेनाधीश परमेश्वर आहे’ आणि मी एका दिवसात या देशातील अधर्म नाहीसा करीन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
For behold, the stone that I have bestowed before Jesus. Upon one stone, there are seven eyes. Behold, I will carve its engraving, says the Lord of hosts. And I will take away the iniquity of that land in one day.
10 १० सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.”
On that day, says the Lord of hosts, every man will call his friend from under the vine and from under the fig tree.