< तीत. 2 >
1 १ तू तर सुशिक्षणास शोभणार्या गोष्टी बोलत जा.
yathārthasyōpadēśasya vākyāni tvayā kathyantāṁ
2 २ त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.
viśēṣataḥ prācīnalōkā yathā prabuddhā dhīrā vinītā viśvāsē prēmni sahiṣṇutāyāñca svasthā bhavēyustadvat
3 ३ वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या;
prācīnayōṣitō'pi yathā dharmmayōgyam ācāraṁ kuryyuḥ paranindakā bahumadyapānasya nighnāśca na bhavēyuḥ
4 ४ आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे.
kintu suśikṣākāriṇyaḥ satya īśvarasya vākyaṁ yat na nindyēta tadarthaṁ yuvatīḥ suśīlatām arthataḥ patisnēham apatyasnēhaṁ
5 ५ आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
vinītiṁ śucitvaṁ gr̥hiṇītvaṁ saujanyaṁ svāminighnañcādiśēyustathā tvayā kathyatāṁ|
6 ६ आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर.
tadvad yūnō'pi vinītayē prabōdhaya|
7 ७ तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
tvañca sarvvaviṣayē svaṁ satkarmmaṇāṁ dr̥ṣṭāntaṁ darśaya śikṣāyāñcāvikr̥tatvaṁ dhīratāṁ yathārthaṁ
8 ८ आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
nirddōṣañca vākyaṁ prakāśaya tēna vipakṣō yuṣmākam apavādasya kimapi chidraṁ na prāpya trapiṣyatē|
9 ९ आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये;
dāsāśca yat svaprabhūnāṁ nighnāḥ sarvvaviṣayē tuṣṭijanakāśca bhavēyuḥ pratyuttaraṁ na kuryyuḥ
10 १० त्यांनी चोर्या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.
kimapi nāpaharēyuḥ kintu pūrṇāṁ suviśvastatāṁ prakāśayēyuriti tān ādiśa| yata ēvamprakārēṇāsmakaṁ trāturīśvarasya śikṣā sarvvaviṣayē tai rbhūṣitavyā|
11 ११ कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
yatō hētōstrāṇājanaka īśvarasyānugrahaḥ sarvvān mānavān pratyuditavān
12 १२ ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे. (aiōn )
sa cāsmān idaṁ śikṣyati yad vayam adharmmaṁ sāṁsārikābhilāṣāṁścānaṅgīkr̥tya vinītatvēna nyāyēnēśvarabhaktyā cēhalōkē āyu ryāpayāmaḥ, (aiōn )
13 १३ आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
paramasukhasyāśām arthatō 'smākaṁ mahata īśvarasya trāṇakarttu ryīśukhrīṣṭasya prabhāvasyōdayaṁ pratīkṣāmahē|
14 १४ आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.
yataḥ sa yathāsmān sarvvasmād adharmmāt mōcayitvā nijādhikārasvarūpaṁ satkarmmasūtsukam ēkaṁ prajāvargaṁ pāvayēt tadartham asmākaṁ kr̥tē ātmadānaṁ kr̥tavān|
15 १५ तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.
ētāni bhāṣasva pūrṇasāmarthyēna cādiśa prabōdhaya ca, kō'pi tvāṁ nāvamanyatāṁ|