< तीत. 3 >

1 त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे.
Remind your hearers to respect and obey the Powers that be, to be ready for every kind of good work, to speak ill of no one, to avoid quarrelling,
2 कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे.
to be forbearing, and under all circumstances to show a gentle spirit in dealing with others, whoever they may be.
3 कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;
There was, you remember, a time when we ourselves were foolish, disobedient, misled, slaves to all kinds of passions and vices, living in a spirit of malice and envy, detested ourselves and hating one another.
4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
But, when the kindness of God our Saviour and his love for man were revealed, he saved us,
5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले.
not as the result of any righteous actions that we had done, but in fulfilment of his merciful purposes. He saved us by that Washing which was a New Birth to us, and by the renewing power of the Holy Spirit,
6 आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला.
which he poured out upon us abundantly through Jesus Christ our Saviour;
7 म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे. (aiōnios g166)
that, having been pronounced righteous through his loving-kindness, we might enter on our inheritance with the hope of Immortal Life. (aiōnios g166)
8 हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यांसाठी हितकारक आहेत.
How true that saying is! And it is on these subjects that I desire you to lay especial stress, so that those who have learned to trust in God may be careful to devote themselves to doing good. Such subjects are excellent in themselves, and of real use to mankind.
9 पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.
But have nothing to do with foolish discussions, or with genealogies, or with controversy, or disputes about the Law. They are useless and futile.
10 १० तुमच्यामध्ये फुट पडणाऱ्या मनुष्यास एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव.
If a man is causing divisions among you, after warning him once or twice, have nothing more to say to him.
11 ११ तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो.
You may be sure that such a man has forsaken the Truth and is in the wrong; he stands self-condemned.
12 १२ मी अंर्तमाला किंवा तुखिकला तुझ्याकडे धाडून दिल्यावर, तू माझ्याकडे निकापलीस शहरास निघून येण्याचा प्रयत्न कर कारण मी तेथे हिवाळा घालविण्याचे ठरवले आहे.
As soon as I send Artemas or Tychicus to you, join me as quickly as possible at Nicopolis, for I have arranged to spend the winter there.
13 १३ जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना काही उणे पडणार नाही अशाप्रकारे पोहोचते कर.
Do your best to help Zenas, the Teacher of the Law, and Apollos, on their way, and see that they want for nothing.
14 १४ आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
Let all our People learn to devote themselves to doing good, so as to meet the most pressing needs, and that their lives may not be unfruitful.
15 १५ माझ्याबरोबरचे सगळे तुला नमस्कार सांगतात. जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा नमस्कार सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.
All who are with me here send you their greeting. Give my greeting to our friends in the Faith. God bless you all.

< तीत. 3 >