< जखऱ्या 2 >

1 मग मी माझे डोळे वर करून पाहिले असता मापनसूत्र घेतलेला एक मनुष्य माझ्या दृष्टीस पडला.
И возведох очи мои и видех, и се, муж, и в руце его уже землемерно.
2 तेव्हा मी त्यास विचारले, “तू कोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी यरूशलेमची मोजणी करायाला, तिची लांबी-रुंदी पाहण्यास जात आहे.”
И рех к нему: камо грядеши ты? И рече ко мне: размерити Иерусалима, еже видети, колика широта его есть и колика долгота.
3 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला.
И се, Ангел глаголяй во мне стояше, и ин Ангел исхождаше во сретение ему
4 दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्यास सांग, ‘यरूशलेमेत मनुष्यांचे व गुराढोरांचे वास्तव्य जास्त झाल्याने तटबंदी नसलेल्या गावाप्रमाणे तिच्यांत वस्ती होईल.’
и рече к нему глаголя: тецы и рцы к юноши оному глаголя: плодовито населится Иерусалим от множества человеков и скотов, иже посреде его:
5 परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”
и Аз буду ему, глаголет Господь, стена огнена окрест и в славу буду посреде его.
6 परमेश्वर असे म्हणतो, “त्वरा करा, उत्तरेकडील प्रदेशातून पळून जा. होय! मी तुम्हास आकाशाच्या चार वाऱ्याप्रमाणे चहूकडे पांगवले आहे.”
О, о, бежите от земли северныя, глаголет Господь, зане от четырех ветров небесных соберу вы, глаголет Господь:
7 “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”
в Сион спасайтеся, живущии во дщери Вавилонстей.
8 कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे; जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,
Зане сице глаголет Господь Вседержитель: вслед славы посла Мя на языки пленившыя вас, зане касаяйся вас яко касаяйся в зеницу ока Его:
9 “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”
зане, се, Аз наношу руку Мою на ня, и будут корысть работающым им, и уразумеете, яко Господь Вседержитель посла Мя.
10 १० परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा! कारण मी स्वतः येईन व मी तुझ्यात वास्तव्य करीन.”
Красуйся и веселися, дщи Сионя, зане, се, Аз гряду и вселюся посреде тебе, глаголет Господь.
11 ११ त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल; कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.
И прибегнут языцы мнози ко Господу в той день и будут Ему в люди и вселятся посреде тебе, и уразумееши, яко Господь Вседержитель посла Мя к тебе.
12 १२ स्वत: ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.
И наследит Господь Иуду, участие Свое на земли святей, и изберет еще Иерусалима.
13 १३ लोकहो शांत राहा! कारण, परमेश्वर आपल्या पवित्र निवासातून येत आहे.
Да благоговеет всяка плоть от лица Господня, яко воста из облак святых Своих.

< जखऱ्या 2 >