< गीतरत्न 5 >

1 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो, खा. माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.
בָּ֣אתִי לְגַנִּי֮ אֲחֹתִ֣י כַלָּה֒ אָרִ֤יתִי מוֹרִי֙ עִם־בְּשָׂמִ֔י אָכַ֤לְתִּי יַעְרִי֙ עִם־דִּבְשִׁ֔י שָׁתִ֥יתִי יֵינִ֖י עִם־חֲלָבִ֑י אִכְל֣וּ רֵעִ֔ים שְׁת֥וּ וְשִׁכְר֖וּ דּוֹדִֽים׃ ס
2 (ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.
אֲנִ֥י יְשֵׁנָ֖ה וְלִבִּ֣י עֵ֑ר ק֣וֹל ׀ דּוֹדִ֣י דוֹפֵ֗ק פִּתְחִי־לִ֞י אֲחֹתִ֤י רַעְיָתִי֙ יוֹנָתִ֣י תַמָּתִ֔י שֶׁרֹּאשִׁי֙ נִמְלָא־טָ֔ל קְוֻּצּוֹתַ֖י רְסִ֥יסֵי לָֽיְלָה׃
3 (तरुण स्त्री स्वतःशी बोलते) मी माझा पोषाख काढून टाकला आहे. तो पुन्हा मी कसा अंगात घालू? मी माझे पाय धुतले आहेत. ते मी कसे मळवू?
פָּשַׁ֙טְתִּי֙ אֶת־כֻּתָּנְתִּ֔י אֵיכָ֖כָה אֶלְבָּשֶׁ֑נָּה רָחַ֥צְתִּי אֶת־רַגְלַ֖י אֵיכָ֥כָה אֲטַנְּפֵֽם׃
4 पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला, आणि माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
דּוֹדִ֗י שָׁלַ֤ח יָדוֹ֙ מִן־הַחֹ֔ר וּמֵעַ֖י הָמ֥וּ עָלָֽיו׃
5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
קַ֥מְתִּֽי אֲנִ֖י לִפְתֹּ֣חַ לְדוֹדִ֑י וְיָדַ֣י נָֽטְפוּ־מ֗וֹר וְאֶצְבְּעֹתַי֙ מ֣וֹר עֹבֵ֔ר עַ֖ל כַּפּ֥וֹת הַמַּנְעֽוּל׃
6 मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
פָּתַ֤חְתִּֽי אֲנִי֙ לְדוֹדִ֔י וְדוֹדִ֖י חָמַ֣ק עָבָ֑ר נַפְשִׁי֙ יָֽצְאָ֣ה בְדַבְּר֔וֹ בִּקַּשְׁתִּ֙יהוּ֙ וְלֹ֣א מְצָאתִ֔יהוּ קְרָאתִ֖יו וְלֹ֥א עָנָֽנִי׃
7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
מְצָאֻ֧נִי הַשֹּׁמְרִ֛ים הַסֹּבְבִ֥ים בָּעִ֖יר הִכּ֣וּנִי פְצָע֑וּנִי נָשְׂא֤וּ אֶת־רְדִידִי֙ מֵֽעָלַ֔י שֹׁמְרֵ֖י הַחֹמֽוֹת׃
8 (ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला, तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
הִשְׁבַּ֥עְתִּי אֶתְכֶ֖ם בְּנ֣וֹת יְרוּשָׁלִָ֑ם אִֽם־תִּמְצְאוּ֙ אֶת־דּוֹדִ֔י מַה־תַּגִּ֣ידוּ ל֔וֹ שֶׁחוֹלַ֥ת אַהֲבָ֖ה אָֽנִי׃
9 (त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे?
מַה־דּוֹדֵ֣ךְ מִדּ֔וֹד הַיָּפָ֖ה בַּנָּשִׁ֑ים מַה־דּוֹדֵ֣ךְ מִדּ֔וֹד שֶׁכָּ֖כָה הִשְׁבַּעְתָּֽנוּ׃
10 १० (तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहेत) माझा प्रियकर गोरापान व लालबुंद आहे. तो दहा हजारात श्रेष्ठ आहे.
דּוֹדִ֥י צַח֙ וְאָד֔וֹם דָּג֖וּל מֵרְבָבָֽה׃
11 ११ त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.
רֹאשׁ֖וֹ כֶּ֣תֶם פָּ֑ז קְוּצּוֹתָיו֙ תַּלְתַּלִּ֔ים שְׁחֹר֖וֹת כָּעוֹרֵֽב׃
12 १२ त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, दुधात धुतलेल्या कबुतरासारखे आहेत, कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत.
עֵינָ֕יו כְּיוֹנִ֖ים עַל־אֲפִ֣יקֵי מָ֑יִם רֹֽחֲצוֹת֙ בֶּֽחָלָ֔ב יֹשְׁב֖וֹת עַל־מִלֵּֽאת׃
13 १३ त्याचे गाल सुगंधी झाडाचे वाफे, सुगंधी फुलझाडांचे ताटवे असे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ कमलपुष्पाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्रवतो.
לְחָיָו֙ כַּעֲרוּגַ֣ת הַבֹּ֔שֶׂם מִגְדְּל֖וֹת מֶרְקָחִ֑ים שִׂפְתוֹתָיו֙ שֽׁוֹשַׁנִּ֔ים נֹטְפ֖וֹת מ֥וֹר עֹבֵֽר׃
14 १४ त्याचे हात रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे पोट नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतफलकासारखे आहे.
יָדָיו֙ גְּלִילֵ֣י זָהָ֔ב מְמֻלָּאִ֖ים בַּתַּרְשִׁ֑ישׁ מֵעָיו֙ עֶ֣שֶׁת שֵׁ֔ן מְעֻלֶּ֖פֶת סַפִּירִֽים׃
15 १५ त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. त्याचे रुप लबानोनासारखे आहे. ते गंधसरू झाडासारखे उत्कृष्ट आहे.
שׁוֹקָיו֙ עַמּ֣וּדֵי שֵׁ֔שׁ מְיֻסָּדִ֖ים עַל־אַדְנֵי־פָ֑ז מַרְאֵ֙הוּ֙ כַּלְּבָנ֔וֹן בָּח֖וּר כָּאֲרָזִֽים׃
16 १६ होय, यरूशलेमेच्या कन्यांनो, माझा प्रियकर हाच माझा सखा आहे. त्याची वाणी सर्वांत गोड आहे. तो सर्वस्वी सुंदर आहे.
חִכּוֹ֙ מַֽמְתַקִּ֔ים וְכֻלּ֖וֹ מַחֲּמַדִּ֑ים זֶ֤ה דוֹדִי֙ וְזֶ֣ה רֵעִ֔י בְּנ֖וֹת יְרוּשָׁלִָֽם׃

< गीतरत्न 5 >