< तीत. 1 >

1 देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः
Pāvils, Dieva kalps un Jēzus Kristus apustulis, pēc Dieva izredzēto ticības un pēc patiesības atzīšanas uz dievbijāšanu,
2 जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले, (aiōnios g166)
Mūžīgas dzīvošanas cerībā, ko Dievs, kas nevar melot, no mūžīgiem laikiem ir apsolījis, (aiōnios g166)
3 त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले.
Bet savā laikā Savu vārdu ir darījis zināmu caur to sludināšanu, kas man ir uzticēta pēc Dieva, mūsu Pestītāja, pavēles:
4 आपल्या सामाईक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरे लेकरू तीत यास; देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
Titum, savam īstam dēlam pēc tās ticības, kas mums abiem kopā: žēlastība un miers no Dieva, Tā Tēva, un no Tā Kunga Jēzus Kristus, mūsu Pestītāja.
5 मी तुला क्रेत बेटावर ह्यासाठी ठेवून आलो की, तू पूर्ण न झालेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.
Tādēļ tevi esmu atstājis Krietā, ka tu izdarītu, kas vēl trūka, un pa pilsētām vecajus ieceltu, kā es tev esmu pavēlējis,
6 ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
Ja kam ir laba slava, kas ir vienas sievas vīrs, kam ir ticīgi bērni, nedz palaidņi, nedz neklausīgi.
7 अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;
Jo bīskapam kā Dieva nama turētājam jābūt vīram, kam laba slava, ne iedomīgam, ne dusmīgam, ne dzērājam, ne rējējam, ne negodīgas peļņas dzinējam;
8 तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,
Kas labprāt mājas vietu dod, labu mīl, kas prātīgs, taisns, svēts, šķīsts,
9 आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तीमान व्हावे.
Kas pastāvīgi turas pēc tā uzticamā vārda mācības, ka viņš ir spēcīgs, arī pamācīt caur to veselīgo mācību, un pārmācīt tos, kas pretī runā,
10 १० हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.
Jo ir daudz nebēdnieki, kas niekus runā un viltnieki, visvairāk tie no apgraizīšanas;
11 ११ त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
Tiem vajag muti aizbāzt, jo tie veselus namus pārgroza negodīgas peļņas dēļ mācīdami, kas neklājās.
12 १२ त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’
Kāds no tiem, viņu pašu pravietis, ir sacījis: Krieti vienmēr melkuļi, nikni zvēri, slinki vēderi.
13 १३ ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.
Šī liecība ir patiesīga; tāpēc pārmāci tos stingri, lai tie paliek veseli ticībā
14 १४ यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्यांकडे आणि सत्याकडून वळविणार्‍या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे.
Un nedodas uz Jūdu pasakām un uz tādu cilvēku baušļiem, kas nogriežas no patiesības.
15 १५ जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत.
Visas lietas ir šķīstas šķīstiem; bet apgānītiem un neticīgiem nekas nav šķīsts; bet gan viņu prāts ir apgānīts, gan viņu zināma sirds.
16 १६ ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
Tie saka, ka Dievu pazīstot, bet ar darbiem tie Viņu aizliedz, neganti būdami un neklausīgi un pie ikviena laba darba nederīgi.

< तीत. 1 >