< जखऱ्या 2 >
1 १ मग मी माझे डोळे वर करून पाहिले असता मापनसूत्र घेतलेला एक मनुष्य माझ्या दृष्टीस पडला.
Opět pozdvihl jsem očí svých, a uzřel jsem, a aj muž, v jehož ruce byla šnůra míry.
2 २ तेव्हा मी त्यास विचारले, “तू कोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी यरूशलेमची मोजणी करायाला, तिची लांबी-रुंदी पाहण्यास जात आहे.”
I řekl jsem: Kam jdeš? I řekl mi: Měřiti Jeruzaléma, abych viděl, jak veliká širokost jeho, a jak veliká dlouhost jeho.
3 ३ मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला.
A aj, když anděl ten, kterýž mluvil se mnou, vycházel, jiný anděl vycházel jemu vstříc.
4 ४ दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्यास सांग, ‘यरूशलेमेत मनुष्यांचे व गुराढोरांचे वास्तव्य जास्त झाल्याने तटबंदी नसलेल्या गावाप्रमाणे तिच्यांत वस्ती होईल.’
A řekl jemu: Běž, mluv k mládenci tomu, řka: Po vsech bydliti budou Jeruzalémští, pro množství lidu a dobytka u prostřed něho.
5 ५ परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”
A já budu, praví Hospodin, jeho zdí ohnivou vůkol, a slávou budu u prostřed něho.
6 ६ परमेश्वर असे म्हणतो, “त्वरा करा, उत्तरेकडील प्रदेशातून पळून जा. होय! मी तुम्हास आकाशाच्या चार वाऱ्याप्रमाणे चहूकडे पांगवले आहे.”
Nuže, nuže, utectež již z země půlnoční, praví Hospodin, poněvadž se čtyř stran světa volný průchod učinil jsem vám, praví Hospodin.
7 ७ “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”
Nuže, Sione, kterýž přebýváš u dcery Babylonské, vydobuď se.
8 ८ कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे; जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,
Nebo takto praví Hospodin zástupů: Po slávě poslal mne proti národům těm, kteříž zloupili vás; nebo kdož se dotýká vás, dotýká se zřítelnice oka mého.
9 ९ “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”
Nebo aj, já zdvihnu ruku svou proti nim, a budou loupež služebníkům svým, i zvíte, že Hospodin zástupů poslal mne.
10 १० परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा! कारण मी स्वतः येईन व मी तुझ्यात वास्तव्य करीन.”
Prozpěvuj a vesel se, dcero Sionská; nebo aj, já přijdu a budu bydliti u prostřed tebe, praví Hospodin.
11 ११ त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल; कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.
I připojí se národové mnozí k Hospodinu v ten den, a budou mým lidem, a budu bydliti u prostřed tebe, i zvíš, že Hospodin zástupů poslal mne k tobě.
12 १२ स्वत: ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.
Tehdy dědičně ujme Hospodin Judu, díl svůj, v zemi svaté, a vyvolí zase Jeruzalém.
13 १३ लोकहो शांत राहा! कारण, परमेश्वर आपल्या पवित्र निवासातून येत आहे.
Umlkniž všeliké tělo před oblíčejem Hospodinovým, neboť procítí z příbytku svatosti své.