< गीतरत्न 4 >
1 १ (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
Engkau cantik jelita, manisku, sungguh, engkau cantik jelita. Matamu di balik cadarmu bagaikan merpati; rambutmu seperti kawanan kambing yang menuruni bukit-bukit Gilead.
2 २ लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही. त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
Gigimu putih seperti kawanan domba yang baru dicukur dan dimandikan; berpasangan seperti anak-anak domba kembar, satu pun tidak ada yang hilang.
3 ३ तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बुरख्याच्या आत, तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
Bibirmu bagaikan seutas pita merah, dan eloklah mulutmu. Pipimu seperti belahan buah delima, tersembunyi di balik cadarmu.
4 ४ तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे. ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत.
Lehermu bagaikan menara Daud, yang dibangun untuk menyimpan senjata. Kalungmu serupa seribu perisai, gada para pahlawan semuanya.
5 ५ हरीणीची जी जुळी, जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
Buah dadamu laksana dua anak rusa, anak kembar kijang yang tengah merumput di antara bunga-bunga bakung.
6 ६ दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर, ऊदाच्या टेकडीवर जाईन.
Ingin aku pergi ke gunung mur, ke bukit kemenyan, sampai berhembus angin pagi, yang melenyapkan kegelapan malam.
7 ७ प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
Engkau cantik sekali, manisku, tiada cacat padamu.
8 ८ लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये; अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
Mari kita turun dari Libanon, pengantinku, mari kita turun dari Libanon. Turunlah dari puncak Amana, dari puncak Senir dan Hermon, tempat tinggal macan tutul dan singa.
9 ९ अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
Engkau menawan hatiku, dinda, pengantinku, engkau menawan hatiku dengan pandanganmu, dengan permata indah pada kalungmu.
10 १० माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
Betapa nikmat cintamu, dinda, pengantinku, jauh lebih nikmat daripada anggur. Minyakmu harum semerbak, melebihi segala macam rempah.
11 ११ माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
Manis kata-katamu, pengantinku, seperti madu murni dan susu. Pakaianmu seharum Gunung Libanon.
12 १२ माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.
Kekasihku adalah kebun bertembok, kebun bertembok, mata air terkunci.
13 १३ तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,
Di sana tumbuh pohon-pohon delima, dengan buah-buah yang paling lezat. Bunga pacar dan narwastu,
14 १४ मेंदी, जटामांसी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
narwastu, kunyit, kayu manis dan tebu, dengan macam-macam pohon kemenyan. Mur dan gaharu, dengan macam-macam rempah pilihan.
15 १५ तू बागेतल्या कारंज्यासारखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
Mata air di kebunku membualkan air hidup yang mengalir dari Libanon!
16 १६ (तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझा सखा त्याच्या बागेत येवो आणि त्याच्या आवडीची फळे खावो.
Bangunlah, hai angin utara, datanglah, hai angin selatan! Bertiuplah di kebunku, biar harumnya semerbak. Semoga kekasihku datang ke kebunnya, dan makan buah-buahnya yang lezat.