< गीतरत्न 7 >

1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.
Hvor fagert du skrider frem i dine sko, du høvdingdatter! Dine lenders rundinger er som smykker, et verk av kunstnerhånd.
2 तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधीही नसावी. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
Ditt liv er som et rundt beger; gid det aldri må være uten vin! Din midje er som en hvetedynge, omhegnet av liljer.
3 तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
Dine bryster er som to rådyrkalver, tvillinger av et rådyr.
4 तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दिमिष्काकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.
Din hals er som elfenbenstårnet, dine øine som vanndammene i Hesbon ved Batrabbims port, din nese som Libanon-tårnet, som skuer ut mot Damaskus.
5 तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे; आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
Ditt hode hever sig likesom Karmel; ditt bølgende hår er som purpur; kongen er fanget i dine lokker.
6 अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस.
Hvor fager du er, og hvor herlig du kjærlighet i din fryd!
7 तुझी उंची खजुरीच्या झाडासारखी आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.
Med din ranke vekst ligner du en palme, og dine bryster er som druer.
8 मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन, त्याच्या फांद्यांना धरीन. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
Jeg sier: Jeg vil stige op i palmetreet, ta fatt i dets grener. Måtte dine bryster være som vintreets druer, din ånde som duften av epler
9 तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे. तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो.
og din gane som edel vin! - Den som glir lett ned for min elskede, som får sovendes leber til å tale.
10 १० (ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
Jeg hører min elskede til, og til mig står hans attrå.
11 ११ माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू.
Kom, min elskede, la oss gå ut på marken, la oss bli natten over i landsbyene!
12 १२ आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
La oss årle gå til vingårdene, la oss se om vintreet har satt skudd, om blomstene er sprunget ut, om granatepletrærne blomstrer! Der vil jeg gi dig min kjærlighet.
13 १३ पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे, आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत. माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.
Alrunene dufter, og over våre dører er alle slags kostelige frukter, både nye og gamle. Min elskede! Jeg har gjemt dem til dig.

< गीतरत्न 7 >