< गीतरत्न 3 >
1 १ (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही.
„По но́чах на ложі своїм я шукала того́, кого́ полюбила душа моя. Шукала його, — та його не знайшла́.
2 २ मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
Хай устану й нехай я пройду́ся по місті, хай на ву́лицях та на майда́нах того пошукаю, кого полюбила душа моя! Шукала його, — та його не знайшла́.
3 ३ शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”
Спітка́ли мене сторожі́, що по місті прохо́дять. „Чи не бачили ча́сом того, кого полюбила душа моя?“
4 ४ मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही.
Небагато пройшла я від них, — та й знайшла́ я того́, кого́ полю́била душа моя: схопи́ла його, — й не пустила його, аж по́ки його не ввела́ у дім неньки своєї, та в кімна́ту тієї, що в утро́бі носила мене!
5 ५ (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. आमचे प्रेम करणे संपत नाही, तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
Заклинаю я вас, дочки єрусалимські, газе́лями чи польови́ми оленями, щоб ви не споло́хали, щоб не збуди́ли любови, аж доки йому до вподо́би!“
6 ६ (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे?
„Хто вона, що вихо́дить із пустині, немов стовпи диму, оку́рена ми́ррою й ла́даном, всіля́кими па́хощами продавця?“
7 ७ पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.
„Ось ло́же його, Соломонове, — шістдесят лицарів навколо нього, із лицарів славних Ізраїлевих!
8 ८ ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.
Усі вони мають меча, усі вправні в бою́, кожен має свого меча при своєму стегні́ проти стра́ху нічно́го.
9 ९ राजा शलमोनाने स्वत: साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.
Но́ші зробив собі цар Соломон із лива́нських дере́в:
10 १० त्याचे खांब चांदीचे केले. पाठ सोन्याची केली. बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
стовпці їхні зробив він із срі́бла, а їхне опертя́ — золоте, пурпуро́ве сиді́ння, їхня сере́дина ви́стелена коха́нням дочо́к єрусалимських!
11 ११ (ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता.
Підіть і побачте, о до́чки сіо́нські, царя Соломона в вінку́, що ним мати його увінча́ла його в день весілля його та в день радости серця його!“