< गीतरत्न 3 >

1 (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही.
내가 밤에 침상에서 마음에 사랑하는 자를 찾았구나 찾아도 발견치 못하였구나
2 मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
이에 내가 일어나서 성중으로 돌아다니며 마음에 사랑하는 자를 거리에서나 큰 길에서나 찾으리라 하고 찾으나 만나지 못하였구나
3 शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”
성중의 행순하는 자들을 만나서 묻기를 내 마음에 사랑하는 자를 너희가 보았느냐 하고
4 मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही.
그들을 떠나자마자 마음에 사랑하는 자를 만나서 그를 붙잡고 내 어미 집으로, 나를 잉태한 자의 방으로 가기까지 놓지 아니하였노라
5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. आमचे प्रेम करणे संपत नाही, तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
예루살렘 여자들아 내가 노루와 들 사슴으로 너희에게 부탁한다 사랑하는 자가 원하기 전에는 흔들지 말고 깨우지 말지니라
6 (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे?
연기 기둥과도 같고 몰약과 유향과 장사의 여러가지 향품으로 향기롭게도 하고 거친 들에서 오는 자가 누구인고
7 पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.
이는 솔로몬의 연이라 이스라엘 용사 중 육십 인이 옹위하였는데
8 ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.
다 칼을 잡고 싸움에 익숙한 사람들이라 밤의 두려움을 인하여 각기 허리에 칼을 찼느니라
9 राजा शलमोनाने स्वत: साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.
솔로몬 왕이 레바논 나무로 자기의 연을 만들었는데
10 १० त्याचे खांब चांदीचे केले. पाठ सोन्याची केली. बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
그 기둥은 은이요 바닥은 금이요 자리는 자색 담이라 그 안에는 예루살렘 여자들의 사랑이 입혔구나
11 ११ (ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता.
시온의 여자들아 나와서 솔로몬 왕을 보라 혼인날 마음이 기쁠 때에 그 모친의 씌운 면류관이 그 머리에 있구나

< गीतरत्न 3 >